इतिहासात हरवलेली टिम इंडियाची ऐकेकाळची ‘द वॉल’ ढासळली…

इतिहासात असा क्वचितच कोणी क्रिकेटर असेल जो आपल्या नावापेक्षा आपल्या जोडीदाराच्या नावावरुन ओळखला जात असणार. म्हणजे यांचा-यांचा ओपनिंग पार्टनर, याचा बॉलिंग पार्टनर असं काहीसं.

आपल्या टीम इंडियामध्ये ही असा एक प्लेअर आहे ज्याला सचिन-सेहवाग, सेहवाग-गंभीर, रोहित-धवन या जोडींसारख्या ओळखी पेक्षा इतिहास आणि वर्तमान त्याच नाव आज ही त्याला गावस्करांचा ‘ओपनिंग पार्टनर’ म्हणूनच ओळखतो.

त्यांची क्रिकेटच्या संबंधातील कोणत्याही बातमीची सुरवात ही ‘गावस्कर यांचा ओपनिंग पार्टनर’ याच मथळ्यांनी होते.

कोणताही खेळ प्रत्येक खेळाडूला त्याच्या आयुष्यात एखादी तरी मॅच अशी देतो की तो त्यातुन त्याची स्वतंत्र ओळख बनवुन जातो. आपल नाव तिथं सुवर्ण अक्षरामध्ये लिहून जातो. म्हणजे जसं इंग्लंडविरुद्धचे युवराज सिंगचे सहा सिक्स, पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये अनिल कुंबळेंच्या दहा विकेट्स, श्रीलंकेविरुद्धच्या रोहितच्या डबल सेंच्युरी, धोनी, विराटच्या अनेक मॅचमधील सेंच्युरी. पण हे झालं रेकाॅर्डमॅनचं. नाॅन रेकाॅर्डमॅनच काय? इतिहास अशा खेळाडूंना विसरतो का?

आपलं टेक्निक, टेंपरामेंट असं ही स्किल काही प्लेअरकडं असतचं की ज्या स्किलवर ते आपल करिअर घडवतात. खूप यशाच्या शिखरावर वगैरे नाही पण आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतात.

आपण राहुल द्रविडला टीम इंडियची ‘द वाॅल’ म्हणून आजही ओळखतो.

तो ग्रेटच होता, यात तीळ मात्र शंका नाही. त्याची तुलना दुसरी नाहीच. पण इतिहासात असा ही एक प्लेअर होवून गेला ज्याला आऊट करणं खरोखर अवघड मानलं जायचं. तो खेळायला लागली की फक्त खेळायचा.

आणि 100% फक्त टीमसाठी खेळायचा. सेंच्युरी जवळ आली की आपला खेळ सावध खेळायचं असला दळभद्री विचार त्याच्या मनाला देखील कधी शिवला नाही. त्याच्या खेळाची नैसर्गिक ओळखच मुळात सावधपणा ही होती, अगदी पहिल्या मॅच पासूनच! (पहिल्या मॅचमध्ये त्याने आपली पहिली धाव घेण्यासाठी तब्बल 25 मि. घेतली होती.)

त्याचा खेळ सावधपणाचा असला तरी खेळायचा मात्र दर्जाच! आपलं टेक्निक, टेंपरामेंट आणि स्किल या जोरावर त्यानं करिअर घडवलं होतं. अशा या इतिहासातील ऐकेकाळच्या ‘द वाॅल’चे नाव आहे चेतन चौहान…

आल्याच्या पहिला दिवसापासूनच ते खेळपट्टी पाय रोवून उभा रहिले. चेतन चौहान हे जागतिक क्रिकेटमधले पहिले खेळाडू होते की ज्यांनी एकही शतक न झळकावता 2000 रन्सचा टप्पा पूर्ण केला होता. 1980-81 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ॲडलेड कसोटी सामन्यातील त्यांच शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं होतं. त्याची हीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

● गावसकर चौहान ओपनिंग जोडी :

सलामीला खेळताना गावस्कर-चौहान या दोघांनी जवळपास 60 डावांमध्ये 11 शतकी पार्टनशिप रचल्या; त्यातील 10 पार्टनरशिप या ओपनिंगला येवून केल्या आहे. दोघांच्या जोडीने तब्बल 3022 रन्सचा रतिब घातला. पण या सगळ्यामध्ये चेतन यांची दुर्देवाने एकही सेंच्युरी नाहीये. आता तुम्ही म्हणाल 3000 हजार धावा करण्यात काय विषेश आहे? पण भिडूनों तुम्ही 2020 मधील विचार करताय आणि आम्ही ही गोष्ट सांगतोय ती 70 च्या दशकातील आहे.

साल 1979 साली इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये ओव्हलच्या हिरव्यागार मैदानावरील शेवटच्या टेस्टमध्ये सामन्याच्या दुसर्‍या डावात भारताकडून सुनील गावस्कर आणि चेतन चौहान या ओपनिंग जोडीने अवघड परिस्थीतीमध्ये पहिल्या विकेटसाठी केलेली 213 धावांची भागीदारी आजही अजरामर आहे.

● टीमबाहेर गेले की घालवलं ?

साधारण 1969 च्या दरम्यान चौहान टीममध्ये आले आणि 1981 ला टीमच्या बाहेर देखील गेले. ते गेला की त्यांना क्रिकेटमधील राजकारणाणं घालवला हा प्रश्न अलाहिदा पण 1981 नंतर निवडसमितीनं त्यांची निवडच केली नाही. एका मुलाखतीदरम्यान ते सांगतात मी आज ही रात्री झोपल्यानंतर कधी तरी या प्रश्नाने जागा राहतो की ‘चांगल्या फॉर्ममध्ये असूनही निवडसमितीनीने इंग्लंड दौऱ्यासाठी माझी निवड का केली नाही?’

● देशांतर्गत क्रिकेटमधील जबरदस्त कामगिरी :

देशांतर्गत क्रिकेटमधील त्यांची कामगिरी जबरदस्त होती. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळलेल्या 179 सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर 11 हजार रन्स जमा असून त्यात त्यांच्या 21 शतकांसह  59 अर्धशतकांचा देखील समावेश आहे. 1972-73 सालच्या रणजी मोसमात त्यांनी गुजरात आणि विदर्भाच्या संघाविरुद्ध खेळताना सलग 2 द्विशतकं झळकावली होती.

● व्यवस्थापकाची जबाबदारी :

चौहान हे बऱ्याचदा भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. 2001 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी कसोटीच्यावेळी त्यांनी संघाचे व्यवस्थापन केले होते. 2007-08 मध्येही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ते भारताचे व्यवस्थापक होते.

● राजकारणातील दुसरी इनिंग :

निवृत्तीनंतर 1985 मध्ये चौहान राजकारणाकडे वळले. ते भारतीय जनता पार्टी पक्षात सामील झाले. त्यानंतर बऱ्याच काळानंतर ते 2 वेळा अलमोरा, उत्तर प्रदेशचे खासदार बनले. ते उत्तर प्रदेशमधील नौगाव सादात विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनित्व करत होते. तसेच योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातील क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणून काम पाहत होते.

  • भिडू ऋषिकेश नळगुणे 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.