पाकिस्तानच्या डॉ. लेडी अल कायदासाठी एका आतंकवाद्याने यूएसमध्ये चार जणांना कैद केलंय.. 

आता या कोण आहे पाकिस्तानी ‘लेडी अल कायदा’ डॉ आफिया? ज्यांच्यासाठी एका दहशतवाद्याने 4 लोकांना अमेरिकेत कैद केलय.

अमेरिकेतील टेक्सास येथील सिनेगॉग ज्यू टेंपलवर एका दहशतवाद्याने हल्ला केला आणि तेथे ४ लोकांना ओलीस ठेवल. ओलीस ठेवल्यानंतर त्या दहशतवाद्याने एका डॉ. अफियाच्या सुटकेची मागणी केली आहे. ही अफीया नामक महिला टेक्सासमधील तुरुंगात बंद आहे. विचार करण्यासारखी बाब आहे की ज्या महिलेसाठी 4 जणांना ओलीस ठेवण्यात आले ती महिला किती धोकादायक आहे.

तर ही महिला आहे डॉ. आफिया…! 

वास्तविक या दहशतवाद्याने पाकिस्तानी वंशाच्या डॉक्टर आफिया सिद्दीकीच्या सुटकेची मागणी केली आहे. आफिया सिद्दीकी वैज्ञानिक असली तरी जग तिला एक भयानक दहशतवादी म्हणूनही ओळखते. आफिया इतकी भयंकर आहे की तिला लेडी अल कायदा असे नाव देण्यात आले आहे. अफियाला एका दहशतवादी प्रयत्नासाठी अटक करण्यात आली होती ज्यात तिने अमेरिकन सैनिकांना मारण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल आफियाला अमेरिकेतील न्यूयॉर्क कोर्टाने 86 वर्षांची शिक्षा सुनावली होती. सध्या आफिया शिक्षा भोगत आहे.

लेडी अल् कायदा नावानेसुध्दा डॉ. आफिया प्रसिद्ध आहे.

या पाकिस्तानी नागरिकावर म्हणजे ज्याने चार लोकं ओलीस ठेवली आहेत त्याच्यावर अल कायदाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधील अमेरिकेतील गुप्तचर एजंट, सैनिक आणि अमेरिकेत राहणारे पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांच्या हत्येचा कट रचल्यासारख्या आरोपांमध्ये डॉ. अफिया आणि यासोबतच 2011 मध्ये मेमोगेट घोटाळ्याची मुख्य सूत्रधार म्हणून आफियाचे नाव समोर आले. यापूर्वी 2018 मध्ये डॉ आफिया सिद्दीकी प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

त्याच वर्षी, मीडियामध्ये असे वृत्त पसरले की अमेरिकेने पाकिस्तानशी असा करार केला आहे, ज्या अंतर्गत कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला मारण्यात अमेरिकन गुप्तचर संस्थांना मदत करणारे डॉ शकील अहमद यांना पाकिस्तानला परत करावे लागले आणि त्या बदल्यात अमेरिकेने आफिया सिद्दीकीला परत द्यायला हवे.

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून न्यूरोसायन्समध्ये पीएचडी केलेली आफिया 2003 मध्ये दहशतवादी कारवायांशी संबंधित होती. खालिद शेख मोहम्मद या दहशतवाद्याने एफबीआयला आफियाबाबत माहिती दिली होती. या बातमीच्या आधारे अफगाणिस्तानातून अटक करण्यात आलेल्या डॉ. अफियाने अफगाणिस्तानातील बग्राम तुरुंगात एफबीआय अधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नानंतर तिला अमेरिकेत पाठवण्यात आले आणि तेथे तुरुंगात टाकण्यात आले.

डॉ.आफियाला सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळखले जाते. पण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही ती खूप धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. ती एका धर्मादाय संस्थेशी संबंधित असून केनियातील अमेरिकन दूतावासावर तिने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. मे 2002 मध्ये, आफिया आणि तिचा पती अमजद खान यांची एफबीआयने वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्याप्रकरणी विस्तृत चौकशी केली होती.

शिक्षण आणि संगत हे किती महत्वाचं आहे याचं उदाहरण म्हणजे डॉ. आफीया. आता डॉ. असूनही दहशतवादी संघटना जॉईन करून मोठमोठे घातपात घडवणारी आफिया सध्या शिक्षा भोगत आहे पण तिच्या सहकार्याने चार लोकं ओलीस ठेवले आहे त्यांचं पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.