ज्युनिअर बच्चनने झीनत अमानला वन नाईट स्टँडची ऑफर दिलेली !!

तर आपले महान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या महान नावाच्या सिनेमाच नेपाळ काठमांडूमध्ये शुटींग सुरु होतं. साल असाव 1982. बच्चन अगदी त्याच्या करीयरच्या टॉपला होता. सगळा भारत त्याच्यासाठी वेडा होता.

फक्त प्रेक्षकच नाही तर इंडस्ट्रीमधल्या अनेक हिरोईनसुद्धा. नुकतच त्याच आणि रेखाच प्रकरण जया बच्चनने शांत केलेलं. पण नव्याने त्याच्या आणि परवीन बाबीच्या लफड्याची चर्चा सुरु होती. महान मध्ये ती होती. 

खर तर महान मध्ये बच्चनचा ट्रिपल रोल होता. त्यामुळे हिरोईन सुद्धा तीन होत्या. वहिदा रेहमान, परवीन बाबी आणि झीनत अमान. वहिदा रेहमान यांचं काय वय झालेलं पण परवीन आणि झीनत या त्याकाळच्या सेक्स बॉम्ब म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांनी भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिरोईनच्या देखणेपणाची व्याख्या बदलून टाकलेली.

एवढ्या हॉट हिरोईन्स बरोबर अमिताभला एकट्याला पाठवायला जया बच्चन काही दुध खुळी नव्हती.

त्यात परवीन बाबीबद्दलच्या चर्चा तिच्या सुद्धा कानावर आलेल्या. तिने ठरवलं आपण सुद्धा शुटींगसाठी नेपाळला जायचं. पोरांना सुद्धा सुट्टी होती. त्यानिमित्ताने फॅमिली हॉलिडे सुद्धा होईल असा संसारी हिशोब तिने मांडला. बच्चनला होय म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता.

सगळ बच्चन कुटुंब काठमांडूला हजर झालं. अमिताभ आणि झीनतवर चित्रित झालेले प्यार में दिल के मार दे गोली असो किंवा बच्चन बाबी वर चित्रित झालेले ये दिन तो आता है इक दिन जवानी में गाण्याच्या शुटींग वेळी जया बच्चन डोळ्यात तेल घालून सेटवर लक्ष ठेवून होती.

हे झालं मोठ्या बच्चनच. पण ज्युनिअर बच्चन अभिषेक हा देखील काही कमी नव्हता. त्याला झीनत अमान खूप आवडायची.

झीनतला देखील हा छोटू खूप आवडायचा. एकदा रात्री सगळे गप्पा मारत बसलेले. अभिषेक भाऊ झीनत शेजारीच घुटमळत होता. खूप रात्र झाल्यावर जया बच्चनने अभिषेकला हाक मारली. त्याने झीनतला बाय म्हटले, झीनत सुद्धा तिच्या बेडरूममध्ये निघाली. तेवढयात अभिषेकने तिला प्रश्न विचारला,

“आप अकेले सोते हो”

झीनतने मान डोलावली. अभिषेक हळूच म्हणाला,

“क्या मै आपके साथ सोने आऊ?”

झीनत एक क्षण दचकली. नंतर जोर जोरात हसू लागली.

त्याच झालं अस होतं की अभिषेक होता अजून लहान. त्याला कधी एकट झोपायची सवय नव्हती. कायम आईवडिलासोबत किंवा आज्जी आजोबांच्या सोबत तो झोपायचा. मग बिचारी झीनत एकटी कशी झोपेल, तिला रात्री भीती वाटेल या उद्दात्त हेतूने वन नाईट स्टँडची ऑफर दिली.

झीनत अमान सुद्धा काही कच्च्या गुरूची चेली नव्हती. तिने त्याला हसत हसत सांगितलं,

“तुम थोडे बडे हो जाओ उसके बाद “

ह किस्सा खुद्द अभिषेक बच्चनने आपल्या यारोंकी बारात या शो वेळी सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.