6 वर्षीय मुलीने पॉकेटमनी मधून 3.6 कोटी रुपयांचे घर खरेदी केलंय….
आजच्या अत्यंत फुगलेल्या बाजारपेठेत घर घेण्याचे स्वप्न पाहण्यासाठी सहस्त्राब्दी संघर्ष करत राहावे लागतात. चांगल्या एरियात चांगलं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि आज घडीला घरांचे नुसते रेट ऐकूनच आपलं मनातल्या घराचं बांधकाम गळून पडतं. त्यातही आपल्याकडे बांधून ठेवलेल्या घराचे, जमिनीचे वाटे करायचे हा फॅड जास्त आहे त्यामुळे घर वैगरे असे जास्त प्रश्न येत नाही. पण प्रत्येकाला स्वतःच घर हवं असतं, त्यात आपल्याला हव्या त्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे ठेवता येईल अशा असतात. पण ऑस्ट्रेलियात एका सहा वर्षाच्या मुलीने घर घ्यायचं या ट्रेंडमध्ये उडी मारली आणि आपल्या अपडेटेड व्हर्जनमध्ये या मुलीने घर घ्यायचं म्हणून पॉकेटमनी जमवायला सुरवात केली.
रुबी नावाच्या एका सहा वर्षाच्या मुलीने तिचा भाऊ गुस आणि बहीण लुसी मॅक्लेलनसह ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधील क्लाइड येथे स्वतःचे घर खरेदी केले आहे. A$671,000 (रु. 3.6 कोटी) किमतीची मालमत्ता खरेदी करण्यासाठी भावंडांनी त्यांच्या खिशातले मोडले आणि घर खरेदी करण्यासाठी पैसे जमा केले. या मुलांचे वडील, कॅम मॅक्लेलन, एक मालमत्ता गुंतवणूक तज्ञ आहेत ज्यांनी त्यांना या घर खरेदी प्रक्रियेत मदत केली. या छोट्या मुलीने हा अचाट पराक्रम करताना आपल्या भावना मांडल्या की,
“माझे नाव रुबी आहे आणि मी सहा वर्षांची आहे आणि मी माझे पहिले घर खरेदी करणार आहे,”
त्यांचे वडील म्हणतात की “आर्थिकदृष्ट्या त्यांनी प्रत्येकाने $2000 चे योगदान दिले आहे आणि त्यांनी ते साचवलेले पैसे आहे,” एक हे पोरं आहेत आणि एका बाजूला आपल्याकडचे गोळ्या बिस्किटात म्हणा किंवा व्यसनात पैसे उडवणारे पोरं आहेत. आता तुम्ही म्हणाल मुलांनी पैसे कसे कमवले ? एवढं छोटं वय आणि एवढे पैसे कुठून आले तर त्यालाही कारण आहे. मुलांनी घरातील कामे करून संपत्ती जमा केली. त्यांनी त्यांच्या वडिलांचे सुधारित सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक देखील पॅक केले.
पुस्तकाबद्दल रुबीचे वडील सांगतात की “माझ्या मुलांनी पुरेशी वय झाल्यावर वापरावे यासाठी हे लिहिलेले आहे, म्हणून मी मालमत्ता पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व चरणांची रूपरेषा सांगितली आहे,” वडिलांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी स्वप्नवत वाटणारी गोष्ट सत्यात आणली.
कॅमच्या मते, घराची किंमत 10 वर्षांत दुप्पट होईल. “त्या ब्लॉकची किंमत आधीच $70,000 वर गेली आहे, त्यामुळे त्यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे, आणि स्वस्तात मस्त घर मिळवलं आहे” आता जे हे पैसे जमा करून महागडं घर घेणारे पोरं आहेत ना अर्थात या तरुण जमीनदारांनी 2032 मध्ये मालमत्ता विकून नफा विभाजित करण्याची योजना आखली आहे. म्हणजे बघा भविष्याचे प्लॅन सुद्धा रेडी आहेत पोरांचे.
मुलं इतके हुशार आहेत म्हणल्यावर बाप पण काहीतरी खतरनाक असेलच. काम न करता दरवर्षी $250,000 कमवण्याचा मार्ग शोधून कॅम वयाच्या 36 व्या वर्षी निवृत्त होण्यात यशस्वी झाला. त्याने 20 व्या वर्षी मालमत्ता गोळा करण्यास सुरुवात केली होती आणि काम करू नये म्हणून दरवर्षी पुरेसे निष्क्रिय उत्पन्न मिळत राहील याची सोय करून ठेवली आहे.
पुढे ते म्हणतात “मी तीन ते चार नोकर्या करत होतो, फोर्कलिफ्ट ड्रायव्हिंगपासून ते सुपरमार्केटमध्ये शेल्फ् ‘च्या बारीकसारीक वस्तू ठेवण्यापर्यंत सर्व काही, मी ते जगण्यासाठी केले, गुंतवणुकीसाठी माझी प्रेरक शक्ती मला माझ्या अलार्म घड्याळाचा तिरस्कार वाटत होता, मला 50 वर्षे काम करत राहायचे नव्हते. म्हणून माझ्यापेक्षाही माझी मुलं हुशार निघाली आणि त्यांच्यामुळे मलाही वेगळा विचार करता आला.
3.6 कोटी किंमत ऐकूनच डोळे भिरभिरायला लागले पण रुबी आणि तिच्या भावंडांनी वडिलांच्या मदतीने हे अशक्य वाटणारं स्वप्न सत्यात उतरवलं आहे.
हे ही वाच भिडू :
- ६ लग्न- १६ मुले, आता पोटगीत ५५०० कोटी खर्च करणाऱ्या दुबईच्या राजाची कहाणी
- हातगाडीवर भाजी विकणाऱ्या शेतकऱ्याने कंपनी उभारून अडीच कोटींची उलाढाल केलीय….
- लस बनवणाऱ्या पूनावाला फॅमिलीनं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला तब्बल ५०० कोटींचं गिफ्ट दिलंय
- मुलायमसिंग यादवांनी पाकिस्तानला दोन हजार कोटींची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती