जसे मोदींसाठी अमित शहा तसे सीआयडीसाठी अभिजित

एक काळ होता जेव्हा भारतात क्राईम सिनेमा, कथा, मालिका यांचं फॅड आलं होतं. डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी, करमचंद या सारख्या सिरीयल तेव्हा भरपूर चालायच्या आणि त्यातले मुख्य पात्र लोकांच्या तोंडपाठ व्हायचे. अशीच एक मालिका जिने इतिहास रचला ती म्हणजे सीआयडी. या मालिकेतील जवळपास सगळेच पात्रं लोकांच्या परिचयाचे आहेत. एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजित, फ्रेड्रिक्स, विवेक, साळुंके, विद्या, तारीका अशी सगळीच पात्र. पैकी आपण अभिजित श्रीवास्तव यांच्याविषयी जाणून घेऊया.

सीआयडी सिनियर इन्स्पेक्टर अभिजित अशी ओळख आपल्याला ज्ञात आहे पण त्याचं खरं नाव आहे आदित्य श्रीवास्तव.

नाटक, सिनेमा, मालिका सगळ्या ठिकाणी परफेक्ट बसणारं पात्रं म्हणजे आदित्य श्रीवास्तव.घराघरात सीआयडीमुळे या अभिजित म्हणून ते फेमस झाले खरे व प्रचंड पोटेन्शियल असलेला अभिनेता म्हणून आदित्य श्रीवास्तव बॉलिवूडमध्ये ओळखला जातो.

21 जुलै 1968 रोजी प्रयागराजमध्ये आदित्य श्रीवास्तवचा जन्म झाला. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना नाटकांशी आदित्याचा संबंध आला. प्रयागराजमध्ये त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली. हळूहळू अभिनयात रस वाटू लागल्याने आणि हे काम आपल्याला जमू शकतं असा आत्मविश्वास आल्याने त्यांनी अभिनयालाच आपलं व्यावसायिक क्षेत्र करायचं ठरवलं.

पण हे सगळं प्रयागराजमध्ये राहून जमणार नव्हतं त्यासाठी बाहेर पडणं गरजेचं होतं तेव्हा त्यांनी सामान बांधलं आणि दिल्ली गाठली.

दिल्लीत नाटकाच्या ग्रुपला जॉईन झाल्यावर जवळपास डझनभर सिरियलमध्ये आदित्य श्रीवास्तव यांनी काम केलं. याच काळात त्यांच्या अभिनयाची चर्चा दूरवर पोहचू लागली होती.

याच काळात दिग्दर्शक शेखर कपूर यांची नजर आदित्य श्रीवास्तववर पडली. शेखर कपूर तेव्हा बँडीट क्वीन या सिनेमाच्या तयारीला लागले होते. यात फुलनदेवीच्या नवऱ्याचा रोल आदित्यला मिळाला आणि 1994 साली जेव्हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा आदित्यच्या भूमिकेचा मोठा गवगवा झाला.

बँडीट क्वीन या सिनेमातील आदित्यचं पात्रं बघून आजही लोकांच्या मनात शिव्याच येतात इतका अस्सल अभिनय त्यांनी केला होता.

नंतर गोविंद निहलाणींचा संशोधन, हजार चौरसी की माँ अशा दर्जेदार सिनेमांमध्ये छोटे काम मिळाले. ए शादी नहीं हो सकती, आहट, मलबार हिल अशा अनेक सिरियलमध्ये काम त्या दरम्यान आदित्य श्रीवास्तवने केलं होतं. काम करत असताना समाधान मिळत नसल्याचं आदित्य श्रीवास्तवला जाणवलं होतं पण सत्या सिनेमाने पुन्हा एकदा त्यांच्यात कामाप्रति उत्साह जागवला.

सत्या नंतर आदित्यला बऱ्याच सिनेमांच्या ऑफर आल्या पण त्यातल्या त्याने मोजक्याच फिल्म केल्या.

यापैकी मणी रत्नमचा दिल से. या सिनेमांमुळे थेट सीआयडीची ऑफर त्याला आली पण तेव्हा त्याने आपण फक्त 26 एपिसोड करू असं सांगून टाकलं होतं. कारण तेव्हा अनुराग कश्यपच्या पांच या सिनेमांमध्ये आदित्य अभिनय करत होता पण हा सिनेमा सेन्सरला अडकला आणि इकडे मग सीआयडीमध्ये आदित्य पुन्हा इन झाला.

सीआयडी सुरू झाल्यावर 39 व्या एपिसोडला क्रिमिनल म्हणून आदित्य आपल्याला दिसतो पण नंतर त्याचं काम बघून त्याला थेट इंस्पेक्टर अभिजतचा रोल देण्यात आला आणि नंतर मागे वळून पाहायची गरजच पडली नाही. ब्लॅक फ्रायदे, गुलाल, कालो अशा जबरदस्त सिनेमांमध्ये आदित्य श्रीवास्तव झळकत राहिला खरा पण त्याची ओळख सीआयडीचा अभिजित म्हणून कायम झाली आणि कायम राहील.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Shreya tatke says

    Cid is world best serial and all officers are my favourite ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍😊😊👌👌👌👌👌👍👍👍👍👍

Leave A Reply

Your email address will not be published.