बैलगाडीतल्या माणसाला विमानाची स्वप्न दाखवणाऱ्या कॅप्टनचा सिनेमा ऑस्करच्या रेसमध्ये गेलाय

सोरारई पोटरु नावाचा सिनेमा ऑस्करच्या रेसमध्ये सहभागी झालाय. यावर्षी कोरोनामुळे ऑस्करचे नियम शिथिल केल्याने OTT प्लॅटफार्मवर रिलीज झालेला सिनेमे देखील ऑस्करच्या स्पर्धेत असणार आहेत.

नोव्हेंबर २०२० मध्ये हा सिनेमा ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झाला होता. सिंघम फेम सुर्या या सिनेमात आहे.  टिपिकल एक्शन ड्रामा पिक्चर आहे. साऊथचा पिक्चर म्हणल्यानंतर सिनेमात दाखवलेल्या सगळ्याच गोष्टी अतार्किक आणि खोट्या वाटू लागतात. पण हा सिनेमा खऱ्याखुऱ्या व्यक्तीवर आधारलेला आहे. 

त्या माणसाचं नाव कॅप्टन जी. आर. गोपीनाथ

कॅप्टन जी.आर. गोपीनाथ यांच्या सिंम्पली फ्लाई या आत्मचरित्रावर हा पिक्चर बेतलेला आहे. २०११ साली हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालं होतं आणि यातूनच बैलगाडी चालवणारा कशा प्रकारे एअरलाईन्सचा मालक होतं ते सप्रमाण लोकांच्या समोर आलेलं. 

कॅप्टन जी.आर. गोपीनाथ यांचा जन्म कर्नाटकातल्या गोरूर नावाच्या छोट्याशा गावातला.

त्याच्या पाठीवर सात भाऊ बहिण होते. एकूण आठ मुलं. त्यातले कॅप्टन गोपीनाथ हे दुसरे. त्यांचे वडील शिक्षक होते. सोबतच कन्नड साहित्यिक होते. आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी घरातच शिकवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. प्राथमिक शिक्षण घरातूनच झाल्यानंतर पाचवी मध्ये त्यांना एक कन्नड शाळेत प्रवेश मिळाला.

तिथून पुढील शिक्षणासाठी विजापूरच्या सैनिक शाळेत व त्यानंतर पुण्याच्या NDA मध्ये ते गेले. NDA मधून पासआऊट झाल्यानंतर ८ वर्ष त्यांनी भारतीय सैन्यासाठी दिली. या दरम्यान १९७१ च्या बांग्लादेश मुक्तीच्या युद्धात देखील त्यांनी सहभाग नोदंवला होता. 

२८ व्या वर्षी ते आर्मीतून रिटायर झाले आणि त्यानंतर डेअरी फार्मिंगच्या व्यवसायात शिरले. डेअरी फार्मिगमधून रेशीम उत्पादन, पोल्ट्री व्यवसाय, हॉटेल, रॉयल एनफिल्डची डिलरशीप व स्टॉकब्रोकर असे हात मारत राहिले. 

पुरेसा पैसा जोडल्यानंतर या माणसाने एविएशनचा विचार केला. आत्ता तुम्ही म्हणाल त्यासाठी बक्कळ पैसा हवाय. तर तस नसतं भिडू. यासाठी तुम्ही मराठी माणसाने सुरू केलेल्या एविएशन कंपनीची स्टोरी वाचू शकता. 

एविएशनचा हा व्यवसाय १९९६ सालात सुरू झाला.

तेव्हा डेक्कन एविएशन नावाची कंपनी सुरू करुन त्यांनी चार्टर हेलिकॉप्टर भाड्याने देण्यास सुरवात केली. पहिल्याचं प्रयत्नात त्यांचा चांगला जम बसला. भारतभर या कंपनीचं नाव झालं. त्यानंतर २००३ सालात ते एअर डेक्कन च्या बिझनेसमध्ये उतरले. 

या बिझनेस मॉडेल नुसार सर्वसामान्य व्यक्तीला कमीत कमी पैशात विमानात बसता येईल याची तरतुद केली होती. बेंगलोर ते हुबळी असा पहिला प्रवास या एविएशन कंपनीमार्फत सुरू करण्यात आला.

यासाठी त्या काळात म्हणजे २००३ साली पाच कोटींच भांडवल गोळा करण्यात आलं होतं. २००६ पर्यन्त एअर डेक्कनचे सात ठिकाणी नवे रुट सुरू झाले होते. या सर्व बिझनेसमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिकीटाचे पैसे. समोरचा ज्या दरात प्रवासभाड आकारतो त्याच्या निम्म्या पैशात प्रवासभाडं आकारायचं असा दंडकच त्यांनी आखला होता. 

त्यामुळे कमी काळातच ४३ विमानांसह ६० मार्ह त्यांच्या हातात आले. विमानाच्या आत आणि बाहेर जाहिरात करुन देखील पैसे कमावले जावू शकतात हे त्यांनी हेरलं. २४ तास कॉल सेंटरची सुविधा. पण याच काळात एक तगडा प्रतिस्पर्धी त्यांना मिळाला. 

विजय मल्ल्या एविएशनच्या बिझनेसमध्ये उतरले आणि खेळ सुरू झाला… 

विजय मल्ल्या यांची सुरवातीची आयड्या देखील कॅप्शन गोपीनाथ यांच्याप्रमाणेच होती. कमी पैशात विमान प्रवास हा अजेंडा त्याने देखील राबवण्यास सुरवात केल्याने कॅप्शन गोपीनाथ यांची कंपनी अडचणीत येवू लागली. अखेरीस त्यांनी आपली एअर डेक्कन किंगफिशयर एअरलाईन्सला विकावी लागली. हे विलय झाल्यानंतर किंगफिशियर रेड नावाची कंपनी अस्तित्वात आली. 

त्यानंतर त्यांनी एअर डेक्कन ३६० नावाने विमानाद्वारे कार्गो सेवा सुरू केली पण ती कंपनी देखील त्यांना २०१३ साली बंद करावी लागली.. 

आज कॅप्टन गोपीनाथ काय करतात..? 

आज ७० च्या घरात पोहचलेले कॅप्टन गोपीनाथ मस्तपैकी बंगलोरमध्ये आयुष्य जगतायत. त्यांनी मधल्या काळात म्हणजे २०१४ साली निवडणूक देखील लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. २०१७ साली त्यांनी दूसरं पुस्तक यू मिस नॉट दिस प्लाईट : एसेज ऑन इमर्जिंग इंडिया लिहलं.

कॅप्टन गोपीनाथ यांनी नेमकं हे यशस्वी होते का अपयशी याहून अधिक चर्चा या माणसाने बैलगाडीत बसणाऱ्या माणसाला विमानात बसण्याचं स्वप्न दाखवलं आणि ते पूर्ण केलं, विमान प्रवासाचे तिकीटदर कायमचे कमी करुन टाकले हे म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.