ऑडिशन वेळी हिरोईनचे कपडे उतरवणारा तो होता तरी कोण ?
भिडू लोग खूप काही दिवसापासून आपण हा फोटो व्हायरल झालेला पाहतोय. पन्नासच्या दशकातील बॉलीवूड मध्ये चालणारे कास्टिंग काऊच म्हणून हा फोटो प्रसिद्ध आहे.
कोणीतरी एक मस्तवाल डायरेक्टर आपल्या अलिशान ऑफिस मध्ये अंगावर सूट हातात सिगरेट अशा थाटात सुंदर सुंदर ललनाचे ऑडिशन घेतोय. ऑडिशन कसली स्ट्रगलिंग मॉडेल्सचे कपडे उतरवून त्यांच्या मापाचे निरीक्षण चाललेले आहे.
पन्नासचे दशक म्हणजे हिंदी फिल्म इंडस्ट्री मध्ये अतिशय सोज्वळ सिनेमे बनायचे असं म्हणतात. त्या काळात असले कास्टिंग काऊच करणारा आणि वर निवांत हे फोटो काढून घेणारा माणूस आहे तरी कोण हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. आम्हाला पण हाच प्रश्न पडला.
आता विषय खोल आहे म्हटल्यावर आमचा तोल गेला आणि आम्ही नेमका हा भिडू आहे तरी कोण याची चौकशी केली.
माहिती काढल्यावर कळाल पन्नासच्या दशकातला हा शौकीन डायरेक्टर आहे अब्दुल रशिद कारदार. सुप्रसिद्द कारदार स्टुडिओचा मालक. असं म्हणतात की मरीन ड्राईव्ह वरच्या अलिशान बंगल्यात राहणाऱ्या अब्दुल कारदार यांच्या स्टुडियो मध्ये मेकअप रूम साठी सुद्धा एसी आहे. त्याकाळातली भलतीच अपूर्वाईची ही गोष्ट होती.
तर अब्दुल कारदार यांची ओळख फक्त एवढीच नाही. तर त्यांची खरी ओळख आहे पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीचे म्हणजेच लॉलीवुडचे जनक.
१९२९ साली ब्रिटीश भारतात असणाऱ्या लाहोर मध्ये त्यांनी पहिला चित्रपट बनवला त्याच नाव “हुस्न का डाकू”. तेच या पिक्चरचे हिरोही होते. या सिनेमा मध्ये एक अमेरिकन नटीसुद्धा होती. आयरिस क्रोफर्ड तीच नावं. ‘हुस्न का डाकू ‘अब्दुल कारदारनी पहिल्या सिनेमापासूनच पुढे काय काय पराक्रम करणार याची चुणूक दाखवली होती. या सिनेमाच्या यशामुळे लाहोरमध्ये फिल्म इंडस्ट्री चा पाया रचला गेला.
पुढे अब्दुल कारदार कलकत्ता आणि मुंबईमध्ये सिनेमे बनवत होते. त्यांनी सरफरोश ,फरेबी शेह्जादा, औरत का प्यार, बागबान असे चित्रपट बनवले. त्यांनी बनवलेला आणि के.एल.सेहगल अभिनित शहाजहान हा सिनेमा खूप गाजला. अब्दुल कारदार तेव्हा यशाच्या शिखरावर होते. इतक्यात भारत स्वतंत्र झाला आणि देशाची फाळणी झाली.
नियमाप्रमाणे कारदार पाकिस्तान ला गेले. पण तिथे काही त्यांचे मन रमले नाही. काही दिवसातच ते मुंबईला परत आले. त्यांच्या सोबत त्यांचे साडू सुद्धा होते. नाव “मेहबूब खान”. हा तोच मेहबूब खान ज्याने मदर इंडिया बनवून ऑस्करपर्यंत धडक मारली.
कारदार यांचे सिनेमे गाजले पण या बरोबर त्यांना ओळखले जाते ते त्यांच्या टॅलेंट हंटसाठी.
त्यांनी अनेक हिरे फिल्म इंडस्ट्रीला शोधून दिले. उदाहरणार्थ संगीतकार नौशाद, हिरोईन सुरैय्या, गीतकार मजरूह सुलतानपुरी. जेष्ठ गायक मोहम्मद रफी यांचे पहिले सुपरहिट गाणे “सुहानी रात ढल चुकी” हे सुद्धा कारदार यांच्या चित्रपटातीलच आहे. याशिवाय त्यांनी कारदार-कॉलीनॉस नावाची टॅलेंट हंट स्पर्धा आयोजित केली होती. त्यातून सुप्रसिद्ध गायक महेंद्र कपूर आणि चंद उस्मानी ही नटी पुढे आली.
असे हे टॅलेंट हंटर हुस्न के डाकू अब्दुल कारदार यांच्या कडे ऑडिशनसाठी स्ट्रगलर हिरो हिरोईनची रांग लागत नसेल तर नवल.
तर सध्या व्हायरल होत असलेले फोटो हे अब्दुल कारदार साहेब १९५१ साली आपल्या जादू या सिनेमासाठी ऑडिशन घेत होते तेव्हाचे आहेत. यात एक भारतीय आणि एक विदेशी मॉडेलची खुलेआम कॉस्च्युम टेस्ट चालू आहे . कारदार यांच्या परवानगीनेच लाईफ मासिकाचे फोटोग्राफर जेम्स ब्रूक यांनी हे फोटोसेशन केलं होत.
हे ही वाच भिडू.
- भारताची पहिली सेक्सबॉम्ब झीनत आणि तिची ती रात्र..!
- श्री रेड्डीने सचिनवर केलेला हा आरोप म्हणजे फक्त पब्लिसिटी स्टंट आहे का..?
- तिच्या क्युट दिसण्यामुळेच तिला सर्वाधिक रेप सीन देणारी हिरोईन म्हणून ओळख प्राप्त झाली.
- पाकिस्तानला हरवण्यासाठी भारतानं वापरलेले दिलीप कुमार अस्त्र !