लस बनवण्याच्या स्पर्धेत सगळं जग होतं, पण साठवणूक व वितरणात हे एकटेच होते.. 

सीरमने तयार केलेली ऑक्सफर्डची लस, भारत बायोटेकची लस, फायझरची लस…. 

कोरोना आला आणि कोरोनाने जस जग बंद पाडलं तशा मोठमोठ्या कंपन्या कामाला लागल्या. अगदी पहिल्या टप्यात लोकांनी घरच्या घरी मास्क बनवायला सुरवात केली, काहींनी सॅनिटायझरचे स्टॅण्ड तयार केले तर काहींनी संधी साधून ऑर्गेनिक गोष्टींचा प्रचार व प्रसार सुरू केला. 

पण खरी स्पर्धा होती ती सर्वात अगोदर लस तयार कोण करतो.

कारण हा बिझनेस खूप मोठ्ठा होता. सर्वांना कम्पल्सरी लस घ्यावीच लागणार हे कोरोनाच स्वरूप पाहून लक्षात आलं होतं. अशा वेळी एकट्या भारताची सव्वाशे कोटींच्या घरातील लोकसंख्या पाहता शंभर रुपयाला लस विकली तरी ती कंपनी जगात टॉमक्रुझ होणार होती हे स्पष्टच होतं… 

साहजिक ही स्पर्धा फक्त वेगवेगळ्या कंपन्यांची आपआपसातील स्पर्धा न राहता देशांची झाली. रशिया पुढं की अमेरिका. इंग्लड पुढं की भारत अशी स्पर्धा सुरु झालेली. पण लस साठवणूक कशी करायची, ती वितरीत कशी करायची इतक्या मोठ्या संख्येत लसीकरण करायचं असल्याचं त्याचं मॅनेजमेंट, त्याची सिस्टिम कशी असेल याचा विचार कोणी केलेला का? 

म्हणजे आपल्यासारख्या गरिबबुद्धीच्या लोकांनी याचा विचार नक्कीच केला नसणार पण असा विचार करणारी व या व्यवसायात घट्ट पाय रोवून बसलेली एक कंपनी ऑलरेडी मार्केटमध्ये होती. त्यांनी कोरोनाची लस कशी असेल व ती कशी साठवावी लागेल, कशी वितरीत करावी लागेल याचा विचार करण्यास सुरवात केलेली… 

जेव्हा बाजारात लस आली तेव्हा या कंपनीकडे १४० देशांमध्ये लस साठवणूक व वितरणाची जबाबदारी देण्यात आली होती… 

या कंपनीच नाव बी मेडिकल सिस्टिम… 

लक्झमबर्गची ही कंपनी गेल्या चाळीस वर्षांपासून या धंद्यात आहे. मेडिकल उपकरण निर्मीती, लस व इतर मेडिकल्स साधणांची साठवणूक व वितरणाचा दिर्घकाळ अनुभव असणारी ही कंपनी. रेफ्रिजरेशन उपकरणांमध्ये एक आंतराष्ट्रीय कंपनी म्हणून त्यांची गणना होते. अल्ट्रा लो टेम्प्रेचर अर्थात युएलटी फ्रीजर, रेफ्रिजरेटर, रिमोट मॉनिटेरिंग सिस्टिमच्या प्रयोगशाळा, रक्तपेढी आणि फार्मसीमधल्या विविध प्रकारच्या औषधांच्या साठवणूकीत ते टॉप मध्ये गणले जातात. 

सध्या या कंपनीच्या डेप्यूटी CEO पदावर जेसल देसाई आहेत, ते कंपनीबाबत सांगताना आपल्या एका मुलाखती सांगतात की,

जगभरात कंपनी प्रसिद्ध आहे. आमच्या पद्धतीला WHO द्वारे देखील रिकंमेड केल जातं. आमची व्यवस्था सुरक्षितता व विश्वसनियतेच्या पातळीवर जगभरात नावाजली जाते. मागच्या वीस वर्षांमध्ये कंपनीने कोल्ड स्टोरेजची एक चेन विकसित केली आहे. त्याद्वारे ३०० मिलियन मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. 

सप्टेंबर २०२० मध्ये मुंबई महापालिकेसोबत नायर हॉस्पीटलसाठी कंपनीने स्टोरेज सिस्टीम दान देलेली होती. मुंबईसारख्या आद्रतेच्या वातावरणात देखील हे गंजत नाही. 

नुकत्याच भारत आणि लक्झेमबर्गमध्ये झालेल्या करारानुसार कंपनीने भारतामधील गुजरात येथे स्टोरेज सिस्टिम विकसित केली आहे. 

लसीकरणाच्या एकंदरीत मोहिमेबाबत सांगितलं जातं की, लस ही निकषात असणाऱ्या तापमानालाच साठवून ठेवावी लागते. इबोलाची लस मायनस ८० डिग्रीला साठवावी लागते. तर फायझरची लस -२० डिग्रीला साठवावी लागते. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.