भारतातील पहिली डिलक्स ट्रेन ‘डेक्कन क्वीन’ आज 92 वर्षांची झालीये…

मुंबई-पुणे प्रवासाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत मात्र अनेकांची पहिली पसंती असते ती डेक्कन क्वीनला. डेक्कन क्वीनवर पुणेकरांचं विशेष असं प्रेम आहे. तिला दख्खनची राणी म्हणून सुद्धा ओळखलं जाते.

ब्रिटिश अधिकाऱ्यांना मुंबई-पुणे दरम्यान आरामशीर प्रवास करता यावा यासाठी तेव्हाच्या ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ने (जीआयपीआर) अर्थात आताच्या मध्य रेल्वेने ‘डेक्कन क्वीन’च्या रूपाने १ जून १९३० रोजी ही ट्रेन सुरु करण्यात आली होती.

डेक्कन क्वीनच्या रूपाने भारतातील पहिली डिलक्स रेल्वे झाली.

९२ वर्षांनंतरही डेक्कन क्वीन बद्दलचे क्रेज पुणेकरणांमध्ये पाहायला मिळते. घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांची ने-आण करण्यासाठी मुंबई व पुण्या दरम्यान ही ट्रेन धावत होती.

ब्रिटिश साम्राज्यापासून सुरु करण्यात आलेल्या या ट्रेन यामध्ये सुरुवातील फक्त ब्रिटिश नागरिकच प्रवास करू शकत होते. या ट्रेनने ब्रिटिश अधिकारी प्रवास करणार होते. त्यामुळे हा ट्रेनचे ओरिजनल मॉडेल ब्रिटन मध्ये तयार करण्यात आला होता. त्यानंतर मुंबईतील रेल्वेच्या माटुंगा येथील वर्कशॉप मध्ये तयार करण्यात आले.

पहिले काही वर्ष ही ट्रेन साप्ताहिक होती. आणि केवळ इंग्रजांनाच यात प्रवेश देण्यात येत होता. एक दशकानंतर ट्रेनच्या प्रवाशांची संख्या घटली चालली होती. १९४३ पासून भारतीय नागरिकांना या ट्रेन मध्ये प्रवास करायला परवानगी तर दिलीच आणि ही ट्रेन मुंबई-पुण्या या दोन शहरा दरम्यान दररोज धावू लागली.

वेग आणि वक्तशीरपणा ही तिची ओळख आहे.

त्यावेळी दोन महानगरांमध्ये धावणाऱ्या ट्रेनचे इंजिन हे वाफेवरचे असायचे. डेक्कन क्वीन ही देशातील पहिली ट्रेन होती तिला इलेक्ट्रिक इंजिन ओढत होते. यामुळे इतर ट्रेनला मुंबई-पुणे अंतरपार करायला ५ तास लागत होते. डेक्कन क्वीन हेच अंतर पावणे तीन तासात पार करते. ही भारतातील पहिली अति जलद ट्रेन होती.

पुण्यावरून सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी निघते आणि सकाळी साडे दहा वाजत मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस अर्थात सीएसटीला पोहचते. तर मुंबईहून सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सीएसटी वरून निघते आणि पुण्याला रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी पोहचते. यामुळे पुण्यावरून रोज नोकरी निम्मित मुंबईला जाणाऱ्यांची आवडती आहे.

डायनींग कारची व्यवस्था

डेक्कन क्वीनमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून डायनींग कारची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये जाऊन प्रवासी खाद्य पदार्थ खाऊ शकत होते. मध्यंतरी ही डायनींग कार काढून टाकण्यात आली आहे. या डायनींग कारला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले होते. तर त्यांची नोंद लिम्का बुक मध्ये नोंद करण्यात आली होती. डायनींग कार ऐवजी २०१४ मध्ये पॅन्ट्री कार जोडण्यात आली होती. 

प्रवाशांच्या विरोधानंतर पुन्हा एकदा डायनिंग कार बसविण्यात आली असून यात एकाचवेळी ४० जण बसून खाऊ शकतात.  

महाराजा एक्सप्रेस, डेक्कन ओडीसी, पॅलेस ऑन व्हील या महागडय़ा गाडय़ांशिवाय डायनिंग कारची सुविधा असलेली ही एकमेव गाडी असल्याचे सांगण्यात येत.

काळानुसार या पहिल्या डिलक्स गाडीत काही बदल करण्यात आले. या गाडीत फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास डब्बे होते. स्वातंत्र्यानंतर फर्स्ट क्लास डब्बा काढून टाकण्यात आला आणि सेकंड क्लासच्या डब्बात पुनर्रचना करून त्याला फर्स्ट क्लास डब्बा केला.

सुरुवातीला पूर्ण निळ्या रंगाच्या या गाडीला पांढऱ्या-निळ्या रंग देण्यात आला. १९६६ मध्ये डेक्कन क्वीनच्या डब्यात अनेक बदल करण्यात आले. तसेच ७ डब्ब्यावरून १२ करण्यात आली. गेली अनेक वर्ष डेक्कन क्वीन याच रंगामुळे ओळखली जात होता. आता नवीन डब्बे बसविण्यात आले आहेत. आता एकूण २० डब्बे असून चार डब्बे एसी चेअर कार, ८ सेकंड क्लास डब्बे, एक विस्टा डोम कोच आहे.

डेक्कन क्वीनच्या नावावर पहिलेपणाचे अनेक विक्रम नोंद आहेत.

पहिल्या दिवसापासून इलेक्ट्रिक इंजिनावर चालणारी पहिली प्रवासी गाडी, भारतातील पहिली डिलक्स गाडी, पहिली सुपरफास्ट गाडी, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सोय असणारी पहिली गाडी, महिलांचा व खानपान सेवेचा स्वतंत्र डबा असणारीही ही पहिलीच गाडी.

दरवर्षी १ जून रोजी प्रवासी संघाच्या पुढाकारातून डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. आता २७ वर्षानंतर डेक्कन क्वीनच्या रूपात बदल झाला असून जर्मन टेक्नॉलॉजी बेस्ड कमी वजनाचे आणि हाय कॅपेसिटी असणारे डब्बे बसविण्यात आले आहे. यामुळे डेक्कन क्वीनची सुरक्षितता, क्षमता वाढणार आहे. तर ट्रेनचा स्पीड आधी १२० किलोमीटर प्रति तास होता ती आता १६० किलोमीटर प्रति तास होणार आहे.

दररोज धावणाऱ्या या ट्रेन मध्ये हजारो प्रवासी प्रवास करत असतात. नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पास ची सोय असून त्यांच्यासाठी वेगळा डब्बा लावण्यात येतो.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.