इतका हूशार माणूस सेनाप्रमुख झाला पण लोकांना ते “ब्राह्मण” असल्याचं कौतुक वाटतं. 

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हे भारताचे नवे लष्करप्रमुख होणार आहेत. सध्या ते लष्कराचे उपप्रमुख असून ३१ डिसेंबर रोजी ते लष्करप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारतील. नवे लष्करप्रमुख हे मराठी व्यक्ती असणार आहेत म्हणून मराठी माणसांचा कंठ दाटून आला. ते साहजिकच होते. आजवर जनरल अरुणकुमार वैद्य, लेफ्टनंट जनरल थोरात, नौदल प्रमुख भागवत, एअर मार्शल मुळगावकर अशी कितीतरी मराठी लोकं सैन्यात मोठ्या पदावर विराजमान झाली आहे. मात्र आजवर ब्राह्मण माणूस इतक्या मोठ्या पदावर गेल्याची इतकी चर्चा झाली नाही तितकी आज होतेय. 

आत्ता अशी चर्चा खरेच चालू आहे का की आम्ही उगीच गावगप्पा हाणतोय. तर हा स्क्रिनशॉट पहा.

इथे लिहलं आहे की ब्राह्मण समाजाचा माणूस लष्करप्रमुख झाला. 

Screenshot 2019 12 19 at 2.00.06 PM

सोशल मिडीयावर अनेक ठिकाणी ते ब्राह्मण असल्याबद्दल कौतुक करण्यात आलं आहे. वास्तविक या चुकीची कोणतीच गोष्ट नाही. पण ब्राह्मण व्यक्ती लष्करप्रमुख झाला म्हणून इतकं कौतुक होतय म्हणून एकाने प्रश्न विचारला अरुण वैद्य देखील ब्राह्मण होते तर त्यास प्रत्युउत्तर म्हणून ते CKP होते ब्राह्मण नव्हते असे उत्तर मिळते. 

Screenshot 2019 12 19 at 4.00.00 PM
अशा गोष्टीला विरोध करणाऱ्या कौस्तुभ खांडेकर यांनी लष्करप्रमुखांच्या जातीवरून कौतुक करणाऱ्यांना टोला लगावताना, कधी सुधारणार आपण असा प्रश्न विचारला. ते पुढे म्हणतात की, नरवणे साहेब लष्करप्रमुख झाले ते ब्राह्मण म्हणून झाले हे म्हणणारे त्यांच्या मेहनतीचाच नव्हे तर लष्कराच्या धर्मनिरपेक्ष परंपरेचाही अपमान करत आहेत का हा प्रश्न इथे पडतो आहे.

असो मराठी माणूस असण्याबाबत ज्याप्रमाणे कौतुक झाले तसेच ब्राह्मण असण्याबाबत कौतुक होत असेल असे समजून पुढे जावू. कारण जातीभेद नष्ट झाला असे कितीही वाटले तरी प्रत्येकाला आपआपल्या जातीबद्दल अभिमान वाटतोच. समजा लष्करप्रमुख हे मराठा, लिंगायत, दलित अथवा कुठल्याही इतर जातीचे असते तरी त्यांच कौतुक त्या त्या जातीचे राजकारण करणाऱ्या लोकांनी केलच असच. 

पण इथे मुद्दा येतो ते “लष्करप्रमुख” या पदाचा आणि अभिमानाची जागा दूसऱ्यांना हिणवण्याने घेतल्यानंतर. 

कारण एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये देशपांडे नावाच्या एक महिला खा. राजू शेट्टींना फोन लावतात त्यामध्ये त्या म्हणतात, 

नमस्कार साहेब मी देशपांडे बोलतेय. आमचा माणूस झाला लष्करप्रमुख सर. सैनिक आमचा म्हणूनच लष्करप्रमुख होतात. 

राजू शेट्टींना त्या जातीवादा कमी करायला सांगून तुमच्या असल्या राजकारणामुळेच तुम्ही पडल्याचे सांगतात. 

आत्ता त्यांचा राजू शेट्टींवरती निघण्याच कारण म्हणजे, 

राजू शेट्टी म्हणाले होते, 

देशासाठी देशपांडे, कुलकर्णींची मुलं शहीद होत नाहीत, शेतकऱ्यांची मुलं शहीद होतात. 

या वक्तव्याबाबत राजू शेट्टींना यापुर्वी माफी देखील मागितली होती. 

असो पण इथे ते ब्राह्मण आहेत म्हणून ब्राह्मण समाजातील काही ठरावीक गटाने त्यांचा कौतुक सोहळा चालवलेला आहे. शिवाय ते मराठी असण्याची अस्मिता देखील आहेच. ते पुण्याचे आहेत म्हणून अस्मिता दाखवणारे देखील आहेत. 

पण ते याहूनही काकणभर अधिक आहेत हेच सांगण्यासाठी हा लेख. 

  • लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांच सुरवातीचं शिक्षण पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेतून झालं.  
  • त्यानंतर त्यांनी NDA मधून लष्कराचं शिक्षण घेतलं. पुढे ते देहरादूनच्या इंडियन मिलीटरी अॅकेडमीत शिक्षणासाठी गेले.
  • त्यांच्या आई या पुणे आकाशवाणीमध्ये होत्या. सुधा नरवणे यांच नाव पुणेकरांना पक्क आठवतं. मनोज नरवणे यांचे वडिल हवाई दलात कार्यरत होते.
  • १९८० साली त्यांनी शीख लाईफ इंन्फन्ट्री रेजिमेंटमधून सैन्यात प्रवेश केला. जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत असताना त्यांनी राष्ट्रीय रायफल्स बटालियन्सच नेतृत्त्व केलं होतं तर मेजर जनरल म्हणून ते आसाम रायफल्सचे इन्स्पेक्टर जनरल देखील होते.
  • ते आर्मीच्या पुर्व विभागाचे प्रमुख होते. म्यानमार येथील दूतावासात देखील ते कार्यरत होते तसेच जम्मू काश्मीरमधील बटालियनची नेतृत्व केल्याबद्दल सेना पदक, आर्मी ट्रेनिंग कमांडमध्ये सेवा केल्याबद्दल परम विशिष्ट सेवा पदक, स्ट्राईक कॉर्पचे नेतृत्व केल्याबद्दल अतिविशिष्ट सेवा पदक आणि आसाम रायफल्सचे महानिरिक्षक म्हणून नागालॅंडमधील सेवेसाठी विशिष्ट सेवा पदकाने त्यांना गौरवण्यात आले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.