उद्धव, राज, आदित्य या तिन्ही ठाकरेंना पर्याय द्यायला अमित ठाकरे मैदानात उतरलेत…

हॅशटॅग ठाकरे… सध्या ठाकरे आडनावाला टिआरपी आहे. उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, स्मिता ठाकरे, जयदेव ठाकरे, निहाल ठाकरे… ही नावं सातत्याने चर्चेत आहेत. आत्ता या हॅशटॅग ठाकरेंमध्ये सकाळपासून नंबर १ वरती आले आहेत ते अमित ठाकरे.

ज्यादिवशी शिवसेनेला खिंडार पडलं त्या दिवसांपासूनच अमित ठाकरेंनी बैठकांचा सपाटा लावला आहे. सध्या देखील ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. पण आज दिवसभर अमित ठाकरे चर्चेत येण्याचं कारण ठरलय त्यांच विधान.

गरज पडल्यास विधानसभा निवडणूक लढवणार, मनसेचा बॅडपॅच संपलाय आत्ता माझ्यावर पक्षाची जबाबदारी आहे अस ते म्हणालेत.

साहजिक चर्चा सुरू झालेय ती अमित ठाकरेंच्या सक्रिय राजकारणाची. शिवसेनतली फुट, अस्थिर वातावरण, मनसेच्या सातत्याने बदलणाऱ्या भूमिका, राज ठाकरेंच आजारपण या सर्व पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंच सक्रिय होणं मनसेसाठी मैलाचा दगड ठरेल का हे पाहणं गरजेचं आहे. आजच्या या व्हिडीओतून आपण समजून घेणार आहोत अमित ठाकरेंच राजकारण कसं चालू आहे व त्यांच्या राजकारणाचा मनसेला कितपत फायदा होवू शकतो.

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.