गांधी ते लादेन यवतमाळच्या खान यांच्याकडे ६० हजार जणांच्या मुलाखतींच रेकॉर्डिंग आहे

रोजच्या कामाशिवाय आवड म्हणून जुन्या वस्तू गोळ्या करणे, पोस्ट तिकीट संग्रही ठेवणे, ऐतिहासिक वस्तूंचा जमविणे असे छंद आपल्या जवळील अनेकांना असतो.

यवतमाळ मधील एका सेवानिवृत्त शिक्षकाने आकाशवाणीवरील कार्यक्रमांचे १७ हजार कॅसेट मध्ये रेकॉर्डिंग केलं आहे. 

त्यांना व्हाईस ऑफ यवतमाळ म्हणून लोक ओळखू लागले आहे. 

अस्लम खान असे त्यांचे नाव असून ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांनी यवतमाळ जिल्हयातील दिग्रस तालुक्यातील तांदळी गावात ही कॅसेटची लायब्रेरी उभारली आहे. त्यात जगभरातील महत्वाच्या व्यक्तींची भाषणे आहेत. आकाशवाणीवर प्रसिद्ध झालेली भाषांणाचे रेकॉर्डिंग त्यांच्या लायब्रेरीत आहेत.

यात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ,अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन  केनेडी, दहशतवादी ओसामा बिन लादेन यांचे भाषण, मुलाखतीचा समावेश या रेकॉर्डिंग मध्ये आहे. ही रेकॉर्डिंग चा आवाज सुद्धा तितकाच सुस्पष्ट आहे.

 जगभरातून प्रसिद्ध झालेले ही भाषणे त्यांनी १७ हजार कॅसेट मध्ये रेकॉर्ड केल्या आहेत. त्यात ६० हजार आवाजाचं रेकॉर्डिंग आहे. १९९२ पासून त्यांनी हे रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली आह.

माणसाने आयुष्यात काही तरी वेगळं केलं पाहिजे या उद्देशाने त्यांनी रेडिओ वरील कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करून त्याची लायब्रेरी केली आहे. ते डेहणी येथे जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेवर शिक्षक होते. ते ११ वर्षांपूर्वी सेवा निवृत्त झाले आहेत.  

अस्लम खान यांना विचारल्यावर सांगतात की, 

एक-एक करत रेकॉर्डिंग करत गेलो आणि छंद लागला. तत्कालीन जिल्हाधिकारी विकास खरगे यांना मी करत असलेलं रेकॉर्डिंग बद्दल माहिती कळाली आणि त्यांनी हे काम पुढे चालू ठेवण्यास सांगितले होते. शिक्षकांनी वेगळेपणा जपायला हवा असेही त्यांनी सांगितले होते. खरगे यांच्यामुळे प्रोत्साहन मिळालं आणि १७ हजार कॅसेट रेकॉर्डिंग करू शकल्याचे अस्लम शेख सांगतात. 

१९४२ च्या लढ्यासाठी महात्मा गांधी यांनी देशाला केलेले आवाहनचे रेकॉर्डिंग सुद्धा त्यांच्याकडे आहे. बीबीसी लंडन मधून प्रसारित होणारे कार्यक्रम त्यांनी रेकॉर्ड केले आहेत.

अस्लम खान यांनी सगळ्या कॅसेटची नोंद रजिस्टर मध्ये करून ठेवली आहे. त्यात कॅसेट नंबर, ज्यांचे भाषणाचे रेकॉर्डिंग आहे त्यांचे नाव, तारीख, वेळ असं सगळं लिहून ठेवले आहे. त्यामुळे हवी ती कॅसेट रजिस्टर मधल्या नोंदीतून शोधायला मदत होते.

त्यांच्या या छंदाची दखल भारताच्या राष्ट्रपती कार्यालयाने देखील घेतली आहे. त्यांना यासाठी सन्मान पत्र पाठविण्यात आले आहे. आज त्यांचे ७१ वय असून सुद्धा अस्लम खान हे रेकॉर्डिंगचे काम नित्यनियमाने करत असतात.

बीबीसी ब्रिटिश बॉडकास्टींग कार्पोरेशनचे चार भाषांमध्ये ऊर्दू, हिंदी, मराठी आणि इंग्रजी मध्ये प्रसारित होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमांना ध्वनीमुद्रीत करून ऑडिओ कॅसेट तयार करणे व नंतर त्या रजिस्टरमध्ये सुंदर अक्षरात लिहिणे असा आगळावेगळा छंद त्यांनी जोपासलेला आहे. 

आज पर्यंत त्यांनी १७ हजार कॅसेट मध्ये तब्बल ६० हजार पेक्षा जास्त लोकांचे आवाज रेकॉर्ड केला आहे.

यात केवळ जगभरातील प्रमुख नेते यांचे भाषणच नाही तर मुलाखती, कविता, आरोग्या संदर्भातील कार्यक्रमांचा समावेश आहे. मात्र, त्यांनी गाण्याचा रेकॉर्डिंग करणे टाळले आहे.

भारत आणि जगभरातील प्रमुख व्यक्तींचा आवाज आपल्याकडे रेकॉर्ड असल्याचे अस्लम शेख यांना आपल्या या छंदाची लिम्का बुक आणि गिनीज बुक मध्ये नोंद व्हावी अशी इच्छा आहे. १९९२ पासून त्यांनी सुरू केलेल्या रेकॉर्ड करण्याचे काम वयाच्या ७१ व्या वर्षी ही सुरू आहे. 

त्यांची ही रेकॉर्डिंगची लायब्रेरी पाहण्यासाठी अनेकजण येत असतात.  

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.