कॉलेजातला राडा करणारा जिगरी ग्रुप त्यातला एक गोविंदा झाला आणि दूसरा हितेंद्र ठाकूर..

बाळासाहेब ठाकरे आणि दिलीप कुमार यांची मैत्री अशी फार फेमस आहेत. त्यांचे एकमेकांच्या घरी येणं-जाणं असायचं. पुढे दिलीप कुमार यांनी पाकिस्तानचा पुरस्कार स्वीकारला आणि त्यानंतर या दोस्तीत खंड पडला.

राजकीय नेते आणि अभिनेत्यांचे नेत्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. अशीच एक जोडी म्हणजे अभिनेता गोविंदा आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची. जी शालेय जीवनापासून ते मित्र आहेत.  

गोविंदाचे कुटुंबीय मुंबई सोडून विरार राहायला जाण्यामागे सुद्धा मोठा किस्सा आहे.

गोविंदा यांचे वडील अरुण अहुजा हे कार्टर रोड वरील बंगल्यात राहत. अरुण अहुजा त्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेते होते. १९३७ ते १९४७ गोविंदच्या वडिलांनी ३० ते ३५ पिक्चर मध्ये काम केले. त्यातलं काही पिक्चर चांगेलच चालले. त्यांनी १९४८ मध्ये एक पिक्चर पण काढला तो पडला. त्यामुळे त्यांना बरेच आर्थिक नुकसान झाले. 

तसे पुढचे १० वर्ष म्हणजेच १९४७ ते ५७ या काळात त्यांनी एकाही पिक्चर मध्ये काम मिळाले नाही. ही दहा वर्षात अभिनेत्याचं, स्टारच जगणं  यामुळे त्यांच्यावर भरपूर कर्ज झाले होते. त्यामुळे त्यांना आवडता बंगला विकावा लागला होता.

१९६२ मध्ये मग अरुण अहुजा आपल्या कुटुंबीय सोबत कार्टर रोड वरून विरारला राहायला गेले. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजेच १९६३ मध्ये विरारच्या चाळीतली घरात गोविंदा जन्म झाला. आई, वडील, भाऊ, बहीण असे ५ जणांचे कुटुंबीय विरार मधील चाळीत राहायला ३०० स्केअर फुटाच्या घरात राहत.  

आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्यामंदिर येथे गोविंदा यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. 

गोविंदा आणि हितेंद्र ठाकूर हे एकाच शाळेत शिकायला होते. त्यांची चांगली मैत्री जमली होती. तेव्हा आता एवढे ठाकूर कुटुंबीयांचं प्रस्थ नव्हतं. गोविंदा हितेंद्र ठाकूरांना प्रेमाने हितेश म्हणून हाक मारत. हितेंद्र ठाकूर, गोविंदा अशा २४ ते २५ जणांची एक टोळी असायची. हे २५ जण नेहमी सोबतच असायचे. शाळेत सोबत जाण्यापासून ते, कॅंटीनमध्ये सोबत जेवणे. दंगा मस्ती करण्याबरोबर हे सगळे सोबत राहायचे.

गोविंदा शाळेत असतांना पासून विविध कार्यक्रमात भाग घ्यायचा.

गोविंदाचे वडील लहानपणापासून म्हणायचे की, अभिनय करणे हे खानदानी आहे. अभिनय हा तुझ्या रक्तात आहे. तुझ्याकडून हे नक्की होईल. गोविंदाने आपल्या ॲक्टिंगची व्हिडीओ कॅसेट तयार करून  ३ ते ४ प्रोड्युसरच्या ऑफिस मध्ये नेऊन दिली होती. तेव्हा काही वेळा आपल्या सोबत हितेंद्र ठाकूर आल्याचे एका मुलाखतीत गोविंदा सांगतो.

पिक्चर बघायला सुद्धा हितेंद्र ठाकूर, गोविंदा असे १० -१५ मित्र सोबत जात.

एकदा गोविंदा-हितेंद्र ठाकूर हे सुभाष घई यांच्या हिरो पिक्चरचा पाहायला गेले होते. तेव्हा गोविंदा हितेंद्र ठाकूरांना म्हणाला होता,

मी पण असाच तुला एक दिवस पडद्यावर दिसेल

पुढे गोविंदाने ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात अभिनय क्षेत्रात कारकीर्दीला सुरुवात केली. गोविंदाला १९८६ मध्ये पहिला काम एलविन कंपनीच्या जाहिरातीच मिळालं होते.  १९८६ मध्ये गोविंदाचा पहिला पिक्चर ‘इल्जाम’ रिलीज झाला. ॲक्शन आणि डान्सिंग हिरो म्हणून गोविंदाने सुरुवात केली होती. 

पुढे शोला और शबनम, आंखेन  सारखे असंख्य ब्लॉकबस्टर पिक्चर दिले. त्यानंतर गोविंदाने अनेक विनोदी चित्रपटांमध्ये काम केले. गोविंदाच्या सर्वाधिक पिक्चरचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते. त्यामुळे तो बॉलिवूडमधील एक मोठा स्टार बनला. यामध्ये कुली नंबर १, राजा बाबू, हिरो नंबर १ आणि दुल्हे राजा यांचा समावेश होता

तर गोविंदाचे मित्र हितेंद्र यांनी याच काळात राजकारणात प्रवेश केला होता. १९८८ मध्ये हितेंद्र ठाकूर यांची वसई विरारचे युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष झाले होते. १९९० मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर हितेंद्र ठाकूर काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले होते.  

हितेंद्र ठाकूर यांच्याकडून विरार १९८६ पासून १२ फेब्रुवारीला साई बाबा मंदिरात फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. गोविंदा १२ फेब्रुवारीला या कार्यक्रमाला उपस्थित राहतोच.

पुढे हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडी नावाचा पक्ष स्थापन केला. तर दुसरीकडे हितेंद्र ठाकूर यांचे भाऊ भाई ठाकूर याची ओळख विरार भागातील बाहुबली अशी बनली होती.  वसई-विरार भागात ठाकूर कुटुंबीयांशिवाय पण सुद्धा हालत नसल्याचे तो काळ होता. 

२००४ मध्ये गोविंदाने काँग्रेसच्या तिकिटावर वसई-विरारचा भाग असणाऱ्या उत्तर मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढविली होती. भाजपच्या राम नाईक यांना हरवत ते लोकसभेत पोहचले होते. तेव्हा राम नाईक यांनी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी मदत केल्यानेच गोविंदा निवडून आला अशी टिका केली होती.  

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश ठाकूर यांचा प्रचार गोविंदा ने केला होता. हे तीनही उमेदवार निवडून आले आहेत. यावेळी बोलतांना गोविंदा म्हणाला होता. मी राजकारण सोडले आहे मात्र हितेंद्र ठाकूर यांच्या सोबतची मैत्री  नाही. शालेय जीवनापासून गोविंदा आणि हितेंद्र ठाकूर हे मित्र आहेत. 

गोविंदाने विरार सोडून अनेक वर्ष झाली आहेत. मात्र अजूनही विरार बद्दल गोविंदाच्या मनात एक वेगळं स्थान असल्याचे तो सांगतो.   

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.