औवेसी हे नाव लातूरजवळच्या औसा गावावरून आले, काय आहे MIM ?

ओवेसी बंधू आणि M.I.M. यांचा संबंध नंतरचा. आज हा पक्ष A.I.M.I.M. आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुसलमीन. आधी ही संघटना फक्त मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन या नावाने होती. आधी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी. निझामाच्या राज्यात. निझामाला खुश करणारी संघटना. निझामाचा आशीर्वाद असणारी संघटना. हैद्राबाद संस्थानात हिंदू मुस्लीम तसे शांततेत रहायचे.

पण या संघटनेत कासीम रिझवी आला आणि वातावरण विखारी बनू लागलं. निझाम बाजूलाच राहिला आणि रिझवीच्या लोकांनी हिंदूंवर अत्याचार सुरु केले. रझाकार या नावाने आपण ज्यांना आज ओळखतो ते या रिझवीचे लोक. रिझवीच्या अत्याचाराच्या कहाण्या मराठवाड्यातील जुनी माणसं आजही सांगतात. रिझवी एवढा क्रूरकर्मा झाला होता की पुढे त्याने निझामाला जुमानणे सोडून दिले. भारत सरकारला थेट धमक्या द्यायला सुरुवात केली. शांततेची बोलणी चालू असताना रिझवी सतत युद्धाची भाषा करायचा. रिझवी आणि त्याच्या संघटनेचा हैद्राबाद संस्थानाने भारतात सामील व्हायला प्रचंड विरोध होता. त्याला भारताशी युध्द करायचं होतं.

भारताला आपण सहज हरवू शकतो असा त्याचा फाजील आत्मविश्वास होता. पण भारताने केलेल्या सैनिकी कारवाईसमोर त्याची फजिती उडाली. निझामाला शरण यावं लागलं. रिझवीला अटक झाली.

मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन संघटनेचे लोक पाकिस्तानात पळून गेले. जे उरले त्यांनी पुन्हा तोंड वर केलं नाही. मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन वर बंदी होती. पुढे रिझवीची मुकाट्याने पाकिस्तानात निघून जाण्याच्या बोलीवर सुटका झाली. पण रिझवीसारखी सैतान माणसं मुकाट्याने जात नसतात.

जाता जाता रिझवीने मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीनच्या लोकांची मिटिंग घेतली. खरतर त्यात फार कुणी आलेच नाहीत. पण जे लोक आले त्यांनीसुद्धा या संघटनेचं काम चालू ठेवायला नकार दिला. कुणीच आपली संघटना चालवायला तयार नाही हे पाहून रिझवी निराश झाला होता.

पण एका माणसाने ही जवाबदारी स्वीकारली. तो माणूस म्हणजे अब्दुल वाहिद ओवेसी. असदुद्दिन ओवेसी आणि अकबर ओवेसी यांचे ते आजोबा. औवेसी हे नाव लातूर जवळच्या औसा गावावरुन आले. सल्लाउद्दीन हे औस्याचे तर कासिम रिझवी हा लातूरचा. 

हैद्राबादची निझामी राजवट संपली. भारत स्वतंत्र झाला. हिंदू मुस्लीम वाद विसरून पुन्हा एकदा हैद्राबाद शांतपणे जगू लागलं. १९५७ का रिझवी सारखा क्रूरकर्मा आपण पाकिस्तानात पाठवून दिला. मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन या संघटनेने नवं रूप धारण केलं. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीन. म्हणजे आजची A.I.M.I.M. पण आजही तिचा उल्लेख सगळीकडे M.I.M असाच केला जातो. ओवेसी बंधू जरी रझाकार आणि रिझवी या गोष्टींचा उल्लेख करत नसले तरी M.I.M. ही ओळख त्यांना पुसता आली नाही.

ओळख सोडा भावना भडकवणारी भाषणं ही MIM ची सुरुवातीपासूनची ओळख आजही कायम आहे. रिझवी देश सोडून गेला आणि एका वर्षाच्या आत अब्दुल वाहिद ओवेसी यांनी संघटना आक्रमक करायला सुरुवात केली. १९५८ साली ओवेसी बंधूंच्या आजोबाला म्हणजे अब्दुल वाहिद ओवेसी यांना सुद्धा चिथावणी देणारी भाषणं केली म्हणून अटक झाली होती. 

१९६० साली झालेल्या निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुसलमीनने महानगरपालिका निवडणूक लढवली. १९६२ ला पाथरगट्टी विधानसभा मतदारसंघातून तो निवडून आला. पुढे हैद्राबादमधला चारमिनार मतदारसंघ हाच MIM ने आपला बालेकिल्ला म्हणून तयार केला.  योगायोगाची गोष्ट म्हणजे द्लीतांसाठी राखीव जागेवरसुद्धा एमआयएमने उमेदवार उभा केला होता आणी तो निवडूनही आला होता. सुरुवातीला एमआयएमचा विरोधक काँग्रेस. मग कॉंग्रेस आणि एमआयएमला एक सामायिक शत्रू मिळाला तो म्हणजे कम्युनिस्ट.

अब्दुल वाहिद ओवेसी यांचे पुत्र सलाहुद्दीन ओवेसी हैद्राबादच्या चारमिनार विधानसभा क्षेत्रातून आमदार झाले. तो एमआयएमचा गड मानला जातो. पुढे ते हैद्राबाद लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून आले. १९८४ ते २००४ दरम्यान सातत्याने लोकसभेवर निवडून जाण्यात त्याला यश आले. विशेष म्हणजे तेलगु देसमच्या भरभराटीच्या काळात देखील हि घौडदौड कायम होती. सलाहुद्दीन ओवेसी यांच्यावरही चिथावणीखोर भाषणामुळे खूपवेळा कारवाई झाली. त्यांना बऱ्याचदा अटकही झाली होती.

१९८६ साली झालेल्या हैद्राबाद महापालिका निवडणुकीत एमआयएमला बहुमत मिळालं आणी त्यांचा महापौर झाला. हैद्राबाद मतदारसंघ तेंव्हापासून एमआयएमचा बालेकिल्ला झाला. 

एमआयएम सध्या देशातला एकमेव मुस्लीम पक्ष आहे ज्याचं अस्तित्व जवळपास देशभर आहे.

आंध्र प्रदेशात तेलगु देसम पार्टीचे एन टी रामाराव यांची सत्ता आली आणि एमआयएमने त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर एमआयएमची भरभराट झाली. आजवर हैद्राबाद मतदारसंघ ओवेसी घराण्याच्या ताब्यात आहे. १९८४ ते २००४ पर्यंत ओवेसींचे वडील सुलतान सलाहुद्दीन ओवेसी हैद्राबादचे खासदार होते.

२००४ पासून असदुद्दिन ओवेसी सलग तीनवेळा हैद्राबादचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. एमआयएम हे मुस्लीम घराणेशाहीचं प्रतिक आहे. योगायोग असा की तिन्ही पिढीतल्या ओवेसीना प्रक्षोभक भाषणामुळे अटक झालेली आहे. देशातलं अशा प्रकारचं हे पहिलं उदाहरण असेल. असदुद्दिन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे ते नेहमी चर्चे असतात. केवळ पंधरा मिनिटासाठी पोलीस हटवा मग मुसलमान आपली ताकद दाखवतील असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या पोलीस कारवाईची भीती एमआयएमला अजूनही आहे हेच यातून दिसतं. असदुद्दिन ओवेसी यांची संसदेतील कामगिरी मात्र उल्लेखनीय आहे. त्यांना संसदरत्न पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. एमआयएमचे औरंगाबादचे आमदार असणारे इम्तियाज जलील आपल्या प्रभावी कामगिरीवर खासदार झाले. त्यांचे बाकी नेते मात्र त्याच त्या हिंदू मुस्लीम वादात अडकून आहेत. चिथावणीखोर भाषणापलीकडे त्यांची विशेष कामगिरी नाही. पण एमआयएम हळू हळू महाराष्ट्रात हातपाय पसरतोय हे नक्की.

नांदेड महापालिकेपासून त्यांनी सुरुवात केली. औरंगाबाद मध्ये वंचित आघाडीच्या माध्यमातून इम्तियाज जलील हे खासदार झाले.  पण धर्माच्या आधारावर आणि थेट नावावर कुठला पक्ष भारतात मोठा होऊ शकत नाही हा इतिहास आहे. बाकी ओवेसी रझाकार आणि रिझवीशी असलेले संबंध नाकारत असतात. पण सख्खा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी यांचेच वक्तव्य त्यांना भारी पडत असतात.

त्यांना कोण आवरणार?

हे ही वाच भिडू. 

2 Comments
  1. Bolbhindu says

    Fake and baseless story

  2. Amjad Gafur Pathan says

    Ani rss hi khup changali ahe kay pan faltu deshala Rss chaltay pan mim chalat nahi kay gamat ahe

Leave A Reply

Your email address will not be published.