मॉडेलिंग करायला आलेली पोरगी टी सिरीजची मालकीण झाली…

टी सिरीज म्हणल्यावर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येणारा चेहरा म्हणजे गुलशन कुमार. या माणसाने एकेकाळी सगळ्या भारताला देवांच्या गाण्यांचं वेड लावलं होतं. म्युझिक चॅनलला YouTube सबस्क्राईबर असण्याचा मान हा टी सिरीजला जातो. ही कंपनी सुरू करणाऱ्या गुलशन कुमार यांची अंडरवर्ल्डनं गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर, कंपनीला व्यवस्थित पुढे नेलं ते टी सिरीजच्या मालकिणीने अर्थात दिव्या खोसला कुमारने. आज जाणून घेऊया याच दिव्या खोसला कुमारबद्दल.

दिव्याचा जन्म 27 नोव्हेंबर 1981 रोजी दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात झाला. तिचं पालनपोषण नवी दिल्लीत झालं. दिव्याचं सुरुवातीचं शिक्षण दिल्लीतील एका शाळेत झालं आणि नंतर तिने जानकी देवी मेमोरियल कॉलेजमधून बॅचलर ऑफ कॉमर्सचा सराव केला. अभ्यासात ती खूप हुशार मुलगी होती म्हणून लहानपणी तिच्या आईने तिला चित्रपट पाहण्याची परवानगी दिली नाही.

पण अभिनयाचं वेड लपून राहत नाही पण अभिनयाऐवजी आपण मॉडेलिंग करावं या हिशोबाने दिव्या खोसला कुमार मॉडेलिंगकडे वळली. यातून ओळखी वाढत गेल्या. दिव्याने तिच्या अभिनय कारकिर्दीला सलमान खानसोबत ‘हनी हनी’ नावाच्या म्युझिक व्हिडिओने सुरुवात केली. त्यानंतर, 2004 मध्ये, “अब तुम्हारे हवाला वतन साथियो” या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिने श्वेता राजीव सिंगची भूमिका साकारली होती. त्याच वर्षी तीने ‘लव्ह टुडे’ या चित्रपटातही काम केले. त्यानंतर तिने ‘सनम रे’ चित्रपटातील हम पे राखी आणि अक्कड बक्कड या गाण्यांमध्ये काम केले. दिव्याने 2017 मध्ये आशिष पांडाची शॉर्ट फिल्म “बुलबुल” मध्ये मुख्य भूमिका साकारली होती.

आता करियर एका बाजूला ठेवलं तर दिव्या खोसला कुमार टी सिरीजची मालकीण कशी बनली याला कारणीभूत आहे लव्ह स्टोरी. दिव्या खोसला 2004 मध्ये अब तुम्हारे हवाला वतन साथियो या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा दस्तुरखुद्द गुलशन कुमार यांचे चिरंजीव भूषण कुमारला भेटली होती.

तिथे तिची नजर भूषणला भिडली. पण तिने त्याच्यापासून जरा अंतर ठेवलं. पण त्याच्या कामासोबत फोन नंबरची देवाणघेवाण झाली. तरीही दिव्याने भूषण कुमारला काहीच उत्तर दिले नव्हते. पण भूषण कुमारने त्याचा चुलत भाऊ अजय कपूरला दिव्याच्या दिल्लीतल्या घरी पाठवले होते.

त्यानंतर दिव्याच्या कुटुंबाला भूषण आवडला आणि त्यांनी 13 फेब्रुवारी 2005 रोजी वैष्णो देवी मंदिर, कटरा येथे लग्न केले. या दोघांनी सुखी वैवाहिक जीवनातून मुलगा रुहानला जन्म दिला.

दिव्या कुमार खोसलाने 2014 मध्ये यारियां हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्या कॉलेज-रोमान्स चित्रपटात त्यांनी ‘सनम रे’ या रोमँटिक नाटकाचे दिग्दर्शन केले होते. 2003 मध्ये, दिव्या अभिजित भट्टाचार्यच्या “कभी यादों में आऊं” या पॉप गाण्यात दिसली. तिने तेरा मेरा दिल या म्युझिक अल्बममधील “झिद ना करो ये दिल का मामला है” या गाण्यातही काम केले आहे.

मागच्या काही वर्षांमध्ये दिव्या खोसलाच्या करिअरवर नजर टाकल्यावर दिसून येत की, 2019 मध्ये, दिव्याने नेहा कक्करच्या याद पिया की आने लगी या गाण्यात शिवीन नारंग आणि अभिमन्यू तोमरसोबत काम केले. दिव्या खोसला यांनी दिग्दर्शन आणि निर्माती म्हणून अभिनयासोबतच चित्रपटांची निर्मितीही केली आहे. 2015 साली रणबीर कपूरच्या रॉय या चित्रपटातून निर्मात्याची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बाटला हाऊस, खानदानी शफाखाना, मरजावां या चित्रपटांची निर्मिती केली.

मॉडेल बनायला आलेली पोरगी थेट टी सिरीजची मालकीण झाली हे सुद्धा विशेषच म्हणावं लागेल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.