त्यांनी अंध मुलांना कलेक्टर करण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. 

MPSC, UPSC बद्दल विशेष सांगून या लेखाची सुरवात करावी अस काही नाही. हा खेळ काय असतो ते महाराष्ट्रातल्या ९० टक्के मुलांना चांगलाच माहिती आहे. अस म्हणतात की, ज्याने स्पर्धा परिक्षा केली नाही त्यांनी मनुष्य जातीत जन्माला येण्याचा संपुर्णत: फायदा घेतला नाही.

असो तर विषय असा आहे की नुकताच उपजिल्हाधिकारी म्हणून प्रांजल पाटील यांनी कार्यभार स्वीकारला. प्रांजल पाटील या भारताच्या पहिल्या अंध जिल्हाधिकारी आहेत. प्रचंड अडचणींवर मात करून त्यांनी UPSC मध्ये रॅंक मिळवला. तिरुवनंतपुरमच्या नव्या उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांच कौतुक होतं आहे. 

अशा वेळी आम्ही तुम्हाला एक वेगळ्या माणसाची गोष्ट सांगतो. या माणसाच क्रेडिट काय तर,

भारतातल्या अंध मुलांना कलेक्टर करण्याच स्वप्न तो बघतोय.

अंध विद्यार्थांना तो शिकवतोय. स्पर्धा परिक्षेसाठी तयार करतोय आणि लढायला शिकवतोय. 

ते नेमकं काय करतात त्यापुर्वी आपण अंध व्यक्तिंना स्पर्धा परिक्षेची तयारी करताना कोणत्या अडचणी येतात ते पाहूया. सर्वात मोठ्ठी अडचण असते ती ब्रेल लिपीतील पुस्तकांची. UPSC सारख्या स्पर्धा परिक्षांसाठी वेगवेगळ्या क्लासेसच्या नोट्स, संदर्भ साहित्य, पुस्तके यांचबरोबर दररोजचे वर्तमानपत्र वाचायला लागतात.

अशा वेळी सर्व साहित्य ब्रेल लिपीत मिळणं अशक्य असतं. आजच्या घडीला अस सांगितलं जातं की कित्येक प्रयत्न करून UPSC च्या परिक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकांपैकी फक्त ८० टक्के पुस्तकेच ब्रेल लिपीत करण्यात यश आलं आहे. 

अशा समस्येवर मात करत हैद्राबादचे राघवेंद्र २०१६ पासून UPSC साठी अंध मुलामुलींना ट्यूशन देत आहेत.

त्यासाठी त्यांनी कित्येक पुस्तक ब्रेल लिपीत केली आहेत. त्याचसोबत ऑडिओबुक फॉर्मेंटमध्ये ते पुस्तक पब्लिश करत आहे. राघवेंद्र सांगतात आज माझ्याकडे बऱ्यापैकी साहित्य हे ब्रेल लिपीत व ऑडिओमध्ये आहे पण यासाठी मला तब्बल सात वर्ष लागली. यासाठी राघवेंद्र यांचे स्वत:कडचे पाच लाख रुपये खर्च झाले. 

 अकेला राघवेंद्र यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितल होतं की,

मी २०१६ साली अमेरिकेत गेलो होतो. तिथे अंध मुलांसाठी असणाऱ्या उच्चशिक्षणाच्या सोयी पाहण्यात आल्या. आपल्याकडे अंध किंवा दिव्यांग व्यक्तींनी प्राथमिक शिक्षण घ्यावं म्हणून उपाययोजना करण्यात येतात पण त्यांनी उच्चशिक्षण घ्याव. शास्त्रज्ञ, संशोधक, प्रशासकिय सेवेत यावं हा विचार कोणी करत नाही. अंध अथवा दिव्यांग आहे म्हणून नेहमी कमी दर्जाचे काम करत राहावं अस अनेकांच मत असतं. 

अमेरिकेतली सुविधा पाहिल्यानंतर मी माझ्या ट्यूशनमार्फत अंध व्यक्तिंना शिकवण्याचा संकल्प केला.  

राघवेंद्र यांनी हैद्राबादमध्ये २००१ साली UPSC साठी ट्यूशनची सुरवात केली होती. दिलसुखनगर भागात ते आपले क्लासेस चालवतात. ते स्वत: १९९४ ते ९९ या काळात स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत होते. पण अपयश आल्याने त्यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना ट्यूशन घेण्यास सुरवात केली. २०१६ साली त्यांना अंध मुला मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी पाऊल टाकण्यास सुरवात केली व त्यातूनच ऑडिओ व ब्रेल लिपीतील पुस्तके निर्माण करण्यास सुरवात करण्यात आली. 

त्यांचे प्रयत्न पाहून त्यांच्याकडे सागर आणि शिवप्रकाश हे दोन अंध तरुण स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी आले. त्यांच्यासोबत जे विद्यार्थी अंध आहेत व स्पर्धा परिक्षांची तयारी करू इच्छितात अशा तरूणांसाना मार्गदर्शन करण्यास सुरवात केली आहे. सध्याच्या माहितीनुसार अंध मुलांसाठी UPSC चे स्टडी मटेरियर पुरवणारे ते एकमेव व्यक्ती आहेत.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.