जगात सर्वाधिक पुस्तके लिहण्याचा रेकॉर्ड या मराठी लेखकाच्या नावावर आहे

आचार्य अत्रे शाळेतील मुलांना शिकवत असत त्यावेळीचा एक किस्सा सांगितला जातो.

अत्रे लहान मुलांना विचारतात गीतारहस्य कोणी लिहले?

तेव्हा लहान मुले म्हणतात,

बाबुराव अर्नाळकर.

रहस्यकथा आणि बाबुराव अर्नाळकर हे जुन्या काळाच समीकरण होतं. बाबुराव अर्नाळकरांनी सुमारे १४७० च्या वरती रहस्यकथा लिहल्या. प्रत्येक कथा म्हणजे एक कादंबरी. ज्ञान असणाऱ्या पुस्तकांची संख्या १४७०. वास्तविक ही संख्या १८०० च्या वरती असल्याचं सांगण्यात येतं.

बाबुराव अर्नाळकर या मराठी लेखकाचा स्वत:चा असा फॅन क्लब होता.

त्यांचे फॅनमधल्याच एक वाचक म्हणजे विभाकर कर्वे. विभाकर कर्वे हे कल्याणचे. बाबुराव अर्नाळकरांच्या अनेक रहस्यकथा त्यांना तोंडपाठ होत्या. त्यांची बरीच पुस्तके त्यांच्या संग्रही होती. या व्यक्तींने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डशी संपर्क साधला. गिनीजवाल्यांनी बाबुराव अर्नाळकरांच्या पुस्तकांची नोंद आपल्या रेकॉर्डमध्ये केली. जगभरात सर्वाधिक पुस्तके लिहण्याचा मान बाबुराव अर्नाळकर यांच्या नावावर जमा झाला.

पण बाबुराव अर्नाळकर यांना मात्र त्याच काहीही कौतुक नव्हतं. ते आपले लिहीत राहिली. अगदी वयाच्या शेवटच्या काळात त्यांची दृष्टी अंधुक झाली, दिसेनासे झाले तरिही ते लिहीत होते.

बाबुराव अर्नाळकरांचे नाव हे देखील एक रहस्यच होतं. त्यांचा जन्म १९०६ चा. त्याच मुळ आडनाव चव्हाण. ते बाबु या नावाने प्रसिद्ध होते. पण लिखाण करु लागल्यानंतर अर्नाळ्याचे म्हणून अर्नाळकर हे नाव लावले. सुरवातीच्या काळात म्हणजे ब्रिटीश सरकारच्या काळात ते रिक्रुटमेंट अधिकारी होते. दूसऱ्या महायुद्धानंतर त्यांना चष्म्याचे दूकान काढून व्यवसाय सुरू केला. गांधी-नेहरूंच्या प्रभावातून त्यांनी स्वातंत्र्ययुद्धात सहभाग घेतला.

बाबुराव अर्नाळकर नेमके कधीपासून लिखाण करु लागले तर याबद्दल माहिती मिळते की,

ती म्हणजे गिरगावातील लेखक व अभिनेते बबन प्रभू यांच्या वडिलांची प्रिंटिग प्रेस होती. बाबुराव अर्नाळकर यांचे ते मित्र होते. प्रेसमध्ये काम कमी असल्याने त्यांनी बाबुरावांना एखादे पुस्तक लिहण्यास सांगितले. बाबुरावांनी एक रहस्यकथा लिहली आणि त्यांना छापण्यास दिली.

प्रभू यांनी त्यांच्या १ हजार प्रती छापल्या. काही दिवसातच त्या प्रती हातोहात खपल्या. पुढच्या चार महिन्यात एकूण पाच एक हजार पुस्तकांची विक्री झाली. इतक्या कमी काळात इतक्या पुस्तकांची विक्री हा आज देखील विक्रम गणला जातो. त्या काळात वाचणारी लोकं कमी होती तरिही इतक्या मोठ्या संख्येत झालेली विक्री हा खरतर खूप मोठ्ठा विक्रम होता.

आपल्या चाळीश वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एक हजार चारशे सत्तर हून अधिक पुस्तके लिहली. ही पुस्तके म्हणजे प्रामुख्याने रहस्यकथा असायच्या. झुंझारराव, धनंजय, काळा पहाड अशी काल्पनिक पात्र त्यात रंगवलेली असायची. मराठी साहित्याने बाबुरावांची पुस्तके वाचणारी एक पिढी जन्माला घातली. लहान मुलांच्यात या रहस्यकथा अधिक फेमस होत्या. काल्पनिक, गुढ, गुन्हेगारी मनाचा ठाव घेणारी ही पुस्तके असत. साधारण सत्तर ते ऐंशी पानाच्या या पुस्तकांमध्ये एकच रहस्यकथा असायची.

त्यांच्या साहित्याबद्दल तत्कालीन साहित्यांची कोणती किंमत दिली तर वि.स. खांडेकर अशा साहित्याला साहित्य मानण्यास विरोध करायचे. याउलट आचार्य अत्रे यांच्या मते बाबुराव अर्नाळकर यांच्यासारख्या व्यक्तीस साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करावे इतके त्यांचे साहित्य मोठ्ठे आहे.

आपल्या साहित्यप्रेमाबद्दल प्रसिद्ध असणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तर बाबुराव अर्नाळकर यांच्यासाठी पनवेल येथे पंधरा एकर जमीन देवू केली होती.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर तत्कालीन ब्रिटीश सरकारने त्यांना कुलाब्यामध्ये घर देण्याची सोय केली होती. बाबुरावांनी मात्र यातील कोणत्याही गोष्टीबद्दल मोह दाखवला नाही. त्यांच्या डोक्यात फक्त निस्वार्थीपणे लिखाण करणं इतकच होतं. त्यामुळे कोणतीही ऑफर न स्वीकारता ते काम करत राहिले.

आपले पुस्तक वाचकांच्या हाती पडणं आणि त्यांनी ते वाचणं याहून दूसरं कोणतच सुख त्यांना नको असायचं.

बाबुरावांचा कार्यकाळ हा १९५० ते ७० समजला जातो. या काळात रहस्यकथांचे ते एकमेव बादशहा होते. नंतरच्या काळात खाडिलकर आणि कंपनीच्या रहस्यकथा आल्या. पुढील काळात म्हणजे ७१ नंतरच्या काळात नारायण धारप, सुहास शिरवळकर यांच्या कथा गाजू लागल्या. पुढे खाडिलकरांची लाट ओसरली तरिही अर्नाळकर लिहीतच राहिले. त्यांनी त्याचा स्पीड नंतरच्या काळात कमी झाला. १९९६ मध्ये वार्धक्याने त्यांचे निधन झाले.

हे ही वाच भिडू. 

 

4 Comments
  1. जयदिप वामनराव धिवरे says

    सुहास शिरवळकर आणि त्यांच्या ‘दुनियादारी’ बद्दल लिहा ना… मला वाटत ९० च्या बहुतेक कॉलेज कुमारांनी ती वाचलेली आहे, खूप चाहते आहेत त्यांचेही

  2. DEEPAK S says

    Khup Chan article

  3. sarika says

    Awesome

  4. Yogeshwar says

    Aacharya pandit Shriram Sharma search kara… 3200 books! Many of them are above 1000pages

Leave A Reply

Your email address will not be published.