हाजी मस्तान ते दाऊदच्या गर्दीत “बेबी पाटणकर” मात्र टिच्चून उभा होती.

शशिकला माजगावकर हे तिचं खरं नाव. पण शशिकला हे नाव काळाच्या ओघात कधीच मागं पडलं होतं. आज सगळेजण तिला बेबी पाटणकर म्हणूनच ओळखतात. सगळेजण म्हणजे कोण?

तर दुबईत बसलेल्या डॉन पासून ते मुंबईच्या पोलीस चौकीतल्या कॉन्स्टेबलपर्यन्त. सगळ्यांना तिच नाव माहिती. ती इतके वर्ष काय करत होती ते पण माहिती. तिचे आतले बाहेरचे सगळे संबध माहिती. पण तिला अटक करण्याचं धाडस कोणाच्यात नव्हतं.

एन्कांटरच्या नावाखाली एकेका भल्याभल्या गुंडाचा नायनाट होत होता तेव्हा हि बाई तशीच होती. सत्या पिक्चरमधला भिकू म्हात्रे जसा होता अगदी तशीच, 

मुंबईंका किंग कोण अस विचारलं तर एकाच नावाचा ऑप्शन शिल्लक राहिला होता,

ती म्हणजे बेबी पाटणकर. 

आज पेपरात अधूनमधून बातमी येत असते. Mephedrown नावाचं ड्रग्स ताब्यात. अंमली पदार्थांच सेवन करणारे याला म्यावम्याव म्हणून ओळखतात. म्यावम्याव नावाचं ड्रग्स आजही भारतात नविन म्हणून ओळखलं जातं.पण १९८० सालात हे ड्रग्स भारतात आणण्यासाठी बेबी पाटणकरला ओळखलं जातं. गेली ३० वर्ष मुंबईत ड्रग्स व्यवसाय करणारी टॉपची व्यक्ती म्हणून बेबी पाटणकरला ओळखलं जातं. इतकं असून ती पोलिसाच्या हिटलिस्टवर आली नाही की गॅंगवारमध्ये सापडली नाही.

म्हणून तिच्याबद्दल कुतूहल वाटतं आणि तितकच गुढ देखील. 

वरळीच्या सिद्धार्थनगरचा भाग. टेकडीवजा असणारी जागा. याच जागेवर छोटस घर म्हणजे बेबी पाटणकरचं घर. बेबी पाटणकरचं लग्न रमेश पाटणकर सोबत झालं होतं. सांगणारे सांगतात ती मेस चालवायची. यातूनच तिची आणि धर्मराज काळूखेची ओळ झाली होती. खऱ्याखोट्याची माहिती मिळत नाही पण बेबी पाटणकरचा घटस्फोट झाला आणि पोलीस कॉन्स्टेबल धर्मराज कोळूखे याच्यासोबत तिची ओळख झाली. पतीपासून घटस्फोट घेवून बेबी पाटणकरने टेकडीवरच्या याच घरातून यंत्रणा उभा केली.

गांज्याच्या पुड्यांपासून सुरू झालेला धंदा तिला मुंबईतील सर्वात मोठ्ठी ड्रग्स डिलर करण्यापर्यन्त घेवून गेला. 

बेबी पाटणकर घरबसल्या गांजा विकू लागली. गांजा, हशीशच्या पुड्या विकणं हा तिचा व्यवसाय होता. त्यातूनच तिला पैसे मिळू लागले. रस्त्यावरुन चालता चालता ती गिऱ्हाईकाच्या हातात शिताफीने गांजाची पुडी सरकवत असे. त्यात तिला धर्मराज काळोखे मदत करत असे. काळोखे पोलीस असल्याने पोलीसांनी रचलेला ट्रॅपची माहिती तिला समजत असे. हळुहळु तीने ड्रग्सच जाळ वाढवलं. काळोखेने पोलीस सेवेत असताना बड्या राजकारण्यांसोबत ओळख निर्माण केली. एकमेकांना मदत करत ड्रग्सचे मोठ्ठे व्यवहार बेबी पाटणकर करु लागली. 

गेली तीस वर्ष. अगदी अलिकडच्या काळापर्यन्त बेबी पाटणकरला पोलीस अटक करु शकले नाहीत. त्याच कारण म्हणजे तिच्याकडे कोणताच माल कधीच मिळाला नाही. जेव्हा जेव्हा पोलीस तिच्या घरावर धाड टाकायचे तेव्हा पोलीस रिकाम्या हाताने परत यायचे.

दरम्यानच्या काळात बेबी पाटणकरचं वर्चस्व वाढू लागलं. 

चाळीत राहणारी बेबी पाटणकर मधल्या काळात कोट्यावधी संपत्तीची मालकीण झाली. बोरीवलीच्या, पुण्यातल्या घोरपडीत, मुंबईच्या वरळीच्या झोपडपट्टीतल्या कित्येक खोल्यांवर तिची मालकी होती. वरळीमध्ये तिच २४ खोल्यांच घर झालं. मुंबई पुण्यात तिने कित्येक फ्लॅट घेतले. महागड्या गाड्या घेतल्या. मुंबई पुण्यासोबत गोवा, आंध्रप्रदेश अशा राज्यात तिने करोडोंची बेहिशोबी कमाई केली. 

धर्मराज काळोखे आणि बेबी पाटणकर यांच्या हितसंबधातून ड्रग्सच साम्राज्य उभा करण्यात आलं होतं. एन्काऊंटर सारख्या मुंबई क्लिन करण्याच्या मोहिमेतून सहीसलामत सुटून बेबी पाटणकरने लाखोंची माया जमवली होती. 

बेबी पाटणकरची मुले, तिच कुटूंब सुना आणि दूसरीकडे धर्मराज काळूखेचं कुटूंब दोन्ही कुटूंबाचा या व्यवसायात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होता. 

पैसा जास्त झाला, प्रत्येक गोष्टीतून बेबी पाटणकर सहिसलामत सुटली. आत्ता शेवटचा काळ शांततेत घालवायचा, धंदा बंद करायचा असा विचार बेबी पाटणकरने धर्मराज काळूखेंला बोलून दाखवला. धर्मराज काळोखेला मात्र पैश्याच व्यसन लागलं होतं. धंदा बंद करायला त्याने विरोध केला. इथेच दोघांच्यात ठिणगी पडली. दोघे एकमेकांची जिरवण्याची भाषा करु लागले. एकीकडे काळूखेंचे पोलीस आणि राजकारण्यासोबत चांगल संबध असल्याचं सांगितलं गेलं तर दूसरीकडे इतक्या वर्षात बेबी पाटणकरने देखील आपलं स्वत:च नेटवर्क उभा केलेलं. 

धर्मराज काळूखे आहे तोपर्यन्त आपण या धंद्यातून बाहेर पडणार नाही हे बेबी पाटणकरने ओळखलं होतं. आत्ता प्लॅनिंग शिजलं ते काळूखेचा काटा काढायचं. 

या कामात बेबी पाटणकरने आपलं नेटवर्क वापरायचं ठरवलं. पोलीस अधिकारी यशवंत पारदे, गौतम गायकवाड. ज्योतिराव माने, सुधाकर सांरग आणि अंमली पदार्थ विरोधी पथकातील वरिष्ठ अधिकारी सुहास गोखले यांना सोबत घेवून काळूखे यांच्या सातारच्या घरी अंमली पदार्थ ठेवण्याचा प्लॅन करण्यात आला. यशवंत पारदे आणि गौतम गायकवाड हे पोलीस अधिकारी यात सुत्रधार असल्याचं सांगण्यात आलं. 

ठरल्याप्रमाणे काळूखेच्या घरी ड्रग्स ठेवण्यात आले. एक दोन किलो नाही तर तब्बल १२४ किलो ड्रग्सचा साठा काळूखे याच्या घरात ठेवण्यात आला. दूसरीकडे पोलीसांना टिप देण्यात आली. पोलीसांनी छापा घातला. १२४ किलो ड्रग्सचा साठा पाहून पोलिस देखील हादरले. काळोखे आणि बेबी पाटणकर हि जोडगोळी पोलीसांना माहित होतीच पण ३० वर्षांत थेट पुराव्यासहित सापडण्याची हि पहिली वेळ होती. 

पोलिसांनी  काळूखेला ताब्यात घेतलं. चौकशी झाली आणि ते पाच पोलीस अधिकारी आणि बेबी पाटणकरचा प्लॅन उघड झालां. पोलीसांनी ४० दिवस माग घेवून बेबी पाटणकरला अटक केली. 

बेबी पाटणकरला अटक झाली ती तारिख होती २३ मार्च २०१५. बेबी पाटणकर सोबतच वरिष्ठ अधिकारी सुहास गोखले, पोलीस इन्स्पेक्टर गौतम गायकवाड, PSI सुधाकर सारंग, ASI ज्योतीराम माने आणि हेड कॉन्स्टेबल यशवंत पराटे यांना अटक करण्यात आली. काळूखे यांच्या घरी ड्रग्स ठेवण्याचे आरोप त्यांच्यावर टाकण्यात आले. 

दरम्यानच्या काळात सरकारी पातळीवर म्यावम्याव या ड्रग्सला अंमली पदार्थांच्या यादीत घालण्याच काम सुरू झालं. इतके वर्ष हे ड्रग्स अंमली पदार्थांच्या यादीत नसल्याचा फायदा या ड्रग्स माफियांनी घेतला होता.

फॉरेन्सिक लॅबचे निकाल आहे तेव्हा कळालं कि हे ड्रग्स नसून हे चायनिझ करण्यासाठी लागणार अजिनोमोटो आहे. क्राईम ब्रॅन्चने पुन्हा या ड्रग्सचे नमुने चंदिगडच्या सेंट्रल फॉरेन्सिक लॅबला पाठवले. तिथे देखील हे अजिनोमोटो असल्याचा रिपोर्ट आला.

पाचही पोलीस अधिकाऱ्यांनी काळोखेंच्या घरात काही अंमली पदार्थ ठेवल्याच सिद्ध होवू शकलं नाही. चार पाच वर्ष केस चालून अखेर त्या पाचही जणांना निर्दोष सोडण्यात आलं. राहतां राहिला धर्मराज काळूखेचा विषय तर धर्मराज काळोखेच्या खिश्यात एक दारूच व थोडसं हशीश सापडल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.

बेबी पाटणकर मात्र या सर्वात अडकली. बेबी पाटणकरवर अंमली पदार्थाअंतर्गत केसेस दाखल करण्यात आल्या. बेबी पाटणकरला पोलीसांनी अटक केली आणि अखेर मुंबईच्या राड्यात टिकून राहिलेली हि ड्रग्स माफिया स्वत:च रचलेल्या जाळ्यात अडकून गेली. 

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. kumudini pathode says

    So so so useful information, I just like your channel ????????

Leave A Reply

Your email address will not be published.