मुस्लीमांकडे औरंगजेबाजाला पर्याय आहे तो म्हणजे दारा शुकोह… 

सुमारे सात वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा राज्यात भाजप सेना युतीचं शासन होतं. दरवर्षी औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीपुर्वी जो वाद चर्चेला येतो तोच वाद पुन्हा चर्चेत आला होता. वाद होता औरंगाबाद शहराच्या नामांतराचा. समर्थन आणि विरोध दोन्ही गोष्टी चालू होत्या. 

अशातच संतसाहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांचे एक स्टेटमेंट चर्चेत आलं. हे स्टेटमेंट होतं औरंगाबाद शहराला दारा शुकोहचं नाव द्या… 

दोनतीन दिवस चर्चा झाली आणि चर्चा विस्मृतीत गेली. २०१९ मध्ये दारा शुकोह याच्यावर आयोजित परिसंवादात संघाचे सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल म्हणाले होते की औरंगजेबाच्या ऐवजी जर दारा शिकोह दिल्लीचा सम्राट झाला असता तर देशात इस्लाम सर्वधर्म समभाव धोरणाने चांगल्या पद्धतीने वाढला असता. 

परवा MIM चे औवेसी व इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरचे दर्शन घेतले. त्यानंतर महाराष्ट्रात वाद पेटू लागला. सर्वसमान्यांच्या दृष्टीने औवेसींनी केलेली ही कृती औरंगजेबाच्या उद्दात्तीकरणाची आहे. 

मुस्लीम समाजापुढे औरंगजेबाचे उद्दात्तीकरण करुन कट्टरतावादाला खतपाणी घालण्याचा हा प्रकार असल्याचं बोललं जातय. अशा वेळी दारा शुकोह आठवल्याशिवाय रहात नाही. कारण दाराशिकोह फक्त मुस्लीम होता म्हणून नव्हे तर आजच्या या फोडाफोडीच्या वातावरणात दाराशुकोह चा विचार खरच समजून घेण्यासारखा आहे. 

कोण होता दाराशुकोह.. 

यासाठी दारा शुकोह यांच्या बद्दल डॉ. अर्मत्य सेन यांनी भारत या पुस्तकात लिहलेल्या काही ओळी पहायला पाहीजेत या पुस्तकात अर्मत्य सेन लिहतात, 

दारा शुकोह फक्त औरंगजेबाचा मोठ्ठा भाऊच नव्हता तर त्याने धर्मनिरपेक्ष चळवळीसाठी आयुष्य वेचले. हुमायून आणि अकबर या दोन्ही मुघलांचे गुण त्याच्यात होते. हिंदू आणि मुस्लीम धर्माच्या अनुयायांना एकत्र करुन शांतता प्रस्थापित करणं हे त्यांच उद्दिष्ट होतं. परमेश्वराचा शोध घेणे हे सगळ्यांसाठी समान असते. 

वैदिक व इस्लामिक तत्वाज्ञान एकत्र करायला हवे, कुराणातील किताब अल मकनुन म्हणजे वास्तवात उपनिषदच आहे अस त्याचं मत होतं. यासाठी त्याने संस्कृतचा अभ्यास केला होता. उपनिषदे, भगवद्तगिता आणि योग वसिष्ठाचा पर्शियन भाषेत अनुवाद केला होता. 

इतकच नाही तर या पुस्तकात दारा शुकोह बद्दल सांगितलं आहे की, युरोप आणि पश्चिम आशियामध्ये त्याच्यामुळेच हिंदू तत्वज्ञान पोहचे होते. त्यासाठी त्याला बनारसच्या पंडितांनी मदत केली होती. सोबतच अकबर आणि कबीरच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने हरराय या शीख गुरूला प्रोत्साहन दिले होते. इतक्यावर नाही तर अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या शिलान्यासाठी त्याला बोलावण्यात आलं होतं..”

असं अर्मत्य सेन यांच्या पुस्तकात नमुद करण्यात आलं आहे. 

याहून अधिक माहिती भारत सरकारच्या इंडियन कल्चर या संकेतस्थळावर देखील देण्यात आलेली आहे.

पंचविसाव्या वर्षी दारा शुकाह ने आपलं पहिलं पुस्तक लिहलं. सफीनात उल औलिया या पुस्तकात पैंगबर आणि त्यांच कुटूंब, खलीफा सोबतच भारतातील प्रमुख सुफी संघ आणि त्यांच्याशी संबंधित संतावर हे पुस्तक आहे. 

दारा शुकोहनं नक्की काय केलं तर दारा शुकोहने हिंदू धर्माप्रती मुस्लिमांची समज वाढवण्यासाठी ज्या मुस्लिम शासकांनी काम केलं त्यातं त्याला गणंल जातं. बर दारा शुकोहने फक्त इतकच केलं नाही तर दारा शिकोह “मुकालिमा ए दारा” शिकोह व बाबा लाल यांच्यातल्या अध्यात्मिक चर्चा स्पष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंदू धर्मच्या विविध पैलूवर चर्चा आहे. 

सोबतच दारा शुकोहने उपनिषदांच्या पन्नास अध्यायांचा अनुवाद देखील केला होता. 

शाहजहानला पुढचा बादशहा म्हणून दारा शुकोहच हवा होता. पण दरबारी राजकारणात दारा शुकोह काफीर म्हणूनच गणला जात होता. १६५४ मध्ये शहाजहांनने सुल्तान बुलंद इक्बाल पदवी देवून पुढचा मुघल सम्राट दारा शुकोहचं असेल यावर शिकामोर्तब केले होते. 

शहाजहा आजारी पडल्यानंतर त्याच्यानंतर कोण याबद्दल चर्चा सुरू झाल्या आणि तिनही भावांनी दिल्लीकडे कुच केली. युद्धात पराभव झाल्यानंतर दारा शुकोह औरंगजेबापासून लपत अफगाणिस्तानात राहू लागला. पण त्याला पकडून त्याचे डोकं उडवण्यात आलं. अत्यंत क्रुर पद्धतीने दारा शुकोहचा अंत झाला. 

आजही इतिहासात दारा शुकोह बाबत इतिहासकार लिहताना म्हणतात, तो जर मुघल सम्राट झाला असता तर आज भारताचा इतिहास वेगळा असता. धर्माला धर्माने तोडणारा औरंगजेब नाही तर मुस्लीम राजवटीत हिंदूना समान वागवणारा, दूसऱ्या धर्माबद्दलपण आत्मियता असणारा दारा शुकोह हाच उत्तम आदर्श ठरू शकतो.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.