पाकिस्तानच्या या दोन फंटरनी जगातल्या पहिल्या “कॉम्प्युटर व्हायरसचा” शोध लावला.

अमजद फारूक आणि बासीद फारूक. राहणार लाहोर पाकिस्तान. आज इंटरनेट आणि टेलिकॉम क्षेत्रात त्यांचा चांगला जम बसला आहे. हे दोघे भाऊ पाकिस्तानमधले चांगले उद्योगपती आहे. पण सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे या दोघांना टेलिकॉम क्षेत्र किंवा इंटरनेट क्षेत्रात काय करतात म्हणून ओळखलं जात नाही तर एका वेगळ्याच कारणासाठी ओळखलं जातं.

या दोघांच क्रेडिट म्हणजे या दोन भावांनी मिळून जगातला पहिला कॉम्प्युटर व्हायरस जन्माला घातला होता. ब्रेन व्हायरस अस त्या व्हायरसचं नाव. जगाला तेव्हा कॉम्प्युटरची देखील निट ओळख झाली नव्हती अशा काळात या दोन फंटरनी जगातला पहिला व्हायरस जन्माला घातलां. 

१९८४-८५ चा काळ असावा.

कॉम्प्युटर नावाची गोष्ट येणार, त्यानंतर प्रत्येकाच्या नोकऱ्या जाणार. कॉम्प्युटर माणसांनी करायची सगळी कामे करतो अशा चर्चा तेव्हा होतं होत्या. भारतात राजीव गांधी कॉम्प्युटरच युग आणणार होते. अमेरिका, युरोप अशा देशांमधल्या कंपन्यांमध्ये कॉम्प्युटरचा उपयोग सुरू देखील झालेल्या. कोडिंग आणि लॅग्वेज शिकून बरेचजण कामाधंद्याला देखील लागले होते. सुरवातीच्या काळात वेगवेगळे सॉफ्टवेअर हि अशक्य कोटीतली गोष्ट होती. त्यातही अमेरिकेसारख्या देशातील कंपन्यांनी सॉफ्टवेअरवर आपली मक्तेदारी सिद्ध केली होती. 

अशा काळातली मोठ्ठी गोष्ट म्हणजे लाहोरमध्ये एका ठिकाणी कॉम्प्युटर लॅब सुरू करण्यात आली होती. मधल्या काळात २० रुपये तास कॉम्प्युटर सेंटर सुरू झाले तस याच स्वरुप नव्हतं. इंटरनेटचा वापर नव्हता त्यामुळे कोडिंग करणं, शिकणं अथवा सॉफ्टवेअर संबधित असणाऱ्या कामांसाठी कॉम्प्युटर लॅबचा वापर केला जात असे. 

या काळात कॉलेजच्या वयाचे असणाऱ्या अमजद फारूक आणि बासीद फारूक या दोन भावांना कॉम्प्युटर लॅबचा शोध लागला. हे काहीतरी वेगळं आहे, आपण ते शिकायला हवं म्हणून त्यांनी कॉम्प्युटर शिकण्यास सुरवात केली. वरवरच्या गोष्टींचा माहिती करुन घेत असताना त्यांना कोडींग व त्या कोडींग मार्फत तयार करण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअर बद्दल माहिती मिळाली.

दोघांनी पण निश्चय केला की आपण हे कोडिंग शिकायचं. 

झालं रात्रंदिवस हे दोन भाऊ कॉम्प्युटरवर बसू लागले. कोडींग शिकू लागले. कोडींग शिकलं की सॉफ्टवेअर बनवता येत आणि ते विकून पैसै कमवता येतात याची माहिती त्यांना मिळाली.  दोन भावांनी मिळून कोडिंग शिकल. आत्ता आपल्याला सॉफ्टवेअर बनवता येतील या विचारात ते दोघं होते. हळुहळु करत त्यांनी गरजेच्या गोष्टींसाठी सॉफ्टवेअर विकसित केली देखील. हातोहात लोक त्यांच्याकडून फ्लॉपी विकत घेवू लागले. हळुहळु करत दोघंपण श्रीमंत झाले. चांगले पैसै आले. पण हे सगळं करताना एक घोळ झाला. 

घोळ असा होता की एखाद्याला सॉफ्टवेअर विकला की तो आपली फ्लॉपी दूसऱ्याला विकायचा. दूसरा तिसऱ्याला विकायचा. पायरसीचा हा सर्वात पहिला खेळ होता.

त्यामुळे झालं अस की एखाद्याने एक सॉफ्टवेअर खरेदी केली की त्याला परत गिऱ्हाईक मिळायचं नाही. झालं आधीच पाकिस्तानात शिकून मोठ्ठ झाल्याची उदाहरणं कमी होती, त्यातही इतकं अतरंगी शिकून हे लोक गरिब राहिले असते तर संपुर्ण पाकिस्तानचा शिक्षणावरचा विश्वास उठला असता. मग या दोघांनी अभ्यास करायचं ठरवलं, 

आणि त्यातूनच जन्माला आला जगातला पहिला व्हायरस “ब्रेन” 

ब्रेन असा व्हायरस या दोघांनी बनवला. त्यात त्यांनी काय केलं की, सॉफ्टवेअर तयार करताना स्कीम केली. आत्ता फ्लॉपी एकदाच इन्स्टॉल व्हायची. दूसऱ्यांदा फ्लॉपी इन्स्टांल करायला गेलं की सॉफ्टवेअर इन्स्टॉल व्हायचं पण डिस्प्लेला यांच्या कंपनीचा नाव, नंबर, पत्ता दिसायचा. तुम्हाला विकत पाहीजे असेल तर त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा नायतर नाद सोडून द्यायचा असा तो प्रकार. त्यामुळे परत या दोघांच्याकडे पैशाचा ओघ सुरू झाला. पण दूसऱ्याच्या कॉम्प्युटरमध्ये असा चोरून व्हायरस सोडायचा हा प्रकार वेगळा होता.

पहिल्यांदाच असलं इद्रिस कोणीतरी केलं होतं. बघता बघता हि बातमी जगभर झाली. पाश्चिमात्य लोकांनी अक्षरश: त्यांना शिव्या घातल्या. पण त्या दोघांनी स्वत:च्या भल्यासाठी आणि पायरसी रोखण्यासाठीच  हा नवा शोध लावलेला.

हा प्रकार कळाला आणि व्हायरस युग आलं. पुढे पोत्यानं व्हायरस आले आणि ठिक्यानं कॉम्प्युटर बंद पडले पण जगाला हि अनोखी देणगी देण्याच काम पाकिस्तानच्या या दोन व्यक्तिंनी केलं. कदाचित पाकिस्तानसारख्या देशात असल्यामुळे ते असलं उलटं काम करु शकले अस आम्हाल मनातून वाटतं. 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.