या राजकीय तडजोडीमुळे इराकमध्ये राष्ट्रपती कुर्द, पंतप्रधान शिया तर स्पिकर सुन्नीच असतात

गेल्या वर्षभरापासून राडा चालू असलेली इराकची राष्ट्रपतीपदाची निवडणूक अखेर पार पडली आणि कुर्द नेते अब्दुल लतीफ रशीद यांना राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आलं. त्याच्या निवडीमुळे पुन्हा एकदा इराकच्या राष्ट्रपतीपदावर कुर्द नेत्याचीच नियुक्ती झाली आहे.

तर राष्ट्रपती पदाची सूत्र हातात आल्याबरोबर अब्दुल लतीफ यांनी मुहम्मद शिया अल सुदानी यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. सुदानी यांच्या निवडीने पुन्हा शिया पंथातील नेताच पंतप्रधान झालाय. तर इराकच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद अल हलबौसी हे सुन्नी गटातले आहेत.

शिया धर्मगुरू मुक्तदा अल सद्र यांनी तगडं आवाहन दिल्यानंतर इराकच्या राजकारणात बरीच अस्थिरता निर्माण झाली होती. सद्र यांनी मावळ शिया गटाच्या विरुद्ध जाऊन शिया पंथाचं जहाल राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण तरी सुद्धा इराणच्या राजकारणातील त्रिसूत्री कायम राहिलीय.

ही त्रिसूत्री म्हणजेच इराकचे राष्ट्रपती हे कुर्द गटातील आहेत, पंतप्रधान शिया पंथाचे आहेत तर संसदेचे अध्यक्ष सुन्नी गटाचे आहेत.

गेल्या १८ वर्षांपासून हीच त्रिसूत्री इराकमध्ये राबवली जातेय. एकेकाळी इराकवर सुन्नी मुस्लिमांचा पगडा होता. आर्मी, सरकार आणि नोकरशाहीत सुन्नी पंथाचेच लोक शक्तिशाली होते. मात्र जेव्हा इराकचा हुकूमशाह सद्दाम हुसैनची राजवट अमेरिकेने संपुस्तत आणली तेव्हा यात बदल झाला. ताकदवर सुन्नींच्या ऐवजी शियांनी सगळी सत्ता काबीज केली आणि सुन्नी केवळ अध्यक्षपदापुरते मर्यादित झाले. 

पण एकेकाळी सत्तेत असलेल्या सुन्नी गटाला सत्तेतून काढल्यानंतर सुद्धा इराकच्या सत्तेवर शियांनी कब्जा केला मात्र इराकमधील लोकसंख्येच्या गणितामुळे आणि देशात निर्माण झालेल्या आयएसआयएसआय च्या संकटामुळे ही त्रिसूत्री अस्तित्वात आली. 

इराक हा शिया बहुल देश असला तरी सुन्नी पंथाची लोकसंख्या सुद्धा फार कमी नाही.

२०११ मध्ये प्यू रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार, इराकमध्ये ९९ टक्के मुस्लिम आहेत. यात ७८ टक्के अरब वंशाचे आहेत तर १६ टक्के लोक कुर्द वंशाचे आहेत. इराकमधील सर्व मुस्लिमांपैकी ६२ टक्के लोकं शिया पंथाचे आहेत, ३० टक्के लोकं सुन्नी पंथाला मानतात तर ३ टक्के लोक स्वतःला केवळ मुसलमान म्हणवतात.

तर १६ टक्के कुर्दांपैकी ९८ टक्के कुर्द सुन्नी पंथाचे आहेत तर केवळ २ टक्के कुर्द शिया पंथाचे आहेत. 

यात अरब वंशाचे लोक शिया आणि सुन्नी दोन गटात विभागलेले आहेत. बहुसंख्य अरब हे शिया आहेत तर सुन्नी असलेल्या अरबांची संख्या फार कमी आहे. तर दुसरीकडे कुर्द हे प्रामुख्याने सुन्नी पंथाचे आहेत परंतु कुर्द जरी सुन्नी असले तरी ते स्वतःला सुन्नी मुस्लिम या अस्मितेबरोबर जोडण्याऐवजी कुर्द या जातीय अस्मितेशी जोडतात.

म्हणून जरी सुन्नी एकगठ्ठा ३० टक्के असले तरी अरब आणि कुर्द या वांशिक भेदामुळे दोन्ही गटांमध्ये एकतेची भावना नाही.

याचा प्रभाव सद्दाम हुसैन याच्या राजवटीत स्पष्ट दिसत होता. सद्दाम जरी सुन्नी असला तरी त्याने शिया अरबांबरोबरच सुन्नी कुर्दांच्या बंडखोरीला तितक्याच क्रूरतेने मोडून काढले होते. पण जेव्हा हुसैन सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर बहुसंख्य शियांच्या हाती सत्ता आली आणि कुर्दांना सुद्धा सत्तेत वाटा मिळाला.

यातूनच सत्तेतील ३ महत्वाच्या पदांची ३ गटात विभागणी करण्यात आली. सुन्नी कुर्दांच्या हाती राष्ट्रपतीपद, शिया अरबांच्या हाती पंतप्रधानपद आणि सुन्नी अरबांच्या हाती संसदेचं अध्यक्षपद आलं. जरी ही विभागणी तिन्ही गटात झाली आली तरी २०१० सलत कुर्द गटातले फाउद मौसम हे संसदेचे अध्यक्ष झालेले होते.

पण या त्रिसूत्रीचा खऱ्या अर्थाने बळकटी मिळाली ती आयएसआयएस या दहशतवादी संघटनेमुळे.

सद्दाम हुसैनच्या राजवटीत आयएसआय या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला होता. मात्र या संघटनेला फारसं महत्व प्राप्त झालं नव्हतं. पण जेव्हा सद्दाम हुसैनची सत्ता गेली आणि सत्ता शियांच्या हाती आली तेव्हापासून सुन्नी अरब पूर्णपणे वाऱ्यावर पडले. एकेकाळी आर्मी आणि सत्ता दोन्ही हातात असलेल्या सुन्नी अरब पंथाचे युवक मोठ्या प्रमाणावर आयएसआयमध्ये सामील झाले. 

या आयएसआयएसने इराक, इराण, सीरियाच्या मोठ्या भागावर कब्जा केला. यात सगळ्यात मोठा  फटका बसला होता. सुन्नी मुस्लिमांना प्रतिनिधित्व न दिल्यामुळे युवक कोणत्या ठरला जाऊ शकतात याची जाणीव झालेल्या इराकच्या राज्यकर्त्यांनी त्रिसूत्री आणखीनच घट्ट केली. जरी इराकमध्ये सुन्नी मुस्लिमांना पुरेसं प्रतिनिधित्व नसलं तरी नाममात्र संसदेचं अध्यक्षपद त्यांच्याकडेच ठेवण्यात आलंय.

तर दुसरीकडे सुन्नी कुर्दांची सुद्धा स्वतःची एक स्टोरी आहे.

कुर्द जरी इराकमध्ये अल्पसंख्यांक असले तरी ते तुर्की, सीरिया, इराक, इराण आणि आर्मेनिया या देशात पसरलेले आहेत. या सर्व देशातील कुर्द धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टया वेगळे असले तरी कुर्द या जातीय भावनेने ते स्वतःला एकच मानतात. सोबतच इराकमधील कुर्द बहुसंख्याक असलेला कुर्दिस्तान राज्याला मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता मिळालेली आहे. त्यामुळे इराकच्या राजकारणात कुर्दांचं स्वतःचं एक वेगळं स्थान आहे. 

त्यामुळे सद्दाम हुसैनची सत्ता संपल्यापासून आजपर्यंत इराकमध्ये शिया पंथाचा व्यक्ती पंतप्रधान होतो, कुर्द राष्ट्रपती होतो तर सुन्नी पंथाचा व्यक्ती संसदेचा अध्यक्ष होतो. संसदेच्या अध्यक्षांकडे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या तुलनेत कोणतेच अधिकार नाहीत. मात्र प्रतिनिधित्व म्हणून हे पद सुन्नी पंथाच्या हातात आहे. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.