१५ मिनीटांचा रोल वाट्याला आला असेल, चेल्लम सर त्यातही भाव खावून गेले

आपल्या देशात सरकारपेक्षा जास्त अपेक्षा ही वेब सिरीजकडून ठेवण्यात येते. कोरोनामुळे सध्या थेटर बंद आहे. त्यामुळे पिक्चर, वेब सिरीज पाहणाऱ्यांचे सर्व लक्ष ओटीटी प्लॅटफॉर्म वर आहे. अशातच फॅमिली मॅन चा दुसरा सीजन आलाय.

प्रेक्षक, क्रिटीक्सकडून वाह-वाह करण्यात येतेय.

मनोज बाजपेयी, समंथा अक्किनेनी, शारीब हाशमी यांच्या अभिनयाची खूप चर्चा होतेय. मात्र या सगळ्यात फॅमिली मॅन २ मध्ये चेल्लम सरांचा बोलबाला आहे. केवळ १५ मिनिटाच्या रोल मध्ये चेल्लम सरांनी केलेल्या कामाबद्दल खूप बोलण्यात येत आहे.

चेल्लम सर वरून सोशल मिडीवर #chellmsir चा ट्रेड सुद्धा सुरु आहे.

काही जण तर त्यांची तुलना गुगल, विकिपीडियाशी करत आहेत. सगळ्या समस्यांचा इलाज चेल्लम यांच्याकडेच आहेत. त्यामुळे फॅमिली मॅन २ पाहतांना असे वाटते की या वेब सिरीजचे खरे हिरो हे चेल्लम सर आहेत.

फॅमिली मॅन २ मध्ये चेल्लम सरांचा काय रोल आहे?

श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी) मुख्य भूमिकेत आहे. तो टास्कची नोकरी सोडून खासगी नोकरी करत असतो. मात्र त्याला टास्क शिवाय त्याला करमत नाही. देशाच्या पंतप्रधान बसू आणि श्रीलंकेचे राष्ट्र्पती यांच्यात चेन्नई येथे बैठ होणार असते. मात्र या बैठकीला श्रीलंकेतील तमिळ ग्रुपचा विरोध असतो. पंतप्रधान बसू यांच्यावर हल्ला करण्यासाठी मोठा कट रचण्यात येतो. तो कट उधळून लावण्यासाठी श्रीकांत तिवारी पुन्हा टास्कला जॉईन होते.

चेन्नई हल्ला उधळून लावतांना ज्या-ज्या ठिकाणी श्रीकांत तिवारीला अडचणी येतात. त्यावेळी श्रीकांत तिवारी एक नंबरवर फोन करतो. चेल्लम सरांना. त्यानंतर चेल्लम सर आपल्या पिशवीतून फोन काढतात. तो कट करतात. नंतर पिशवीतून दुसरा फोन बाहेर काढतात. पहिल्या मोबाईलवर आल्यावर नंबर वर फोन करतात.

टास्कच्या टीमला ‘योग्य’ माहिती देण्याचे काम चेल्लम सर करतात.

बंडखोरांपासून ते सरकारी अधिकारी यांच्या संबधित सर्व प्रश्नांची उत्तरे चेल्लम सरांकडे असतात. त्यांना देशाचा माजी गुप्तहेर म्हणून सिरीज मध्ये दाखविले आहे. तपासा दरम्यान ज्या-ज्या वेळी श्रीकांत तिवारीला गरज पडते ते चेल्लम सरांना फोन करतात.

केवळ १५ मिनिटाच्या रोल मध्ये भाव खावून गेले

फॅमिली मॅन २ च्या दुसऱ्या सिजनमध्ये ९ एपिसोड दाखविण्यात आले आहे. प्रत्येक एपिसोड साधारण ५० ते ६० मिनिटांचा आहे. त्यात चेल्लम सरचा १५ मिनिटाचा रोल आहे. मात्र या १५ मिनिटात चेल्लम सर भाव खावून जातात. वेब सिरीज पाहतांना जाणवते की, श्रीकांत तिवारी जरी टास्कसाठी काम करत असले त्यांच्या दोन पावले पुढे चेल्लम सर काम करत आहेत.

बंडखोर काय करणार आहेत, पहिले कशा प्रकारे काम केले आहे, ते कुठे सापडतील या सर्व प्रश्नांची माहिती चेल्लम सरकडे आधीपासुनच असते. ते एकेकाचे वेळी अनेक फोनचा वापर करतात.

कोण आहेत चेल्लम सर?

ही वेब सिरीज बघून सर तुम्हाला चेल्लम सर कोण आहेत हा प्रश्न पडला नसले तर नवलच.

उदय महेश साउथचे पिक्चर आणि टीव्ही वरचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांचे पूर्ण नाव उद्याभानु महेश्वरण आहे. मात्र ते संपूर्ण दक्षिण भारतात उदय महेश नावाने ओळखले जातात. २१ फेब्रुवारी १९७० मध्ये तमिळनाडूत त्यांचा जन्म झाला.

उदय महेश केवळ अभिनेते नाहीत त्यांनी आता पर्यंत २ पिक्चरचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे. ‘ऑफिस’ या टीव्ही शोमुळे ते दक्षिण भारतातील घरा-घरात पोहचले आहेत.

रजनीकांत सोबत कबाली मध्ये काम

उदय महेश यांनी २०१३ मध्ये ‘मुदर कुदम’ या पिक्चर पासून अभिनयाला सुरुवात केली आहे. उदय महेश यांनी आता पर्यंत २१ पिक्चर मध्ये काम केले आहेत. त्यात मद्रास कॅफे, सिरीयस मेन बरोबरच सुपरस्टार रजनीकांत यांच्या सोबत ‘कबाली’ मध्ये छोटासा रोल केला आहे.

१५ मिनिटाच्या एक्टिंग नंतर सोशल मिडीयावर हवा

उदय महेश यांनी वर सांगितल्या प्रमाणे बॉलीवूड, टॉलीवूडच्या २१ पिक्चर मध्ये काम केले आहे. टीव्ही शोच्या माध्यमातून दक्षिणेत घरा-घरात पोहचले आहे. मात्र त्यांनी फॅमिली मॅन २ मध्ये केलेल्या १५ मिनिटाच्या एक्टिंग मुळे सोशल मिडीयावर हवा झाली आहे. त्यांच्यावर ढिगाने मिम्स तयार झाले.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.