डिप्रेशनमध्ये गेलेल्या बॉबी देओलसाठी सल्लू संकटमोचक झाला होता…

एकेकाळी आपल्या मानेवर रुळणाऱ्या कर्ली केसांमुळे पोरींना बॉबी देओल घायाळ करायचा. म्हणजे तेव्हाच्या भारतीय पोरींचा बॉबी देओल क्रश होता.

पण हाच बॉबी देओल डिप्रेस झाला आणि नंतर त्यानं पुनरागमन केलं पण
तसं पाहिलं तर बॉलिवूडमध्ये किती हिरो आले किती गेले,कोण कायमचं गायब झालं तर कोण डगमगत का होईना तग धरून टिकून राहील तर काहींनी अशी बॅटिंग केली की त्यांच्याशिवाय पिच्चर पूर्णच होऊ शकत नाही. पण कामच नसल्यामुळे काही अभिनेते आपलं पोटेनशियल गमावून बसले तर काहींनी आत्महत्या केल्या तर सगळं गणित असं आहे. असंच एकदा काम नसल्यामुळे बॉबी देओल डिप्रेशनमध्ये गेला होता तेव्हाचा हा किस्सा.

फिल्मी करिअरमध्ये विशेष काही असं बॉबी देओलने केलेलं नाही पण मिम्सच्या माध्यमातून तो कायम चर्चेत राहिला. लॉर्ड बॉबी म्हणून त्याचा ट्रेंड आला होता. धर्मेंद्र आणि सनी देओलचा भाई म्हणल्यावर बॉबी देओलला कामच कामं असतील असं आपल्याला वाटण साहजिकच आहे पण आतली गणितं वेगळी असतात, जो हिरो पैसे कमवून देईल त्यावर प्रोड्युसर लोकं जास्त फोकस करतात. आता एक नजर बॉबी देओलच्या काही सिनेमावर टाकू त्यात बरसात, बादल, अजनबी,बिछु ही काही मोजकी फिल्मी लाईन आहे. नंतर सतत फ्लॉप सिनेमे तो देत राहिला आणि परत कुठला फ्लॉप नको म्हणून बॉबी देओल सिनेमा क्षेत्रापासून दूर जात राहिला.

आता काही हिट सिनेमाने बॉबी बॉलिवूडमध्ये आला पण नंतर फ्लॉपचा शिक्का त्याच्यावर बसला आणि तो गायब झाला. पण मागच्या काही वर्षात तो पोस्टर बॉईज या सिनेमातून पुन्हा पडद्यावर आला, हा सिनेमा पण जेमतेम होता आणि नंतर त्याला चांगले सिनेमे मिळणं बंदच झालं. आता कामच नाही त्यात बोलणारे बोलतचं राहतात त्यामुळं बॉबी देओल डिप्रेशनमध्ये गेला. सनी देओलने त्याच करिअर किनारी लावण्याचा प्रयत्न केला पण काही झालं नाही आणि मग धावून आला बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान.

सलमान भाईने स्वतः बॉबी देओलच्या फिजिक्स आणि प्रोजेक्टवर जातीने लक्ष द्यायला सुरुवात केली आणि पूर्ण तयारीनिशी रेस 3 हा सिनेमा त्याला ऑफर केला. रेस 3 मध्ये महत्वाचा रोल बॉबी देओलला मिळाला.

रेस 3 च्या रिलीजवेळी एका इंटरव्ह्यूमध्ये बॉबी देओल म्हणाला होता की सलमान खान सोबत एका वर्षापूर्वी माझी चांगली मिटिंग झाली. प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळी फेज येते, चांगला वाईट काळ येतो. मी माझ्या वाईट काळात सनी देओल आणि संजय दत्त यांच्या मदतीने पुढे जात होतो. सलमान भेटला तेव्हा त्यालाही मी सांगितलं आणि पुढच्या काही दिवसातच सलमान खानने मला रेस 3 ची ऑफर दिली. नंतर हाऊसफुल्ल 4 मध्येही काम मिळालं.

नंतर बॉबी देओल आश्रम सिरीजमध्ये तर पूर्णपणे जबरदस्त दिसलाय. आश्रम सिरीजमुळे बॉबी पुन्हा एकदा लोकप्रिय झाला. पहिली सुरवात चांगली आणि नंतर फ्लॉपचा शिक्का आणि पुन्हा एकदा पॉप्युलरीटी हे बॉबी देओलने करून दाखवलं. सलमान धावून आला पण बॉबी देओलने स्वतःच करिअर चांगलंच सावरलं म्हणता येईल…!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.