म्हणूनच AK47 आजही रायफलच्या विश्वात बाप समजली जाते…

अस म्हणतात की जगात पाच बंदुकांच्या पाठीमागे एक AK47 आहे. बिहारचे दबंग मंडळी म्हणून नका की नक्षलवादी म्हणू नका. भारतीय जवानांपासून ते मोठमोठ्या डॉन मंडळींकडे AK47 रायफल असते. आपला संजू बाबा पण याच मॅटरमध्ये आत गेलेला.

AK47 ची वेगळी ओळख करुन द्यायची काही गरज वाटत नाही, कारण ही रायफल एक कल्ट आहे. अमरीश पुरीच्या मागं उभा राहणाऱ्या साईडर पासून आपल्या डोळ्यात ही रायफल आणि रायफलचं दिसणं डोळ्यात अगदी तंतोतंत बसलेलं आहे. 

असो, तर हा लेख याच रायफलची माहीती सांगणारा आहे.

ही रायफल तयार झाली १९४७ साली. खरं सांगायचं झालं तर त्याअगोदरच तयार झालेली पण तत्कालीन सोव्हिएत युनियने आपल्या लष्कराच्या वापरासाठी ही रायफल स्वीकारली ते साल होतं १९४७ चं. म्हणून या रायफलला ४७ आकडा चिकटला.

या रायफलचं वैशिष्ट थोडक्यात सांगायचं झालं तर,

दर मिनटाला ६५० गोळ्या डागण्याची अद्भूत क्षमता या रायफलमध्ये आहे. अर्धा किलोमिटरच्या अंतराव असणाऱ्याचा अचूक वेध या रायफलने घेता येतो. शिवाय ७.६२ mm ची गोळी घुसली की पुढचा पाणी मागयला देखील रहात नाही. अस सांगतात की गोळी घुसायची पण गरज नाही. 

AK47 ची गोळी अंगाला घासून गेली तरी चिंधड्याा चिंधड्या उडत असतेत. 

Screenshot 2020 07 28 at 4.33.03 PM
मोझांबिक देशाच्या झेंड्यावर असणारी AK47

दूसरी गोष्ट म्हणजे या रायफल मध्ये जास्त टेक्निकल गोष्टी नाहीत. पटकन लोड करुन चटकन हाणत सुटणं यामुळे रायफलचं कौतुक होतं. टोटल आकडेवारी सांगायची झाली तर जगातल्या टोटल रायफल्स पैकी २० टक्के रायफल या AK47 आहेत. आफ्रिकेत मोझांबिक नावाचा देश आहे या देशाच्या झेंड्यावर देखील AK47 चा फोटो आहे.

रायफल पुराणं अती झालं आत्ता मुळ मुद्याला येवूया,

या रायफलचा शोध कोणी लावला आणि कसा ? 

तत्कालीन सोव्हिएत युनियन म्हणजे आजचा उरलेला रशिया आणि इतर देशांचा समुहांच्या राष्ट्रांच्या लष्कराने १९४५ साली रायफल बनवण्याची स्पर्धा आयोजित केली होती. दूसरं महायुद्ध नुकतच पार पडलं होतं. पुढे अमेरिकेचं वजन वाढू लागलेलं. शितयुद्ध येण्यापूर्वीचा तो काळ. अशा काळात सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्यात जगाचा बाप होण्याची स्पर्धा ताणली जाणार होती. 

याच पार्श्वभूमीवर सोव्हिएत युनियनचे लष्कर लष्करी अधिकाऱ्यांच्यात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करत असे.

अशीच एक स्पर्धा होती ती म्हणजे रायफल्स तयार करण्याची. १९४५ साली झालेल्या या स्पर्धेत सोव्हिएत लष्करात असणाऱ्या मिखाईल कलाशनिकोव्ह यांने भाग घेतला. त्याने तयार केलेल्या बंदुकीला पुरस्कार मिळाला.

ज्या रायफलला हा पुरस्कार मिळाला तीच ही AK47.

ऑटोमॅटिक या शब्दाला रशियात आवटोमाट अस म्हणलं जायचं. त्याचा A आणि कलाशनिकोव्ह यांने ही रायफल्स शोधली म्हणून त्याच्या अक्षरातला K आणि 1947 सालात ही बंदुक स्वीकारण्यात आली म्हणून ४७ हा आकडा या रायफल्सला देण्यात आला.

अशा प्रकारे AK47 हे संपुर्ण नाव या रायफलला मिळाले.

साहजिक चुलत्यानं एखादा गुंठा विकत घेतल्यावर आपण पण अर्धा गुंठा काय होईना विकत घेतो त्याचप्रमाणे अमेरिकेने AK47 ला उत्तर म्हणून M16 नावाची बंदुक मार्केटमध्ये आणली.

पुढे व्हिएतनाम युद्ध सुरू झालं तेव्हा AK47 आणि M16 रायफल्स समोरासमोर आल्या. इथे AK47 रायफलने आपली दहशत दाखवली.  एखादा रशियन सैनिक मेला तर अमेरिकन सैनिक आधी त्याची AK47 ताब्यात घ्यायचा आणि M16 गुंडाळून ठेवून पुढचा कार्यक्रम AK47 याच रायफलने पार पाडायचा.

Screenshot 2020 07 28 at 4.33.16 PM
मिखाइल कलाशनिकोव्हचा रशियातला पुतळा

झालं एकीकडे AK47 नाव काढू लागली, त्याला पर्याय म्हणून नाही म्हणलं तरी M16 काही प्रमाणात बाजारात जोर धरू शकली. पुढे काय झालं तर M16 रायफल तयार करणारा अमेरिकेचा युजीन स्टोनर अब्जाधीश झाला. त्याला रायफल्सच्या रॉयल्टीतून पोत्याने पैसे मिळू लागले.

दूसरीकडे आपला मिखाइल कलाशनिकोव्ह मात्र सोव्हिएतच्या सैन्यात नोकरी करून ३०० डॉलरच्या पेन्शनवर काम भागवू लागला. पण भिडूंनो मिखाइल कलाशनिकोव्हचे मात्र रशियात पुतळे बांधले गेले.

रशियन व्होडकाला देखील त्याचं नाव देण्यात आलं. सोव्हिएत युनियने या माणसाला इज्जल व्यवस्थित दिली हे मात्र नक्की.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.