तेव्हापासून डि विलियर्सला मिस्टर 360 डिग्री नाव पडलं

भारतात क्रिकेट लव्हर्सची संख्या मोठी आहे. इथे जिंकलं कि डोक्यावर घेऊन नाचणारे देखील आहेत आणि हरले कि मनाला लावून घेणारे सुद्धा. कोणी धोनी लव्हर्स आहे, कोणी कोहली तर कोणी रोहितचे फॅन आहेत. पण याचसोबत भारतात नॉन इंडियन क्रिकेटरचा फॅनक्लब सुद्धा मोठा आहेत.

या नॉन इंडियन क्रिकेटरच्या यादीत टॉपला  येणार नाव म्हणजे ए बी डी विलियर्स. त्याचा फॅनक्लब मोजायचा झाला तर एबी डिव्हिलियर्सचे जेवढे चाहते तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत मिळणार नाही तेवढे भारतात सापडतील. यामागचे कारण म्हणजे त्याचंही भारतबद्दल असलेलं प्रेम कारण तो बऱ्याच काळापासून इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये खेळत होता.

पण आज ए बी डी विलिअर्सने क्रिकेटच्या सगळ्यत फॉरमॅटमधून रिटायरमेंट घेतली. त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही घोषणा केली. वयाच्या ३७ व्या वर्षी त्या फॉर्मात खेळू शकत नाही. असं म्हणत त्यांनी आपली रिटायरमेंट जाहीर केली. 

 तसं तर त्याने २०१८ मध्येच इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली होत, पण तो आयपीएल खेळत होता. 

दरम्यान, डी विलिअर्सच्या धुवाधार बॅटिंगचे सगळेच चाहते आहे, एवढच नाही तर विराट कोहली सारखे भारतीय क्रिकेटर सुद्धा त्याच्या फॅन लिस्टमध्ये आहे. फक्त टी-२० किंवा वन डे क्रिकेटमध्येच नाही, तर कसोटी क्रिकेटमध्येही त्याच्या तुफानी बॅटिंगने भल्याभल्या बॉलर्सची फाटते. सिच्युवेशन कुठलीही असली तरी डी विलियर्सला एकच माहित असत, जबरदस्त बॅटिंग करणं. 

लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये त्याच्या या तुफानी बॅटिंगमुळेच त्याला ‘मिस्टर ३६० डिग्री’ म्ह्णून ओळखलं जात. 

खरं तर क्रिकेटच मैदान हे ३६० डिग्री असतं, आता या मैदानात खेळाडूंचे आपले शॉट ठरलेले असतात. पण डी विलियर्स या गोष्टीला अपवाद आहे, या क्रिकेट मैदानाचा पुरेपूर वापर करत, मैदानाच्या सगळ्या बाजूनी शॉट मारण्यात तो पटाईत आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्टन्स बदलूनही तो शॉट मारू शकतो. म्हणूनच त्याला मिस्टर ३६० डिग्री हे नाव पडलं.

डी विलियर्सच्या नावावर असलेल्या रेकॉर्डविषयी जर आपण बोललो तर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट हाफ सेंच्युरी, सेंच्युरी आणि १५० करणारा एबी डिव्हिलियर्स हा जगातील एकमेव बॅट्समन आहे. एबी विलियर्सने वन डे इंटरनॅशनल  क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त १६ बॉलमध्ये हाफ सेंच्युरी केली होती, तर  ३१ बॉलमध्ये सेंच्युरी मारली होती. जी वन डे इंटरनॅशनल  क्रिकेटमधली सगळ्यात फास्ट सेंच्युरी  होती. 

तर फेब्रुवारी २०१५ मध्ये त्याने सर्वात फास्ट १५० रन करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला, हा रेकॉर्ड त्याने फक्त ६४ बॉलमध्ये केला आहे. 

यासोबत ए बी डी विलियर्सच्या इंटरनॅशनल क्रिकेट करियर वर नजर टाकली तर, त्याने ११४ कसोटी सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरीने दोन डबल सेंच्युरी आणि २२ सेंच्युरीसोबत ८७५६ रन्स बनवले, तर २२८ वन डे इंटरनॅशनल मॅचमध्ये त्याने ५३ पेक्षा जास्त सरासरीने ९५७७ धावा केल्या.  आणि टी -२० इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याने ७८ मॅचमध्ये १० हाफ सेंच्युरीसोबत १६७२ रन बनवले. 

या व्यतिरिक्त डी  विलियर्सने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १४१ सामने खेळले, ज्यामध्ये १०६८९ रन बनवले. याशिवाय लिस्ट ए क्रिकेटमधील २६३ मॅचेसमध्ये त्याने १११२३ रन मारले, ज्यात २९ सेंच्युरी सुद्धा आहेत. त्याचवेळी, टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ३४० सामन्यांमध्ये ४ सँच्युरी आणि ६९ हाफ सेंच्युरीच्या जोरावर ९४२४ रन बनवले. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.