भारताचा एकमेव बॉलर जो बॅट्समनच डोकं उडेल इतका खतरनाक बाउन्सर फेकायचा…

ऍबे कुरुविला हे नाव सध्या जरी जास्त परिचयाचं नसलं तरी नव्वदच्या दशकात हे एक लोकप्रिय नाव होतं. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्यांच्याइतकी उंची असलेला दुसरा कोणी क्रिकेटर नव्हता. ६’६ इंच इतकी उंची ऍबे कुरुविलाची होती.

ऍबे कुरुविलाने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविडसोबत खेळण्याची संधी मिळवली. कारण हि चौकडी त्याकाळात प्रचंड फॉर्मात होती.

ऍबे कुरुविला मूळचे केरळचे होते पण त्यांचा बराच काळ हा मुंबईतच गेला. मुंबईच्या डी वाय पाटील कॉलेजमधून त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. सुरवातीच्या काळात केवळ  दर रविवारी टेनिस बॉलवर क्रिकेट खेळायचे. हार्ड बॉलसोबत त्यांनी कधीच क्रिकेट खेळलं नव्हतं. 

एके दिवशी कुरुविला आपल्या मित्रांसोबत एक सिनेमा बघायला गेले होते. त्यावेळी त्यांना कळलं कि थेटरजवळच्या वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई युनिव्हर्सिटीसाठी ओपन सिलेक्शनद्वारे ट्रायल होत आहे. त्यावेळी ऍबे कुरुविला यांना कॉलेजतर्फे सिलेक्शन ट्रायल खेळण्यासाठी सांगण्यात आलं, पण ऍबे कुरुविला यांची ट्रायल देण्याची अजिबात इच्छा नव्हती.

ट्रायलसाठी गेल्यानंतर त्यांनी आपल्या मनाने दोन चार बॉल फेकले तेव्हा तिथे उपस्थित असलेले सिलेक्टेर्स म्हणून माजी क्रिकेटर आणि भारताचे फास्टर बॉलर रमाकांत देसाई होते. देसाईंनी त्यांची टेनिस बॉल वाली बॉलिंग बघून त्यांना तात्काळ रिजेक्ट केलं. 

पण ऍबे कुरुविलाला याबद्दल जास्त काही वाईट वाटलं नाही पण काही काळानंतर त्यांची निवड रणजीच्या फायनलला झाली. हाच त्यांचा फर्स्ट क्लास डेब्यू होता. विशेष गोष्ट हो होती कि याआधी त्यांनी एकही क्लब मॅच खेळली नव्हती. मफतलाल बॉलिंग स्कीमद्वारे त्यांना संधी मिळाली. इंग्लंडच्या माजी खेळाडूकडून त्यांनी बॉलिंग प्रशिक्षण घेतलं. फ्रॅंक टायसनच्या नेतृत्वात त्याने बॉलिंगचे धडे गिरवले. भारतात आल्यावर त्यांच्या बॉलिंगच बरंच कौतुक झालं.

प्लस पॉईंट कुरुविलाचा हा होता कि साध्या पिचवर मिळणारी स्पीड आणि बॅट्समनच डोकं उडेल इतका खतरनाक बाउन्सर. हे भारताच्या इतर बॉलरला कुणालाच त्यावेळी जमत नव्हतं कारण ऍबे कुरुविला यांची उंची. त्यांच्या अशा भेदक बॉलिंगच्या जोरावर ते लवकरच सिलेक्टर लोकांच्या नजरेत आले. रणजी ट्रॉफीसाठी ऍबे कुरुविला यांना रमाकांत देसाई यांनीच निवडलं जे अगोदर कुरुविला यांना सुरवातीला रिजेक्ट केलं होतं. 

१९९७ साली कुरुविला यांचं सिलेक्शन वेस्ट इंडिज टूरसाठी झाली. तेव्हा डेब्यू मॅचमध्येच त्यांनी चार विकेट मिळवत आपली दहशत दाखवून दिली. भारतातर्फे त्यांनी एकूण १० टेस्ट आणि २५ वनडे सामने खेळले. दोन्हींमध्ये त्यांनी २५-२५ विकेट मिळवल्या होत्या.

ऍबे कुरुविला यांचं करियर १९९७ मध्ये सुरु झालं आणि १९९७ लाच संपलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भलेही त्यांनी विशेष काही केलं नाही मात्र रणजी स्पर्धांमध्ये ते कायम फॉर्मात असायचे. २९० विकेट त्यांनी रणजी स्पर्धेत मिळवल्या होत्या. इतक्या लवकर करियर सॅम्पल म्हणून अनेक जण त्यांना प्रश्न विचार तासाचे तेव्हा ऍबे कुरुविला एकच उत्तर द्यायचे कि,

कमीत कमी मी एक वर्षासाठी खेळलो, असे बरेच चांगले क्रिकेटर आहेत ज्यांना भारताकडून एक मॅचसुद्धा खेळता येत नाही. अशा लोकांची मोजणीही आपण करू शकणार नाही.

खरतर ऍबे कुरुविला हे अत्यंत नम्र स्वभावाचे होते. पुढे त्यांनी २००० साली रणजी क्रिकेट स्पर्धेतुन त्यांनी निवृत्ती स्वीकारली. २०११-२०१२ मध्ये त्यांनी विविध निवड समितीत कामही केले. २०१२ मध्ये ते मुंबईच्या निवड समितीचे मुख्य निवडकर्ते होते.

ऍबे कुरुविलाला भारतीय संघाकडून खेळण्यासाठी बऱ्याच उशिरा निवडलं गेलं होतं. स्विंग बॉलिंग आणि तेजतर्रार स्पीड हि ऍबे कुरुविलाच्या बॉलिंगची वैशिष्ट्ये होती. भरदार उंचीचा त्याला बॉलिंग करताना फायदासुद्धा होत असे. त्याच्या बाउन्सरपासून खेळाडू कायम वाचायला बघायचा. भारताच्या क्रिकेट टीमचा तो बच्चन होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.