गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला ब्रेक लावण्यासाठीच आपला घेरण्यात येत आहे का ?

अरविंद केजरीवाल सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. गुजरातमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा गुजरात दौरा महत्वपूर्ण असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यांच्या या दौऱ्यातसुद्धा जोरदार राडा झाला आहे. त्यांच्या दौऱ्याच्या आधी गुजरातमधल्या  त्यांच्या ऑफिसवर गुजरात पोलिसांनी रेड टाकल्याचा आरोप आपने केला आहे.

पुन्हा केजरिवाल यांच्या दौऱ्या दरम्यानही राडा चालूच राहिला. या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान अरविंद केजरीवाल एक रिक्षाचालकाच्या घरी जेवायला जाणार होते. त्यासाठी ते रिक्षातूनच जायला निघाले. मात्र गुजरात पोलिसांनी त्यांनी तसं करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. व्हीआयपींसाठी असणाऱ्या सेक्युरिटी प्रोटोकॉलनुसार केजरीवाल यांना तसं जात येणार नाही असं गुजरात पोलिसांचं म्हणणं होतं. तर मला सेक्युरिटी नको आहे आणि माझ्या मर्जीच्या विरोधात सुरक्षा पुरवून गुजरात पोलिस मला कैद करण्याचा प्रयत्न करत आहेत असा केजरीवलांचा आरोप आहे. 

याधीही आम आदमी पक्षाचे मोठे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर CBI  ने रेड टाकली होती. दिल्लीची एक्सईज पोलिसी म्हणजे दारूच्या बाबतीत जे धोरण होतं ते बदलून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा मनीष सिसोदिया यांच्यावर आरोप आहे. सत्येंद्र जैन यांच्यानंतर कारवाई झालेले मनीष सिसोदिया हे दुसरे नेते आहेत. 

मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन या दोघांवर मनी लॉंडरिंग, भ्रष्टाचार यांचेच आरोप करण्यात येत आहेत. 

त्याचवेळी अजून एक महत्वाची गुरुवारीच आम आदमी पक्षाने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यापासून आप गुजरातमध्ये छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं पक्षाचं सगळी यंत्रणा गुजरातवर केंद्रित झाल्याचं सांगण्यात येतं. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपच्या 24 उमेदवारांनी अनामत रक्कम गमावल्यानंतर अनेक वर्षांनी पक्ष आता किमान गुजरातच्या काही भागात एक मजबूत ऑप्शन म्हणून उदयास येत आहे. 

फेब्रुवारीमध्ये आप सुरत महानगरपालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला.  120 सदस्यांच्या सुरत महानगरपालिकेत भाजपने 93 तर आपने 27 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. त्याचबरोबर एप्रिलमध्ये आम आदमी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष सुमारे 58 जागांवर विजय मिळवू शकतो, असा दावा त्यांच्या अंतर्गत सर्वेक्षणातून केला आहे.

या सर्व परिस्तिथीला गुजरातच्या राजकारणाच्या एका इंटरेस्टिंग वैशिष्ठाची जोड मिळते ती म्हणजे गुजरातमध्ये मुकाबला नेहमी दोन पक्षांमध्येच राहिला आहे. यामध्ये कधीही तिसऱ्या पक्षाला स्थान  राहिलेलं नाही.

हे सगळं फॅक्ट लक्षात आपने भाजपाला फाइट देण्याची पुरेपूर तयारी केल्याचं दिसतं. विशेष म्हणजे आपने भाजपाला फाइट देण्यासाठी एकदम भाजपाचीच स्ट्रॅटेजी अवलंबल्याची दिसते.

त्याचा पहिला भाग म्हणजे भाजपच्या हिंदुत्वाला, राष्ट्रवादाला काउंटर करायचं नाही.

भाजपच्या हार्डकोअर हिंदुत्वाला डायरेक्ट काउंटर नं करण्याची आपची सुरवातीपासूनचीच स्ट्रॅटेजी राहिल्याचं जाणकार सांगतात. त्याऐवजी केजरीवाल यांनी स्वतःच सॉफ्ट हिंदुत्व वापरायला सुरवात केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. भाजप अयोध्येच्या राम मंदिराचा मुद्दा पुढे आणत असताना केजरीवाल दिल्ली सरकारच्या पैशातून लोकांना अयोध्येच्या दर्शनाला पाठवत होते. दिल्लीला दिवाळीला अयोध्येची रिप्लिका उभारत होते.

त्याचबरोबर केजरीवालांनी caa -nrc ला देखील विरोध केला नाही. त्यानंतर झालेल्या दिल्ली दंग्यांमध्येही केजरीवाल यांच्या पक्षाने कोणताही स्टॅन्ड घेतला नव्हता. यावरून पक्षावर टीकाही होत होती. मात्र हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपाला सरळ शिंगावर घेण्यापासून वाचताना दिसले. आताही बिल्किस बानू प्रकरणातील दोषी बलात्काऱ्यांना सोडण्यावरून गदारोळ मजला असताना आपने कोणतंही भूमिका जाहीर केलेली नाहीये.

यामुळे हिंदुत्वाचा आरोप होत असताना केजरीवाल हा आरोप पूर्णपणे नं नाकारता आमचं देश जोडण्याचं हिंदुत्व असल्याचं सांगून त्याचं समर्थनच करत होते.

दुसरं म्हणजे हार्डकोअर राष्ट्रवाद. 

भाजपनं जेव्हा जेव्हा राष्ट्रवादाचा मुद्दा पुढं आणला आम आदमी पक्षाने त्याच समर्थनच केल्याचं दिसतं. नुकत्याच झालेल्या हरघर तिरंगा मोहिमेला धरूनच केजरीवाल यांनी देशभरातील पेपरमध्ये  “इंडिया को नंबर वन बनाना हैं” च्या पानभर जाहिराती छापून आणल्या होत्या.जाणकारांच्या मते दिल्लीचे मुख्यमंत्री तिरंग्याचा वापर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “हर घर तिरंगा” च्या आवाहनाला स्पर्धा देण्यासाठीच करत नव्हते तर स्वतःला एक राष्ट्रीय नेता म्हणूनही उभे करत आहेत. 

उत्तरेप्रदेशाच्या निवडणुकीतही केजरीवाल यांनी राष्ट्रवादाच्या मुद्यावरच निवडणूक लढवली होती. निवडणुकीच्या आधी पक्षाने राज्यभर तिरंगा यात्रांची मालिका काढली होती. यादीही दिल्लीच्या शाळांमध्ये देशभक्तीचा अभ्यासक्रम चालू केला होता. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण होईल. पक्षाचा राष्ट्रवादावरील हा स्टॅन्ड केजरीवाल अनेकदा अभिमानाने सांगताना दिसेल आहेत. आमचा राष्ट्रवाद हा हार्डकोअर राष्ट्रवाद आहे असं केजरीवाल छातीटोकपणे सांगताना दिसतात.

तिसरा म्हणजे केजरीवाल यांनी भाजपाची हक्काची वोटबँक असलेल्या व्यापारी वर्गाला केजरीवाल यांनी आपल्याकडे ओढायला केलेली सुरवात.  

राजकोट, सुरत अशा आईंक शहरात केजरीवाल यांनी टाऊनहॉल मीटिंग्सच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना, कारखानदारांना भेटण्याचा सपाट लावला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या गोटातही यामुळे खळबळ उडाली आहे. राजकोटमध्ये जेव्हा टाऊनहॉल मिटींग्स झाली तेव्हा भाजपानेत्यांनी व्यापाऱ्यांना केजरीवाल यांच्या मिटींग्सला जाण्यापासून रोखल्याचे आरोप झाले होते. आम्ही सत्तेत आलो तर भाजपचं रेड राज संपवून टाकू अशी अश्वासन केजरीवाल करताना दिसतात.

थोडक्यात काय तर राष्ट्रवाद आणि हिंदुत्व हे भाजपचे दोन मुद्दे केजरीवाल यांनी तितक्याच ताकदीने उचलण्याचा प्रयत्न केला आहे तर भाजपाची पारंपरिक व्होटबँकसुद्धा त्यांनी आपलीकडे ओढण्यास सुरतवात केली आहे.

आणि याला जोड देण्यात येतेय दिल्लीमधल्या आपच्या डेव्हलपमेंट मॉडेलची.

 त्यामुळं जर आम आदमी पार्टीला गुजरामध्ये हातपाय पसरवण्यासाठी रोखायचं असेल तर आपचे दोन स्ट्रॉंग पॉईंट्स विकास आणि भ्रष्टाचारमुक्त शासन हे उघडे पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न चालू असल्याचे दिसतात असं सांगण्यात येतं. विशेषतः आपच्या नेत्यांवर रेड टाकण्याचं टाईमिंग आणि त्यांच्यावर झालेले आरोप पाहता याला अजूनच पुष्टी मिळते.

त्यामुळे येत्या गुजरात निवडणुकांमध्ये आप काँग्रेसला मागे टाकून गुजरातमध्ये भाजपचा प्रमुख स्पर्धक म्हणून पुढे येणार की सततच्या राड्यांमुळे आपच्या इमेजला तडा जाणार ये येत्या काही महिन्यात कळेलच.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.