टीप मिळाली आणि घरातल्या लॉकर मध्ये तब्बल ५०० कोटींचं शिवलिंग सापडलं..

आपण नॉर्मली तिजोरीचा वापर पैसे, दागिने ठेवण्यासाठी करतो. पिक्चरमध्ये दाखवतात तसं काहीतरी इंटरेस्टिंग आणि रहस्यमयी गोष्ट ठेवण्यासाठी या तिजोरीचा वापर करतात. त्यामुळे तिजोरी म्हंटल कि आपल्या आशा टांगणीला लागतात. पण बऱ्याचदा ‘खोदा पहाड निकाल चुहा’ अशी गतं होते, म्हणजे भली मोठी तिजोरी आणि आणि त्यात काहीच नसतं. पण बऱ्याचदा असंही घडत कि, घरातल्या साध्या तिजोरीतचं करोडो रुपयांचा माल घावतो.

म्हणजे सध्याची एक बातमी बघा ना एका नेत्याच्या घरात थोडं-थोडकं नाही तर तब्ब्ल २०० कोटींचं घबाड सापडलं. ज्याचा कोणी विचार पण केला नसलं. पण भिडू सध्या त्यापेक्षाही मोठी गोष्ट हाती लागलीये. जिची किंमत साधी – सुधी नाही तर तब्बल ५०० कोटी असल्याचं म्हंटल जातंय. आणि ती गोष्ट कोणती असं विचारलं तर एक छोटं शिवलिंग. 

आता तुम्ही म्हणाल एका छोट्याश्या शिवलिंगाचे ५०० कोटी ते काय सोन्याचं आहे व्हय. पण भिडू तुमच्या माहितीसाठी हे  ५०० कोटींचं शिवलिंग सोन्याचं नाही तर त्यापेक्षा जास्त  मौल्यवान धातू असणाऱ्या पन्ना रत्नाचं आहे.

म्हणजे झालं काय, तामिळनाडूच्या तंजावरचे एडीजीपी जयंता मुरली यांनी चेन्नईमध्ये माध्यमांना सांगितले की, त्यांना तंजावरमधील एका घरात एक प्राचीन मूर्ती ठेवल्याची टीप मिळाली होती. ही टिप लक्षात घेऊन आमच्या टीमचे त्या व्यावसायिकाच्या घरावर छापा मारायचं ठरवलं.

प्लॅननुसार पोलिसांची टीम त्या व्यावसायिकाच्या घरात पोहोचली. पोलीस बघून व्यावसायिक घाबरला, त्यांनी पोलिसांना अचानक येण्याबाबत चौकशी सुद्धा केली. पण पोलीस सुद्धा तयारीनिशी आलेले. त्यांनी व्यावसायिकाच्या घरातलं लॉकर उघडलं आणि आत जे मिळालं ते बघून २ मिनिट सगळेचं विचारात पडले. 

व्यावसायिकाच्या त्या तिजोरीत एक छोटसं शिवलिंग ठेवलं होते. पोलिसांना ते शिवलिंग चौकशीसाठी दिलं त्यानंतर जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती. ते छोटंसं शिवलिंग काही साधं सुध शिवलिंग नव्हतं तर पाचूच्या रत्नाने बनवलेलं शिवलिंग होतं. ज्याची किंमत सुमारे ५०० कोटी रुपये आहे. आणि महत्वाचं म्हणजे ही मूर्ती पुरातन काळातली आहे.

या एमराल्ड म्हणजेच पन्ना लिंगमला मारघाट लिंगम असंही म्हणतात. या एमराल्ड लिंगमची किंमत ५०० कोटी रुपये आहे. नागपट्टिनमजवळील थिरुक्कुवलाई येथील जुन्या त्यागराज स्वामी मंदिरातून २०१६ मध्ये हे शिवलिंग चोरी झालं होतं. हे शिवलिंग बँकेच्या लॉकरमधून जप्त करण्यात आलेलं.

या शिवलिंगाच्या बनावटीवरून एवढं तरी समजतंय कि, ते फार जुनं शिवलिंग आहे. पण ते कधी बनवलं गेलं हे अजून तरी कळालेलं नाही. वैज्ञानिक यावर तपास करत आहेत. पण एका अंदाजानुसार हे पन्ना रत्नाच शिवलिंग हजार एक वर्षे तरी जुनं असेल. 

सोबतचं असेही मानले जाते कि, पन्ना रत्नांना बनलेलं हे ५०० कोटी रुपये किमतीचं शिवलिंग पूर्व आशिया साम्राज्याच्या दक्षिण भारतातील महाराज राजेंद्र चोल यांनी विकत घेतले होत जे त्यांनी थिरुक्कुवलाई मधल्या या त्यागराज मंदिराला दिलेलं. पण तरी याबाबत कुठला पुरावा मिळालेला नाहीये.

त्यामुळे या शिवलिंगावर रिसर्च सुरु आहे.  दरम्यान, शिवलिंग लपून ठेवल्या प्रकरणी पोलिसांनी त्या व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाच भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.