आशिकीमधल्या अनुची रियल लाईफमधली कहाणी लै दर्दी आहे…..

महेश भट्ट या माणसाने एक तुफ्फान सिनेमा बनवला होता नाव होतं आशिकी. म्हणजे या सिनेमाने बॉलिवूडमध्ये जबरदस्त गाणी, सिनेमा कसा असावा, प्रेम कहाणीचा ट्रेंड सगळंच बदलून टाकलं होतं. बऱ्याच जणांना आठवत असेल गावोगावी नांगरणी करणाऱ्या ट्रॅक्टरवर आशिकी सिनेमातलेच गाणे लागायचे.

धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से है दील को चुराना….

जाम की जरूरत है जैसे बेखुदी के लिए, बस एक सनम चाहीए आशिकी के लिए….

असे हृदयद्रावक आणि निरंतर मनात रेंगाळत राहतील अशी गाणी. कुमार सानू सारखा ढाण्या सिंगरसुद्धा याच सिनेमामुळे मिळाला.

अशा असंख्य गोष्टी घेऊन हा सिनेमा आला, यात लीड हिरो हिरोईन होते राहुल रॉय आणि अनु अग्रवाल. सहकलाकार म्हणून दीपक तिजोरीसुद्धा भाव खाऊन गेला होता. पण आजचा किस्सा आहे अनु अगरवालचा. भारताला या अनु अग्रवालचा नाद लागला होता. म्हणजे बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की गर्लफ्रेन्ड पाहिजे तर अशीच पाहिजे नाहीतर सिंगल राहिलेलं बरं. अशी ही उच्चकोटीची आशिकी होती. पण भारताला आशिकीमुळे वेड लावणाऱ्या अनु अग्रवालची रियलमधली कहाणी लय दर्दनाक आहे.

11 जानेवारी 1969 ला अनु अगरवालचा जन्म झाला. 1990ला ती सिनेमात आली आणि आशिकीमुळे सेलिब्रिटी झाली. आशिकीनंतर तिने सिनेमात काम केलं पण तिला पुन्हा तशी लोकप्रियता मिळाली नाही. दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेत असताना महेश भट्टशी तिची भेट झाली आणि तिला आशिकी ऑफर झाला. वयाच्या 21 व्या वर्षी तिने पदार्पण केलं. अनु अग्रवालने नंतर गजब तमाशा, खलनायिका, किंग अंकल, कन्यादान, बीपीएल ओए या सिनेमांमध्ये काम केलं पण हे सिनेमे चालले नाही.

1996 नंतर अनु अग्रवाल फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाली. 1999 साली झालेल्या एका अपघाताने तिचं आयुष्य बदललं. हा अपघात इतका भीषण होता की तिची स्मृती गेली आणि ती बरेच दिवस कोमात होती.

ती पॅरालाईज झाली. तब्बल महिनाभर कोमात राहिल्यानंतर ती शुद्धीवर आली. तिला काहीच आठवत नव्हतं.

तब्बल 3 वर्ष चाललेल्या ट्रीटमेंटने ती बरी झाली. हे सगळं प्रकरण अनु अग्रवालने आपल्या अन्यूजवल : मेमोईर ऑफ अ गर्ल व्ह्यू केम बॅक फ्रॉम डेड या आत्मकथेत लिहिलेलं आहे.

आता ती ओळखुही येणार नाही इतका मोठा बदल तिच्यात झालाय. आता ती झोपडपट्टमध्ये जाऊन तिथल्या लहान मुलांना योगा शिकवते. म्हणजे आता कितिही काही झालं तरी बऱ्याच जणांसाठी ती आशिकीची अनु अग्रवालच राहील.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.