धर्मांतराचा दबाव झुगारून देऊन आनंदीबाईंनी अमेरिकेत डॉक्टरकीच शिक्षण पूर्ण केलं

धर्मांतर हा आपल्याच देशात नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये ऐरणीवर असणारा प्रश्न आहे. हा प्रश्न आज हि जिवंत आहे. अशाच एका स्त्रीच्या शिक्षणाच्या आडवे हे धर्मांतर आले होते. ती स्त्री म्हणजे भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. 

वयाच्या ९ व्या वर्षी त्यांच्या पेक्षा २० वर्षांनी मोठ्या असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि पुण्याची यमुना आनंदीबाई झाली. लग्नानंतर वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी एका मुलाला जन्म दिला पण नियतीने हे सुखं जास्त काळ टिकू दिले नाही. फक्त १० दिवसात या मुलाचा आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने मृत्यू झाला.

जर इतिहास पहिला तर जेव्हा जेव्हा एखाद्या जीवाचा किंवा पर्वाचा अंत झाला तेव्हा तेव्हा एका नवीन पर्वाची किंवा क्रांतीची सुरवात झाली आहे. कदाचित या १० दिवसांच्या मुलाचा मृत्यू देखील अशाच एका पर्वासाठी झाला होता. कारण त्यानंतर आनंदीबाई जोशी यांनी डॉक्टर होण्याचा निश्चय केला.

आजच्या काळात विविध ठिकाणी महिला काम करतांना दिसतात तेव्हा अनेकजण प्रत्येक यशस्वी स्त्री पाठीमागे देखील एक पुरुष असतो असे विधान सरास करतांना दिसतात. पण याची खरी प्रचीती आपल्या १८८३ सालीच दिसते फक्त आपण त्याकडे पहिले नाही असो…

जितकी आनंदीबाईची जिद्द होती तितकीच निष्ठा आणि चिकाटी त्यांचे पती गोपाळराव यांच्यात देखील होती. त्यांनी अमेरिकेत अनेक पत्रव्यवहार केले. पण या प्रयत्नांना यश येत नव्हते.

कारण होते “धर्मांतराचे”

शिक्षण घेण्यासाठी धर्मांतर करण्याची अट मात्र या जोडप्यास मान्य नव्हती. अखेर १८८३ साली त्यांना यश मिळाले आणि धर्मांतर करण्यास नकार देणाऱ्या आनंदीबाई “विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया” या महाविद्यालयात वयाच्या १९ व्या वर्षी दाखल झाल्या.

joshi

पण विरोध न करता शांत राहील किंवा प्रोत्साहन देईल ती तत्कालीन समाजव्यवस्था कसली, या व्यवस्थेने विरोध सुरु केला. 

त्यानंतर कोलकता येथे आनंदीबाई यांनी आपल्या भाषणातून शिकून भारतात परत येऊन महिलांसाठी वैद्यकीय शिक्षण देण्याचा मानस सांगितला. तसेच शिक्षणासाठी काहीही झाले तरी धर्म त्याग न करण्याचा निश्चय देखील त्यांनी सांगितला.

“हिंदू महिलांच्या उपचारासाठी एका हिंदू डॉक्टरची भारतात कशी आवश्यकता आहे हे त्यांनी या भाषणात पटवून दिलं”

या भाषणानंतर मात्र विरोध कमी झाला. कमी होणाऱ्या विरोधाबरोबरच त्यांना आर्थिक पाठबळ देखील मिळू लागले. अखेर मार्च १८८६ साली त्यांना एम. डी. हि पदवी मिळाली.

त्यांचा तेव्हाचा प्रबंध हा आज धर्माच्या नावाखाली फक्त अराजकता माजवणाऱ्या अनेक धर्मांध लोकांना शहाणपण शिकवणारा आहे. ज्या स्त्रीने धर्मांतर करण्यास विरोध केला त्याच आनंदीबाई यांनी हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र या विषयावर प्रबंध सादर केला. धर्माचा वापर किंवा अभिमान हा उद्दात हेतू साठी बाळगण्याचा त्यांनी दिलेला हा सगळ्यात मोठा कानमंत्र आजच्या युगातील धर्माचा अभिमान बाळगणाऱ्या अनेकांच्या कानपिचक्या घेणारा आहे.

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.