‘बीटिंग द रिट्रीट’मध्ये 70 वर्षांपासून वाजवल्या जाणाऱ्या ट्यूनची ही गोष्ट…

मागच्या दोन वर्षाचा आढावा बघता प्रजासत्ताक दिनाच्या माहितीपत्रकानुसार यंदा या राष्ट्रीय दिनाच्या महोत्सवाची सांगता ‘ सारे जहाँ से अच्छा ‘च्या धूनने होणार आहे जसं की 2020 आणि 2021 साली झाली. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या देशात २६ जानेवारीच्या परेडसह दिल्लीतील इंडिया गेट ते संसद भवनापर्यंत अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे यंदा तो कार्यक्रम फिका पडणार आहे म्हणजे ज्या जोमाने परेड होतात त्यात काहीशी कमी जाणवणार आहे.

२६ जानेवारीच्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २९ जानेवारीला विजय चौकात ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये नौदल, हवाई दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे पारंपारिक बँड वेगवेगळे सूर वाजवून हुतात्म्यांचे स्मरण करतात. यादरम्यान अबाइड विथ मी ( abide with me ) ही धून वाजवली जायची, जी आता वाजणार नाही तर आता त्याच्या जागी दुसरी धून वाजवली जाणार आहे.

सगळ्यात आधी हे जाणून घेणे गरजेचे आहे की ‘बीटिंग द रिट्रीट’ म्हणजे नेमके काय आणि त्यात ही धून का वाजवली जाते? आणि भिडू हेही सांगणार आहे की आता या ट्यूनच्या जागी कोणती धून वाजणार?

‘बीटिंग द रिट्रीट’ म्हणजे काय?

‘बीटिंग द रिट्रीट’ ही शतकानुशतके जुनी लष्करी परंपरा आहे ज्यामध्ये सूर्यास्तानंतर सैन्य रणांगणातून परत येताना परतीचा रणशिंग वाजवला जात असे, म्हणजे लढाई थांबवली जायची, जेणेकरून सर्वजण आपली शस्त्रे खाली ठेवून युद्धस्थळापासून दूर निघून जात असे. यालाच ‘बीटिंग द रिट्रीट’ म्हणतात. आता दरवर्षी त्याच धर्तीवर २६ जानेवारी या चार दिवसीय कार्यक्रमात शेवटच्या दिवशी विजय चौकात ‘बीटिंग द रिट्रीट’चे आयोजन करण्यात येते. या दरम्यान अनेक विविध बँड आपले परफॉर्मन्स देतात आणि नंतर रिट्रीटचा ट्रम्पेट निनादतो तेव्हा सर्व बँडमास्टर राष्ट्राध्यक्ष/ राष्ट्रपती यांच्याकडे जातात आणि त्यांचे बँड परत घेऊन जाण्याची परवानगी मागतात, तेव्हा या ट्रम्पेटद्वारे सांगण्यात येते की कार्यक्रम संपला आहे.

या कार्यक्रमाच्या शेवटी ‘अबाइड विथ मी’ हे गाणे 1950 सालापासून सतत वाजवले जात आहे, मात्र 2020 मध्ये ‘बीटिंग विथ मी’ या गाण्याची धून आता ‘बीटिंग’मध्ये वाजवली जाणार नाही, असे सांगण्यात आल होतं. रिट्रीट सोहळ्यात आता अबाईड विथ मी बंद होऊन त्याच्या जागी ‘वंदे मातरम’ वाजवलं जातं. इतक्या वर्षात असं झालं नव्हतं मात्र 2020 आणि 2021 ला हे झालं.

या गाण्यामागील कथा काय आहे?

हे गाणे स्कॉटलंडचे अँग्लिकन मंत्री हेन्री फ्रान्सिस लाइट यांनी लिहिले होते. साधेपणाने आणि दु:खाने गायल्या गेलेल्या या गाण्याला स्तोत्र म्हणतात, जे बहुतेक चर्चमध्ये गायले जात असे. हे अनेकदा आंतरराष्ट्रीय संगीतकार विल्यम हेन्री मंक यांच्या सुरात गायले जाते. म्हणूनच ‘बीटिंग द रिट्रीट’मध्ये आर्मी बँडने हे गाणे अगदी सहज आज प्रेमाने वाजवले आहे.

हेन्री फ्रान्सिस लायटे यांनी हे गाण १८२० मध्ये लिहिले होते, जेव्हा ते शेवटचा श्वास घेत असलेल्या आपल्या मित्राला भेटले होते. या दु:खाच्या गाण्यात त्यांनी आपली व्यथा सांगितली आणि हे गाणे 1847 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी आपल्याजवळ ठेवले. हेनरी फ्रान्सिस लाइट यांच्या अंत्यसंस्काराच्या निमित्ताने हे गाणे पहिल्यांदा गायले गेले. हे गाणे ख्रिश्चन धर्मात खूप लोकप्रिय आहे. हे गाणे टायटॅनिकच्या बुडण्याच्या वेळी आणि पहिल्या महायुद्धाच्या वेळी अनेक वेळा गायले गेले. हे भारतीय सैन्यात नाही, तर अनेक देशांच्या सैन्यात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ गायले जाते.

आता या गाण्याचा भारताशी काय संबंध?

असे म्हणतात की वैष्णव जन तो आणि राष्ट्रपती महात्मा गांधी यांचे रघुपती राघव राजा राम यांच्यासोबत अबाइड विथ मी हे देखील त्यांच्या आवडत्या गाण्यांपैकी एक होते. म्हैसूर पॅलेस बँडमधून गांधीजींनी ही धून पहिल्यांदा ऐकली. तेव्हापासून असे मानले जाते की महात्मा गांधींमुळे ‘बीटिंग द रिट्रीट’मध्येही ही धून गायली जाते.

आता ‘Abide With Me’ ची जागा कोणत्या गाण्यांनी घेतली आहे?

भारतीय लष्कराच्या माहितीपत्रकानुसार, 29 जानेवारी रोजी होणाऱ्या ‘बीटिंग द रिट्रीट’ समारंभात यापुढे ही धून वाजवली जाणार नाही. त्यानुसार ‘सारे जहाँ से अच्छा’च्या धूनने या वर्षाची सांगता होणार आहे. यावेळी कार्यक्रमात ‘वीर सैनिक’, ‘फॅनफेअर बाय बगलर्स’, ‘आयएनएस इंडिया’, ‘यशस्वी’, ‘जय भारती’, ‘केरळ’, ‘हिंद की सेना’, ‘चरण-दर-चरण’, ‘ए मेरे वतन के लोगों’ या सोबतच 26 ट्यून वाजतील.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.