मागच्या ४ दशकांपासून दिनेश हिंगुंचा एकही पंच फेल गेलेला नाहीये…

हॅलो देवीप्रसाद घर पर है ?

हे वाक्य हेराफेरी सिनेमात आपण बऱ्याचदा ऐकल असेल आणि परेश रावलच्या डायलॉग वर सुधा हसलो असेल पण देवीप्रसाद घर पर है असं म्हणणारी व्यक्ती कोण होती तर ते होते दिनेश हिंगु. कॉमेडी म्हटल्यावर सगळ्यात आधी डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे चार्ली चॅम्पियन आणि भारतातच बोलायचं झालं तर जगदीप आणि जॉनी वॉकरसारखे कॉमेडियन. त्यामध्ये जॉनी लिव्हर सुद्धा येतो.

पण तब्बल 40 वर्षांपासून एकही पंच फेल न गेलेला कलाकार म्हणजे दिनेश हिंगू, ज्यांनी चार दशकांहून जास्त काळ लोकांना गुदगुल्या न करताही हसवण्याच काम केल आहे. आपल्याला पडद्यावर हसवणाऱ्या व्यक्तीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात खलनायक म्हणून केली हे फार कमी लोकांना माहिती आहे. होय, हे धक्कादायक असलं तरी हे खर आहे. दिनेश हिंगूबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या फार कमी लोकांना माहिती असतील. तर जाणून घेऊया या महान विनोदविराबद्दल.

बऱ्याच लोकांचा आयुष्य हे समजण्यातच निघून जातं की नक्की आपल्या आयुष्यात करायचं काय. पण 13 एप्रिल 1940 रोजी गुजरात मध्ये बडोदा येथे जन्म झालेले दिनेश हिंगू सुरुवातीपासूनच अभिनय करायचा या बाबतीत पक्के होते. आपल्या आयुष्यामध्ये अभिनय एके अभिनय एवढेच ध्येय त्यांनी जोपासले. त्यामुळे शालेय वेळेत नाटकामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. जसजसं वय वाढत गेलं तशी तशी त्यांनी आपल्या अभियानात सुधारणा केले आणि 1963 झाली सिनेमात करिअर करायच म्हणून आणि बॉलीवूडवर राज्य करायचे म्हणून दिनेश हिंगू मुंबईत आले.

दिनेश हिंगू मुंबईत आले खरे पण सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे काहीच काम नव्हतं उरलंसुरलं होते भक्त टॅलेंट आणि विश्वास. पण सुरुवातीच्या काळात त्यांना जास्तीत जास्त संघर्ष करावा लागला. सिनेमांमध्ये काम तर मिळालाच नाही पण अभिनयाच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी थेटर जॉईन केलं.

दिनेश हींगु यांना सिनेमात अभिनय करायचा होता. सोबतीला थेटर सुद्धा चालू होतं उरलेल्या वेळात ते स्टेज शो सुद्धा करू लागले होते. कमालीची गोष्ट ही होती मोठमोठ्या गायकांच्या येण्याअगोदर दिनेश हिंगू त्यांची कमी भरून काढण्यासाठी स्टँड अप कॉमेडी करायचे जेणेकरून लोक शो शेवटपर्यंत बघतील. या मोठ्या गायकांमध्ये मोहम्मद रफी पासून ते थेट मन्ना डे पर्यंत नाव होती. दिनेश हिंगू यांचे स्टँड अप आजच्या स्टॅन्ड अप सारखे नसायचे ते गायकांची, कलाकारांची मिमिक्री करायचे.

दिनेश हिंगू कॉमेडी करायचे खरे पण त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात ही व्हिलन म्हणून झाली. 1967 झाली त्यांना पहिला सिनेमा मिळाला तो होता तकदीर. आता विलन म्हणून सिनेमा मिळाला खरा पण त्यात ते लीडव्हीलन नव्हते. या सिनेमात दिनेश में विलन कमल कपूर यांचे हेचमन होते. त्यामुळे त्यांना जास्त नोटीस केलं गेलं नाही. नंतर सहा वर्षानंतर जया बच्चन स्टार असलेल्या कोरा कागज या सिनेमात त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली. या सिनेमात लोकांनी त्यांचं कौतुक केलं.

त्यानंतरच्या पुढच्याच वर्षी इंडस्ट्रीला एक नवीन कॉमेडीयन मिळाला सिनेमा होता नसबंदी हा पहिलाच सिनेमा होता ज्यात दिनेश हींगू यांनी कॉमेडी केली आणि लोकांनी तिचं कौतुक केलं त्यानंतर अशी कुठलीही फिल्म आले नाही ज्यात डायरेक्टरने दिनेश हिंगू यांचे कॉमेडी सीन जोडायला विसरला नाही. आता दिनेश हिंगू इतके प्रो झाले होते की त्यांना डायलॉग दिले जात नसायचे फक्त सिच्युएशन सांगितली जायची आणि पूर्णच्या पूर्ण सीन त्यांच्यावर सोडला जायचा.

दिनेश हिंगू आणि जॉनी लिव्हर यांनी बऱ्याच सिनेमात एकत्र काम केलं. पण लोकांना हे माहिती नाही की जॉनी लिव्हर ला स्टेज देणारा दिनेश हिंगू हा अभिनेता होता त्याच मुळे जॉनी लिव्हर दिनेश हिंगू यांचा आदर करतात दोघांनी आपलं कॉमेडी टाइमिंग बऱ्याच सिनेमांमध्ये दाखवून दिलय.

आता बाजीगर सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये खोटं खोटं हसण्याचा दिनेश हिंगू आणि जॉनी लिव्हर यांचा सीन आहे जो कितीही वेळेस बघा तुम्ही बोलणार नाही आता या सीनची आयडिया दिनेश हिंगू यांना आली होती. त्यांनी एका माणसाला असं करताना बघितलं होतं जो एक शब्दही न बोलता हसायचा तेचं पात्र त्यांनी उचललं आणि तो सीन हिट झाला.

दिनेश हिंगू यांनी 300 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले त्यामध्ये हिंदी सोबतच इतर भाषांचाही समावेश आहे. कोरा कागज तुम्हारे लिये लेडीज टेलर नमक हलाल पासून ते बाजीगर बादशहा नो एन्ट्री आणि हेराफेरी या सुपरहिट सिनेमाचा समावेश आहे. सध्याच्या घडीला ते 82 वर्षाचे आहेत. पण गेली चाळीस वर्ष बॉलिवूडमध्ये काम करत असताना त्यांचा एकही पंच फेल गेलेला नाही हे मोठे विशेष.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.