राजाच्या जवळ चंदनाचा ढिग साठला, राजाने त्याचा साबण केला

भारतात साबणाचे किती ब्रँड आले आणि किती गेले मात्र बोटावर मोजण्या एवढेच ब्रँड मार्केट मध्ये आपली जागा शाबूत ठेवून आहेत. यातील मैसूर सॅण्डल सोप एक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून वेगळी ओळख टिकून ठेवली आहे. इतक्या वर्षानंतर म्हैसूर सॅण्डल सोपने गुणवत्तेत कुठलीही कमी पडू दिली नाही. 

देशातील सगळ्यात जुना आणि महाग असणाऱ्या म्हैसूर सॅण्डल सोप आज पण चंदनाच्या लाकडापासून काढण्यात येणाऱ्या तेलापासून बनविण्यात येतो. श्रीमंतीचं लक्षण समजल्या जाणाऱ्या म्हैसूर सॅण्डल सोपची अजूनही तेवढीच क्रेज आहे. 

गेल्या १०६ वर्षांपासून हा साबण भारताबरोबर जगभरात चंदनाचा सुगंध दरवतोय. 

आता जरी आपल्या बाथरूम मधील जागा वेगवेगळ्या सुगंधाचे साबणाने घेतली असली अनेक वर्ष म्हैसूर सॅण्डल सोप अनेकांच्या मनावर राज्य केलं आहे. आजही ५० ते ६० च्या दशकातील लोकांकडून हाच साबण वापरण्यात येतो. 

भारताची वेगळी ओळख असणाऱ्या म्हैसूर सॅण्डल सोप तयार होण्याची स्टोरी पण तेवढीच इंटरेस्टिंग आहे.

पहिल्या महायुद्धा दरम्यान सगळ्या गोष्टींची आयात-निर्यात बंद पडली होती. यामुळे म्हैसूर येथील चंदनाचे लाकडे विदेशात जाणे बंद झाले होते. युद्धामुळे सगळे व्यापार ठप्प झाले होते. यामुळे म्हैसूर मध्ये ठिकठिकाणी चंदनाच्या लाकडाचे ढीगचे ढीग साचले जात होते.

कारण त्यावेळी जगात सगळ्या जास्त चंदनाचे उत्पादन हे म्हैसूर येथून होत होते. म्हैसूरचे राजे कृष्णराज वोडीयार चवथे हे चंदनाच्या लाकडांचा ढीग जमत असल्याने टेंन्शन मध्ये होते. तर कृष्णराज वोडीयार हे अंघोळीसाठी चंदनाचे तेल वापरायचे. महाराजांना चंदनाच्या तेलाचा सुगंध फार आवडायचा. 

महाराज कृष्णराज वोडीयार यांनी ढीग साचलेल्या चंदनाच्या लाकडापासून तेल काढायला सांगितले आणि ते योग्य पद्धतीने सांभाळून ठेवायला सांगितले होते.

दरम्यान महाराज कृष्णराज वोडीयार यांना एका परदेशी पाहुणाने चंदनाची साबणे गिफ्ट दिली होती. त्यांना हे साबण इतकं आवडलं की, त्यांनी संस्थानचे दिवाण मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या चंदनाच्या तेलापासून साबण तयार करण्यासाठी जे काही लागत ते लवकरात करण्याचा सूचना दिल्या. 

मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी सोसले गरालपुरी यांना साबण बनविण्याच्या प्रशिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला पाठविले. नंतर त्यांची ओळख ‘सोप शास्त्री’ म्हणून बनली. तिकडे गेल्यावर गरालपुरी यांची अडचण झाली. त्याकाळी इंग्लड मध्ये फक्त प्राण्यांच्या चरबीपासून साबण बनविण्यात येत होते. त्यांना भारतीय परंपरेला साजेस साबण बनवायचं होतं.

 ब्रिटिशांनी साबण कसं तयार होतं हे त्यांना सांगितलं नाही. त्यामुळे सोसले गरालपुरी हे अमेरिकेत गेले. येथून परत आल्यानंतर म्हैसूर मधील १९१६ एक फॅक्टरी उभी केली. अनेक प्रयोगानंतर चंदनाच्या तेलापासून तयार झालेला पहिल्यांदा १९१८ मध्ये बाजारात आणला. 

या साबणाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध मिळाली व जास्त जाहिरात न करता ही विकू लागला होता. यानंतर लगेच दुसरी फॅक्टरी उभी करण्यात आली. 

त्या काळात इतर साबण वडी सारखे असायचे. म्हैसूर सॅण्डल सोप मात्र ठरवून  गोल बनविण्यात आला. साबणाच्या पॅकवर श्रीगंधा तवरीनिंदा’ म्हणजेच ‘चंदनाच्या माहेरघरातून’ असं लिहण्यात आलं होत.

म्हैसूर सॅण्डल सोप इतकं फेमस झालं की, सर्व सामान्य लोकांबरोबर राजघराण्यांतूनही या साबणाला मोठी मागणी होती. अजूनही दक्षिणेतील राज्यातम्हैसूर सॅण्डल सोपला मोठ्या प्रमाणात वापरला जातो. साबणासह टाल्कम पावडर, अगरबत्ती, धुलाई पावडर यांची निर्मिती करण्यात येत होती.

२०१६ मध्ये मैसूर सोपंला १०० वर्षे पूर्ण झाले. भारताचा क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी वगळता एकही मोठ्या खेळाडूने, अभिनेत्याने जाहिरात केली नाही. तरीही या साबणाची क्रेज टिकून आहे. 

कालांतराने संस्थानाचं विलीनीकरण झाल्यावर मैसूर सॅण्डल कंपनी कर्नाटक सरकारच्या उपक्रमात समाविष्ट झाली. कंपनीचं नामकरण कर्नाटक सोप अ‍ॅण्ड डिर्टजट लिमिटेड अर्थात केएसडीएल असं करण्यात आलं.

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.