वर्षभरापूर्वी स्वतःच्या पायावर उभं राहायला जमत नव्हतं, त्यांनी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केलीये…

मागच्या वर्षी त्यांना १५ मिनटे सुद्धा चालत येत नव्हते. शेवटी शेवटी तर त्यांना उभे राहणे अवघड झालं होत. श्वास घ्यायला सुद्धा त्यांना त्रास होत होता. सर्वसामान्य लोकांचे हृदयाचे ठोके मिनिटाला ६० ते १०० असतात. अशावेळी त्यांच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट १८० होते. 

यामुळे अनेकांना वाटायचे की ते पुन्हा कधी उभे राहू शकणार नाही. मात्र त्यांनी यावर मत करायची जिद्द उराशी बाळगली होती. ते फक्त यातून बाहेर पडलेच असं नाही. त्यांनी अवघड समजली जाणारी आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण केली आहे.

कॅन्सरशी लढा देऊन आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या आयपीएस निधीन वलसान यांची ही गोष्ट.  

जिद्द असेल तर माणूस कुठंच कमी पडत नाही. निधीन वलसान यांच्या उदाहरणावरून हे दिसून येते. फेब्रुवारी महिन्यात ते म्हणजे १ वर्षाच्या लढ्यानंतर ते कॅन्सर मधून मुक्त झाले होते. त्यांनी ठरवलं होते स्वतःला सिद्ध करून दाखवायचं.

निधीन वलसान हे गोवा येथे क्राईम ब्रांचचे पोलीस अधीक्षक आहे. तसेच जमीन बळकावणे विरोधी पथकाचे पथकाचे प्रमुख आहेत.  

२०२० मध्ये जगभरात कोरोने कहर केला होता. यात तरुणांना पासून ते ज्येष्ठांना जीव गमवावा लागला. याच काळात वलसान यांना अंगदुखी, सर्दी सारखे आजार झाले होते. त्यावेळी वलसन यांना वाटले हा नॉर्मल आजार आहे. मात्र पाठदुखी त्यांची काही कमी होत नव्हती. रात्र रात्रभर ते खुर्चीवर बसवू काढत लागत. 

पाठदुखी, सर्दी कमी होत नसल्याने त्यांनी स्पाँडिलायसिस, न्यूरो, टिबी सारख्या सगळ्या आजारांच्या टेस्ट करून घेतल्या मात्र यात काहीच आढळून आले नव्हते. यामुळे वलसन यांनीआपल्या लहापणीचा मित्र आणि डॉक्टर डॉ. आशुतोष बेन्स हे सगळं सांगितलं. या मित्राने त्यांना एमआरआय करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी वलसान यांना समजले की, त्यांना कॅन्सर झाला आहे. 

सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे वलसान हे कॅन्सर झाले हे समजल्यावर हताश झाले. त्यांना असं वाटलं की, सगळं काही संपलं आहे. मात्र त्याच वेळी हॉस्पिटल मध्ये एका कॅन्सर पेशंटची पत्नी त्यांना भेटली आणि त्यांना सांगितलं की, तुम्ही अशा प्रकारे हताश होऊ नका. तुमची युद्ध हे डोक्यात आहे. जर तुम्ही इथं हार मानली असेल तुम्ही युद्ध हरणार.वलसान यांनी ठरवले. कधीच हार मानायची नाही. 

यानंतर वलसान यांनी केरळ मधील सरकारी हॉस्पिटल मध्ये उपचार घ्यायला सुरुवात केली

वलसान यांना कॅन्सर झाल्याचे समजल्या नंतर लवकर इलाज करणे गरजेचे होते. त्यांनुसार वलसान यांनी केरळ मधील सरकारी रुग्णालयात उपचार घ्यायला सुरुवात केली. कॅन्सरचा उपचार घेत असतांना सगळ्यात त्रास दायक गोष्ट असते ती म्हणजे केमोथेरपी. 

वलसान यांना ६ वेळा केमोथेरपी घ्यावी लागली. याचा भरपूर त्रास होत होता. आजूबाजूला असणाऱ्या पेशंटला पाहून ते हिम्मत ठेऊन होते. तसेच यातून लवकर बाहेर पडण्याची जिद्द त्यांच्यात होती. 

केमोथेरपी दरम्यान त्यांना मोठ्या प्रमाणात स्टेरॉइड देण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे वजन मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यांचे वजन ९० किलो झाले होते. त्यावेळी आयर्नमॅन सारख्या स्पर्धेत भाग घेईल असे त्यांच्या मनात सुद्धा आले नसेल. मात्र एक गोष्ट फिक्स होती ते म्हणजे वजन कमी करायची.

१ वर्षांच्या ट्रीटमेंट नंतर फेब्रुवारी नंतर वलसान यांनी कॅन्सरवर मात केली. यानंतर वलसान यांनी हळूहळू व्यायामाला सुरुवात केली. सकाळी लवकर उठून फिरायला जाऊ लागले.  त्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाफ मॅरॉथॉन मध्ये मध्ये भाग घेण्यासंदर्भात विचारले होते. हाफ मॅरेथॉन मध्ये २१ किलोमीटरचे नंतर पूर्ण करावे लागत होते. 

वलसान हे हाफ मॅरॉथॉन मध्ये भाग घेण्याच्या तयारीत असतांना त्यांच्या मित्रांनी सांगितले की, यंदा आयर्नमॅन स्पर्धा गोवात होणार आहे. यावेळी त्यांनी या स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवले. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी धावायला, चालायला सुरुवात केली तर पहिल्या १५ मिनिटात ते थकून जायचे. मात्र त्यांनी हार मनाली नाही. हळूहळू व्यायामाची वेळ ४० मिनिटापर्यंत नेली. 

व्यायामाचा परिणाम चांगला झाला. १ महिन्यानंतर त्यांना बराच फरक जाणवायला लागला. 

या काळात त्यांच्या डोक्यात फक्त आयर्नमॅन स्पर्धा कशी पूर्ण करता येईल हेच येत होते. काम झाले वलसान हे मैदानावर जात आणि प्रॅक्टिस करत. त्यांच्या सोबतचे कर्मचारी पार्टी, फिरण्यासाठी बाहेर जात तेव्हा सुद्धा ते मैदानावर घाम गाळत. त्याचा परिणाम असा झाला, निधीन वलसान यांनी  टफ समजली जाणारी आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण केली आहे. 

आयर्नमॅन शर्यत हे सर्वात कठीण आव्हानांपैकी एक आहे. यात १.९ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर  सायकलिंग आणि २१ किलोमीटर धावणे यांचा समावेश आहे. साडेआठ तासांच्या निर्धारित वेळेत पूर्ण करावे लागते. वलसान यांनी ७०.३ मैल अंतर ८ तास, ३ मिनिटे आणि ५३ सेकंदात पूर्ण केले. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.