अक्षय कुमार सोडा, नकली अंडरटेकरनी खऱ्या अंडरटेकरचा सुद्धा पद्धतशीर गेम केला होता

1996 साली एक सिनेमा आला होता आणि त्या सिनेमाचा नायक होता अक्षय कुमार. खिलाडी कुमार म्हणून त्याचा उदय होण्याचा हा काळ होता. खिलाडीयोका खिलाडी हा सिनेमा जसा रिलीज झाला तसं अक्षय कुमारचा ढासळत चाललेला आलेख उंचावला आणि पुन्हा एकदा त्याची गाडी ट्रॅकवर आली. या सिनेमात असलेली जबरदस्त ऍक्शन आणि फाईट सीन्सची केलेली जबरदस्त डिझाइन. या सिनेमात अक्षय कुमारने wwe सुपरस्टार अंडरटेकरला चोपून काढलं होतं. बॉलिवूडमध्ये wwe चा बादशहा अंडर टेकर येणे हीच मोठी गोष्ट होती आणि भरीस भर म्हणून त्यात तो अक्षय कुमार अंडर टेकरला बदडून काढत होता. बऱ्याच हिरॉईक सिनेमात वापरता तो फंडा याही सिनेमात वापरला गेला. आता जर खऱ्या आयुष्यात अंडर टेकर बरोबर फाईट झाली असती तर आपण अक्षय कुमारची काय हालत झाली असती याचा फक्त विचारच करू शकतो.

पण नंतरच्या काळात अक्षय कुमारने रिव्हील केलं की तो ओरीजनल अंडरटेकर नव्हता. इथं अर्ध्या लोकांचं डोकं फिरलं होतं की ए क्या बकवास कर रहा है लौंडा…. पण मग तो जर ओरिजिनल अंडरटेकर नव्हता तर तो कोण होता ? तो होता अंडर टेकरचा डुप्लिकेट ब्रायन ली. या ब्रायन ली बद्दल अनेक अफवा आहेत की तो अंडरटेकरचा भाऊ आहे, तो अंडरटेकरचा भाऊ जरी नसला तरी दूरचा नातेवाईक तरी नक्की आहे. अंडरटेकरची आणि ब्रायन ली यांची दोघांची अंगकाठी सारखीचं आहे. डोक्याला रुमाल, काळा गॉगल आणि धिप्पाड शरीरयष्टी यांच्या जोरावर wwe मध्ये ब्रायन लीची दहशत होती.

1988 साली ब्रायन ली ने CWA अर्थात कॉंटिनेंटल रेसलींग असोसिएशन कडून आपल्या प्रोफेशनल रेसलींग करियरची सुरवात केली. त्या काळात wwe सोडून अशा अनेक असोसिएशन होत्या ज्या रेसलींग मॅच भरवण्यासाठी प्रसिद्ध होत्या. पुढे ब्रायन लीने इतर स्पर्धांमध्ये भाग घेत आपली दहशत दाखवून दिली होती. ब्रायन लीने बऱ्याच मॅच जिंकून अमेरिकेत आपला एक वेगळा फॅनबेस बनवला होता पण खऱ्या अर्थाने तो फेमस झाला ते म्हणजे 1994 साली.

1994 साली रॉयल रंबल मॅचमध्ये याको झोनाकडून अंडरटेकर हरला आणि ती गायब झाला, ही हार त्याला जास्तच लागली, अंडरटेकर संपला असं लोक बोलू लागले. अंडरटेकरचे फॅन्ससुद्धा नाराज झाले त्याचवेळी एका अधिकाऱ्याने म्हणजे डेड डिबियासी याने घोषणा केली की मला अंडरटेकर सापडला आहे, मी त्याला परत एकदा रेसलींग रिंगमध्ये आणणार आहे. डेड डिबियासी यानेच ओरीजनल अंडरटेकरला wwe मध्ये आणलं होतं. एका मॅचला अंडरटेकर आला लोकांच्या उत्साहाला पारावार राहिला नाही फक्त डेड डिबियासीला माहिती होतं की तो ब्रायन ली आहे म्हणून.

ब्रायन लीने अंडरटेकरच्या नावाखाली बऱ्याच मॅचेस खेळल्या आणि पैसे कमावले. डेड डिबियासीसुद्धा पैसेच छापत होता. पण एक मोठी घटना घडली आणि पॉल बेअरर नावाच्या भिडूने ओरीजनल अंडरटेकरला शोधून काढला आणि डेड डिबियासीचं पितळ उघडं पाडलं. अचानक एका मॅचला स्टेजखालुन अंडरटेकर प्रकट झाला आणि ब्रायन लीच्या समोर येऊन उभा ठाकला आणि ब्रायन चे डोळे थेट कपाळात. आता तो पेटलेला अंडरटेकर काय खतरनाक असेल हे त्या ब्रायन लीलाच माहिती. अंडरटेकरने ब्रायन लीला बेक्कार फोडून काढला , सगळं जग दोन अंडरटेकरला भांडताना बघत होतं. अंडरटेकर चॅम्पियन ठरला आणि ब्रायन पळून गेला.

पण ब्रायनला एक याचा चांगला फायदा झाला की तो आधीपेक्षा जास्त फेमस झाला, इव्हेंटवेळी ज्या लोकांना ओरिजिनल अंडरटेकर परवडत नसे ती लोकं ब्रायन भाईला घेऊन यायची आणि हवा करायची. रेसलींग मॅचला अंडरटेकर खरोखरच आलाय या अफवेखाली ब्रायनला उभं करून अधिकारी लोकं पैसे उकळू लागली. ब्रायनने सुद्धा अंडरटेकर नावाचा भरपूर फायदा उचलला पण एक भयानक विषय झाला.

ब्रायन लिचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबत भांडणं झाले आणि तिने पोलिसात कंपलेंट करायची धमकी दिली तर या ब्रायनने तिला उचलून आपटली आणि मग तिने पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी त्याला उचलून नेलं आणि मीडियात बातम्या छापून आल्या की अंडरटेकरला अटक झाली. दुसऱ्या दिवशी ओरीजनल अंडरटेकरने पेपर वाचला तेव्हा तो सुद्धा वैतागला होता. जेलमध्ये जाऊन अंडरटेकरने त्याला चोपून काढला आणि परत माझं नाव वापरलं तर हातपाय तोडून गळ्यात बांधील वैगरे धमक्याही देऊन आला, wwe अधिकाऱ्यांनी त्याच्यावर बॅन आणला आणि अशा प्रकारे ब्रायन लीचा wwe मधून पत्ता कट झाला.

बॅन होण्याच्या अगोदरच ब्रायन लीने अंडरटेकर म्हणून 1996 साली अक्षय कुमारचा सिनेमा शूट केलेला होतो, स्वस्तातला अंडरटेकर म्हणून त्यावेळी दिग्दर्शकाने त्याला आणलेलं. भारतातल्या तमाम सिनेप्रेमी लोकांना वाटत राहिलं की अक्षय कुमार भाऊने ओरीजनल अंडरटेकरला चोपलं होतं. पण नंतर अक्षय कुमारने सांगितलं की तो नकली अंडरटेकर ब्रायन ली होता. नंतर 1998 साली ब्रायन ली नव्याने wwe मध्ये आला तेव्हा त्याने स्वतःचा अवतार चेंज केला आणि नाव ठेवलं चेंझ.पण परत एकदा त्याचे wwe सोबत भांडणं झाले आणि wwe वाल्या लोकांनी त्याला हाकलून लावलं.

नंतर तो TNA फाईट ला जॉईन झाला पण काही दिवसांनी त्याने रेसलींग सोडली आणि तो आता निवांतपणे स्वतःच आयुष्य जगतोय. नीट विचार केला तर या ब्रायन नानावर एखादा सिनेमा बनू शकतो इतका खतरनाक माईंड होता त्याचा.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.