गुजरातमध्ये आता आपची एंट्री होतीय. यात नुकसान कुणाचं आणि फायदा कुणाला होणार?

गुजरातचं राजकारण म्हणलं तर डोळ्यासमोर भाजपचाच मुख्यमंत्री दिसतो.

१९९८ च्या मार्च पासून गुजरातमध्ये फक्त भाजपचे मुख्यमंत्री होते. गुजरात निवडणुका कोण जिंकणार हे आत्ता सांगणे जरा घाईचे होईल, परंतु आता गुजरातच्या राजकारणात आप ची एन्ट्री होतेय, त्यामुळे  एक गोष्ट मात्र नक्की आहे की, आप कॉंग्रेसला नुकसान पोहचवणार, कारण आपचा गुजरात मधल्या प्रवेशाचा फायदा भाजपला होऊ शकेल….

थोडक्यात भाजपचे विरोधी मत हे कॉंग्रेसला न जाता ‘आप’ ला जाऊ शकते.

या २०२१ वर्षातील सुरत महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने २७ जागा जिंकून दाखवल्या आहेत. भाजपला सर्वाधिक जागा १२० पैकी ९३ जागा मिळाल्यात तर २७ जागा जिंकून आप विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. मात्र, या निवडणुकीत कॉंग्रेसला आपले खातेदेखील उघडता आले नाही.

त्यामुळे आपण गुजरातमध्येही निवडून येऊ शकतो याचा फुल्ल कॉन्फिडन्स आलेल्या, आप पक्षाचे लक्ष  आता २०२२ मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकांवर आहे.

त्यामुळे आता ‘आप’ला विश्वास आहे की ते दिल्लीसारख्या उद्योजक गुजरातींना मोफत योजनांद्वारे  भुरळ घालू शकतील. आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात दिल्ली सरकारच्या निरंकुश सत्ता असूनही सुरतचे प्रसिद्ध हिऱ्यांचे व्यापारी महेश सवानी आम आदमी पार्टीमध्ये दाखल झाले आहेत.

आपमध्ये सामील झालेल्या रियाल्टार महेश सवानी, ज्यांच्यावर अपहरण आणि खंडणीचे आरोप आहेत  आणि गुजराती पत्रकार इसुदान गढ़वी यांना आपल्या पार्टीमध्ये सहभागी करून घेतलं आहे. जेणेकरुन हिंदू समाजातील लोकांच्या विरोधाचा सामना करणाऱ्या गोपाळ इटालियासारख्या नेत्यांची भरपाई होऊ  शकेल.

गुजरात हे पारंपारिकपणे दोन गट असणारे राज्य आहे.

इथले लोकं एकतर भाजपसोबत आहेत नाही तर मग कॉंग्रेसशी निष्ठावान आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणी नाही. आणि याच कारणामुळे कोणताही महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष येथे आपले स्थान निर्माण करू शकला नाही.

१९९८ पासून केशुभाई पटेल यांनी भाजपला विजय मिळवून दिला, तेव्हापासून गुजरातमध्ये नेहमीच भाजप नेहमीच जिंकत आली आहे. गुजरातमधील जवळ जवळ एक पिढीच केवळ भाजपाच्या राजवटीत मोठी झाली आहे असं म्हणावं लागेल.

‘आप गुजरातच्या निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करतोय, पण आपण आप कडून काय अपेक्षा करायला हव्यात ?

केजरीवाल यांनी आश्वासन दिलंय की, आपण गुजरात मधील राजकारण बदलून टाकेल. पण त्याचसोबत त्यांनी असं म्हणन अपेक्षित होतं कि, गुजरात मध्ये उत्तम वातावरण निर्माण करू. गुजरात मध्ये केवळ जातीचे आणि धर्माचे राजकारण चालते. गुजरातमध्ये भाजप जातीय राजकारणाचे आश्रयस्थान आहे आणि थोडा बहुत कॉंग्रेस देखील हे आपण जाणतोच.

कॉंग्रेसचे उदाहरण द्यायचे झाले तर माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते माधवसिंह सोलंकी यांनी व्होट बँक पॉलीटिक्स म्हणून केएचएएम KHAM  (Kshatriya, Harijan, Adivasi, Muslim) सिद्धांत घेऊन आले होते.

२०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने पाटीदार समाजाला पाठिंबा दर्शविला होता, तिथे कॉंग्रेस नेते हार्दिक पटेल आता ओबीसी समुदाय म्हणून आरक्षणाच्या चळवळीचे नेतृत्व करीत होते. इटालिया हे एक पाटीदार नेते आहेत जे हार्दिक पटेल यांचे निकटवर्तीय होते आणि आता ते गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आहेत.

आम आदमी पक्षाने पाटीदार व मुस्लिम मतदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. पाटीदार भाजपवर असमाधानी आहेत आणि मुस्लिम हे कॉंग्रेसची पारंपारिक व्होट बँक आहे.
आम आदमी पार्टी हा भाजप साठी थेट धोका नाही, परंतु यामुळे कॉंग्रेसला मात्र नक्कीच होईल
पण अशा परिस्थितीत सत्तेत राहण्यासाठी भाजपालाहि तितकेच प्रयत्न करावे लागतील. कारण तिथे २५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे, गुजराती लोकांना आता नवीन कुणी हवंय म्हणून बहुधा ते प्रतिनिधित्वाची संधी आप’ला ही देऊ शकतात.
आप गुजरात मध्ये सत्ता स्थापन करू शकेल का ?

आप’ खरोखर गुजरातमध्ये सरकार स्थापन करेल का हे सांगणे सद्या तरी अवघड आहे. थोडक्यात  आप टिपिकल गेम खेळतंय कि, वातावरण निर्माण करून नाराज झालेल्या भाजपा समर्थकांना त्यांच्या पक्षात सामील करून घेत आहे.

केजरीवाल यांना पाटीदार आंदोलनाचा व्होट बँके म्हणून फायदा घ्यायचा होता. पण हार्दिक पटेलवर गुजराती जनता काहीशी नाराज आहे. हार्दिक पटेल यांनी नेते म्हणून उदयास येण्यासाठी जातीचं कार्ड खेळलं. पटेल समाज त्यांच्या वक्तृत्वामुळे प्रभावित झाले होते परंतु पटेल यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांची निराशा झाली होती.

२०१७ च्या निवडणुकीत पाटीदार समाजाने भाजपऐवजी कॉंग्रेसला मतदान केले होते. तितकाच काय तो फरक तीच मते या वेळी ते ‘आप’ला मिळतील. आणि याचमुळे कॉंग्रेसला पराभवाचा धक्का बसू शकेल.

केजरीवाल यांना इतकंच वाटतंय कि, २५ वर्षांच्या सत्तेला कंटाळून लोकं आपल्याला मत देतील.

१९९८ पासून गुजरातमध्ये फक्त भाजपचे मुख्यमंत्री होत आलेत, आत्तापासून गुजरात निवडणुका कोण जिंकणार हे सांगणे फार घाईचे होईल, परंतु एक गोष्ट नक्कीच आहे की कॉंग्रेसला जितकं नुकसान होईल तितकं नुकसान भाजपला होणार नाही.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.