या मराठी नेत्याच्या सुटकेसाठी आईनस्टाईनने आपला शब्द टाकला होता

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत गाजलेल्या प्रकरणांमध्ये मीरतचा खटला जगभर गाजला होता. १९२० नंतर भारतात ब्रिटिश सत्तेविरुद्ध जागृती होऊ लागली होती आणि ह्यात आघाडीवर होते 2 प्रमुख पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया.

ह्या दोन्ही पक्षांच्या जडणघडणीत इंग्लंड विशेषतः आयरिश आणि स्कॉटिश अधिकाऱ्यांचा पुढाकार होता.

1914 पासून बसलेली महायुद्धाची झळ आणि त्यापाठोपाठ 1928 साली जगभरात आलेली मंदी ह्यामुळे देशात गरिबी वाढली आणि महाराष्ट्रातील खेडोपाड्यातून कित्येक गरीब मजूर शेतकऱ्यांनी मुंबईची वाट धरली. ब्रिटिश सत्तेने ह्या मजुरांना कधीच अभय दिले नव्हते.

त्यांना तेव्हा आधार होता तो कम्युनिस्ट चळवळीच्या नेत्यांचा !

काही स्थानिक, काही परदेशातून शिकून आलेल्या तसेच काही ब्रिटिश नागरिकांच्या मदतीने कम्युनिस्ट पक्षाने पीडित मजुरांमध्ये आपल्या हक्कांसंबंधी जागृती करण्यास सुरुवात केली. नारायण मेधाजी लोखंडे ह्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून कामगारांसाठी उभारलेल्या लढ्याची पार्श्वभूमी ह्या आंदोलनाला होती.

केवळ पोथीनिष्ठ राहता ह्या काळात भारतीय समाज त्याचे वेगळेपण समजावून घेण्याचा प्रयत्न येथील नेत्यांनी केला.

ह्यात आघाडीवर होते ते युरोपात शिकून आलेले डॉ. गंगाधर अधिकारी.

व्यवसायाने रसायनशास्त्रज्ञ असणारे अधिकारी यांनी आपल्या PhD शिक्षणासाठी १९२२ साली बर्लिन विद्यापीठ, जर्मनीसाठी प्रयाण केले. ह्यादरम्यान ते राजकारणाशी फटकून राहत. अल्बर्ट आईन्स्टाईन मॅक्स प्लांक अशा शास्त्रज्ञांच्या व्याख्यानांना ते आवर्जून हजेरी लावत.

जर्मन वास्तव्यात त्यांचा संपर्क मार्क्सवादाशी आला.

राजकारणाला हीन समजणाऱ्या अधिकारींना त्यांच्याच शब्दांतजीवनाच्या समस्यांकडे विवेकी आणि शिस्तबद्ध राजकीय दृष्टीने पाहायला शिकवणारेतत्वज्ञान भावले. आपल्यासोबत काम करणाऱ्या इतर शास्त्रज्ञांसोबत त्यांनी १९२७ साली जर्मन कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. समाजवादी विचारांच्या आईन्स्टाईन तसेच अमेरिकन लेखक एडगर स्नो ह्यांच्याशी त्यांचा जवळून परिचय झाला.

१९२८ साली ते भारतात परतले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम पूर्णवेळ करण्यास त्यांनी सुरुवात केली.

मार्क्सच्या,कम्युनिस्ट जाहीरनाम्याचेमराठीत भाषांतर करताना त्यांनी आज केंद्रस्थानी आलेल्या दलित प्रश्नांचा जातीचा विचार केला. यात भारतीय संदर्भाला अनुसरून ते लिहितात, “कामगार वर्गाच्या चळवळीला मदत करणे त्यासाठी कामगार वर्गाचा अभ्यास करणे हे इतर दलित वर्गांनाही अत्यंत आवश्यक आहे.”

इतकेच नव्हे तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वाटचालीचे त्यांनी अनेक खंडांमध्ये लेखन केले.

मंदीचे कारण देऊन जेव्हा गिरणी मालकांनी ३०% पगारकपात करण्याचा निर्णय घेतला तेव्हा श्री. डांगे, एस. व्ही. घाटे आणि इतर कम्युनिस्ट नेत्यांनी संप पुकारला. मुंबईच्या रस्त्यांवर हा संप तब्बल महिने चालू होता ज्यात २५० सभा झाल्या युनियनच्या सदस्यांची संख्या २३४ वरून तब्बल ५४,००० इतकी झाली.

ह्या संपातून कामगारांचे नेतृत्व तयार होऊ लागले होते.

ही चळवळ इतर कोणत्याही संपापेक्षा वेगळी होती. गांधी डांगे ह्यांचे मार्ग वेगळे असूनही प्रत्येक सभेची सांगतामहात्मा गांधी की जयघोषणेने होई. खुल्या मैदानात कोणत्याही हत्याराविना एक प्रचंड संघटना उभी राहिली होती. शिवाय प्रथमच कामगार चळवळ आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या राष्ट्रीय चळवळीतील अंतर मिटले होते.

वाढत चाललेली ही कम्युनिस्ट चळवळ दडपून टाकणे ब्रिटिशांना अगत्याचे वाटू लागले तेव्हा त्यांनी आपल्या जुन्याच रडीच्या डावाचा आश्रय घेतला.

मुंबईत वाढत चाललेल्या कामगार चळवळीचा उद्देश सशस्त्र क्रांती करून भारतासह इतर देशांतील सरकारे मोडकळीस आणून उलथवून टाकणे

असल्याचा आरोप करून ब्रिटिशांनी डांगे, डॉ. गंगाधर अधिकारी घाटे, शौकत उस्मानी, मोतीराम देसाई ह्यांच्यासोबत 31 जणांना 20 मार्च 1929 च्या पहाटे अटक करून मेरठ येथे हलवले. ह्यात तीन ब्रिटिश साम्यवादी कार्यकर्ते प्रसिद्ध लेखक फिलिप स्प्रेट, युनियन नेते बेंजामिन फ्रान्सिस ब्रेडले आणि लेबर पक्षाचे नेते ह्युज लेस्टर हचिंसन यांचाही समावेश होता.

स्प्रेट यांचे सोव्हिएत रशियाशी लागेबांधे असल्याची आवई ब्रिटिश सरकारने उठवली तेव्हा ह्या खटल्याला अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली.

देशोदेशींच्या वर्तमानपत्रांत हा खटला गाजला देशाचेच नव्हे जगाचे लक्ष ह्या खटल्याने वेधून घेतले. अटक केलेल्यांपैकी 27 जणांना वेगवेगळ्या काळासाठी तडीपार करण्यात आले. कॉम्रेड डांगे, स्प्रेट, घाटे, निमकर आदींना तर 12 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले.

त्यांच्यावर ब्रिटिश साम्राज्यविरुद्ध युद्ध पुकारणे ब्रिटिश भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे असे राष्ट्रद्रोहाचे खटले चालवण्यात आले. देशभरातून ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी होऊ लागली. अनेक लोकांनी संघटनांनी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले.

जर्मनीत अल्बर्ट आईन्स्टाईन ह्यांना डॉ. अधिकारींच्या अटकेची खबर कळताच त्यांनी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅक्डोनाल्ड यांना खुले पत्र लिहिले. ह्या पत्रात त्यांनी डॉ. अधिकारींच्या सुटकेची मागणी केली.

सर्व बाजूनी आलेल्या दडपणामुळे ब्रिटिश सरकारने खटल्यातील आरोपींची शिक्षा कमी केली मात्र डॉ. अधिकारी यांना 4 वर्षे तुरुंगात काढावी लागली. यानंतर त्यांनी आपले आयुष्य कामगार वर्गाच्या सेवेत खर्च केले.

एकदा तर 25 रुपये महिना इतक्या मानधनावर जगत त्यांनी मुंबईत कामगारांच्या हक्कांसाठी त्यांच्यासोबत राहून लढा दिला. ते कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय समितीचे सदस्य बनले. १९८१ साली त्यांचे निधन झाले.

अमेरिकेच्या सांताक्रूझ येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात शिकवणाऱ्या जुनेद शेख ह्यांनी डॉ. अधिकारींनी केलेल्या कामाचे महत्त्व ओळखून ह्यावर आपले संशोधन केले आहे. लवकरच ह्याच अनुषंगाने एक पुस्तक लिहिण्याचाही त्यांचा मानस आहे.
संदर्भ :  https://www.academia.edu/27714880/Translating_Marx

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.