शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या यशवंतरावांना अटक करून एसटीतुन नेलं
१९८० च्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेवर आली होती. बॅरिस्टर ए. आर. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यावेळी यशवंतराव केंद्रात विरोधी बाकावर होते. यावेळी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी विरोधी पक्षांनी शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर शेतकरी दिंडी आयोजित केली होती.
या दिंडीत यशवंतराव सहभागी झाले. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या यशवंतरावांना अटक करून एसटीतुन नेलं होत. त्यावेळी ते म्हंटले होते,
महाराष्ट्रात एसटी सुरू झाली तेव्हा मी एसटीचं उद्घाटन म्हणून बसलो होतो. त्यानंतर हाच एसटी प्रवास झाला.
आज त्याच एसटीचं आंदोलन सुरू आहे. देशात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मग अशा मोठ्या नेत्याचा हा किस्सा सांगावाच लागतो.
अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या दराने प्रश्न उग्र रूप धारण केलं होतं. हा प्रश्न धसास लावण्यासाठी जळगाव ते नागपूर अशी शेतकरी दिंडी काढण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, शेतमजुरांना किमान वेतन मिळालेच पाहिजे, ग्रामीण बेरोजगारांना काम मिळालेच पाहिजे, चळवळीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर दाखल झालेले खटले मागे घेतलेच पाहिजेत या विविध मागण्यांसाठी शेतकरी दिंडी होती. 7 डिसेंबर 1980 रोजी जळगाव मध्ये हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दिंडीला प्रारंभ झाला.
पुंडलीक वरदा हारि विठ्ठल, शेतकरी महाराज की जय
असा जयघोष करत दिंडी मार्गक्रमण करु लागली. शेकडो टाळकरी भजन कीर्तनवाले यांच्या सहभागाने दिंडीला एक वेगळाच बाज प्राप्त झाला होता. शेतकऱ्यांची गाणी म्हणणाऱ्या आणि पोवाडे गाणाऱ्या शाहिरांमुळे दिंडीत एकच उत्साह संचारला होता. राजारामबापू पाटील, गणपतराव देशमुख, बापूसाहेब काळदाते, अहिल्याताई रांगणेकर, मृणाल गोरे, ना. धो. महानोर आदी विविध पक्षातील मातब्बर नेते मंडळी दिंडीत सहभागी झाल्याने त्याची परिणामकारकता जबरदस्त वाढली.
तोवर सर्वसाधारणपणे मोर्चे, सत्याग्रह, आंदोलन अशा मार्गाचा वापर करून संघर्ष केला जायचा. महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गात दिंडीला एक महत्त्व आणि आणि भक्तीभावाचं स्थान आहे. या दिंडीत गावोगावच्या शेतकरी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. दिवसभर भजन कीर्तन, टाळ मृदंगाच्या निनादात सगळेजण नागपूरच्या दिशेने वाटचाल करत असल्यामुळे त्यांच्या विषयी विलक्षण कुतूहल कुतूहलही निर्माण झालं होतं. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाषणे दिली होती. पंढरीच्या वारीतल्या दिंड्यांच्या स्वागताचा बहुमान त्यांना त्या ठिकाणी मिळत होता.
शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था गावं स्वयंस्फूर्तीने करत होती. गावातील महिला हजारो भाकऱ्या उस्फूर्तपणे तयार करून पाठवत होत्या. महाराष्ट्रभर शेतकर्यांच्या प्रचंड पाठिंबा या दिंडीला लाभला डॉक्टर श्रीराम लागू, नानासाहेब गोरे, गोदाताई परुळेकर यांच्या पाठिंब्याने दिंडीत आणखी चैतन्य निर्माण झाले होते. अमरावतीत जॉर्ज फर्नांडिस देखील सहभागी झाले. त्यांच्या तडाकेबाज भाषणाने शेतकऱ्यांचा त्वेष आणखीन जगला.
त्यावेळचे मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांना परिस्थिती कशी हाताळावी हेच कळेना.
दिवसेंदिवस शेतकऱ्यांची संख्या वाढतच चालली होती. नागपूरमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन ही त्या वेळी सुरू होतं. शरद पवार कामकाजात सहभागी होण्यासाठी जात असत आणि उर्वरित काळात दिंडीत सहभागी होत असत. त्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते.
दिंडी अमरावतीतून पुढे निघाल्यावर यशवंतराव चव्हाण दिंडीमध्ये सहभागी झाले. चव्हाण साहेबांना शरद पवार आणि सर्व सहकार्यांना पोहरा येथे अटक करण्यात आली. भंडारा इथल्या डाक बंगल्यावर त्यांना नेऊन ठेवण्यात आलं.
चव्हाणांना अटक हा मोठा धक्का होता.
त्यांना अटक झाल्यावर अमरावती न्यायदंडाधिकार्यांसमोर उभे केले नाही. कारण तेथील वातावरण तापलं होतं. त्यांना भंडारा जिल्ह्यातील साकोलीला उभं करण्यात आलं. साकोलीला कानेटकर नावाचे न्यायदंडाधिकारी होते. त्यांनी चोवीस तासांत न्यायदंडाधिकार्यांसमोर उभे केले नाही म्हणून ती अटकच अवैध ठरविली. यशवंतराव नागपूरला आले. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी आवर्जून सांगितले की,
महाराष्ट्रात एसटी सुरू झाली तेव्हा मी एसटीचं उद्घाटन म्हणून बसलो होतो. त्यानंतर हाच एसटी प्रवास झाला.
कारण यशवंतराव चव्हाणांना एसटीतून साकोलीला नेण्यात आलं होतं. स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षांनी शेतक-यांच्या प्रश्नावर आंदोलन करून पूर्वीचीच जिद्द कायम असल्याचे यशवंतरावांनी दाखवून दिलं होत.
हे ही वाच भिडू
- राजकीय पुढाऱ्यांनी विरोध केला तरी यशवंतरावांनी एस.टी. महामंडळ सुरु करुन दाखवलंच
- सुशील कुमार शिंदे आणि यशवंतराव संपूर्ण प्रवासभर सुरेश भटांच्या गझला गात होते.
- सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा पायंडा मोदींनी नाही तर यशवंतरावांनी पाडलाय
English Summary: A R Antulay arrested Yashwant Rao chavhan who established S T Mahamandal.
Web Title: A R Antulay arrested Yashwant Rao chavhan who established st mahamandal