कोणतेही आसन न वापरता बाबा रामदेवांच तोंड बंद करणारे डॉ. लेले कोण आहेत..?

तुम्ही कधी कलर्स चॅनल वरचा बिग बॉस रिऍलिटी शो पाहिला का?

नावालाच रिऍलिटी शो असला तरी त्यातला एक सीन मात्र स्क्रिप्टेड अजिबात वाटत नाही. तो म्हणजे एखाद्या एपिसोड मध्ये बिगबॉस हाऊस मधल्या एखाद्या मेंबर्सने जर काही वादग्रस्त वक्तव्य केलं तर लागलीच येणाऱ्या ‘विकएंड का वॉर’ मध्ये सलमान खान येतो अन त्या ‘स्टेटमेंट’ बद्दल सगळ्यांची शाळा घेतो…

तशीच कालपरवा आपल्या लेले सरांनी बाबा रामदेवची शाळा घेतली, असं म्हणायला हरकत नाही..

न्यूज चॅनल वरचे डिबेट काय बिगबॉस पेक्षा कमी नसतात.

लाईव्ह डिबेट मध्ये होणारी अरे -तुरे ची भाषा, शिवीगाळ ही आपल्यासाठी काय नवीन गोष्ट नाही.

पण यावेळी बाबा-रामदेव आणि अ‍ॅलोपॅथी डॉक्टर समोरासमोर होते. चर्चेचा विषय म्हणजे बाबा रामदेव यांचे ते विधान होते ज्यात त्यांनी अ‍ॅलोपॅथीच्या उपचार पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते.

गेल्या काही दिवसांपासून बाबा रामदेव आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. ‘अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे’ असे तावातावाने म्हणणाऱ्या रामदेव बाबांची मराठमोळ्या डॉ. लेले यांनी लाईव्ह शो मध्ये चांगलीच खरडपट्टी काढली.

अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांबद्दल वादग्रस्त विधान केल्या नंतर बाबा रामदेव यांनी पत्र लिहून आपले विधान मागे घेतले परंतू हा मुद्दा इथेच थांबला नव्हता तर सगळीकडेच संतापाची लाट आली. 

आणि आजतक या हिंदी न्युज वर 25 में ला लाईव्ह डिबेट आयोजित केले होते.

या लाईव्ह डिबेट मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) सरचिटणीस डॉ. जयेश लेले हेदेखील उपस्थित होते.  रामदेव आणि डॉक्टर लेले यांच्यात जोरदार वादविवाद झाले. रामदेव बाबांच्या काही बोलण्यावरून डॉ. लेले चांगलेच भडकले आणि म्हणाले,

“चुप.. चुप… चुप.. यू कीप क्वाइट… यू कीप क्वाइट” 

अ‍ॅलोपॅथीचा कसलाही अभ्यास नसतांनाही असल्या प्रकारचे आरोप कसे काय करू शकता असा प्रश्न लेले यांनी रामदेव यांना केला. 

कोण आहेत हे डॉ. लेले?

डॉ. लेले हे मूळ महाराष्ट्रातील मुंबईचे असून सध्या जनपद येथे मेडीकल प्रॅक्टीस करत आहेत. त्यांचे क्लिनिक मुंबईच्या मलाड पश्चिम भागात आहे. अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), याच संस्थेचे डॉ. जयेश लेले हे सरचिटणीस आहेत.

यापूर्वी महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. 

ते बरेच अनुभवी डॉक्टर आहेत.  1979 पासून ते वैद्यकीय सेवेत आहेत. त्यांच्या लिंक्डइन वरून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी मुंबईतील मिठीबाई कॉलेजमधून डॉक्टरेट केली.  ते जनरल मेडिसिन और पीडियाट्रिक्स डॉक्टर आहेत. म्हणजे प्रौढ लोकांच्या उपचाराबरोबरच ते मुलांच्या आजारांवरही उपचार करतात. त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे

या डिबेट मुळे चर्चेत आलेल्या डॉ. लेले यांचा डिबेटचा हा विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, कुणी त्यांना समर्थन देतंय तर कुणी ट्रोल करत आहे.

2015 मध्ये त्यांना आयएमए कडून ‘इंडिविजुअल कम्यूनिटी सर्विस पुरस्कार’ पुरस्कार देण्यात आला. तसेच त्यांना प्रोफेसर श्रीधर शर्मा ओरेशन अवॉर्डही देण्यात आला आहे. 

डॉ. लेले हे वेळोवेळी डॉक्टरांच्या समर्थनार्थ आवाज उठवतात. होमिओपॅथीच्या डॉक्टरांना शॉर्ट-टर्म कोर्स घेवून अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास परवानगी दिली जाणाऱ्या या महाराष्ट्र सरकारच्या आदेशाचा देखील त्यांनी विरोध केला होता.

याशिवाय डॉक्टरांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याबद्दल त्यांनी आवाज उठवला होता.

त्यांनी 2019 मध्ये सांगितले होते की, देशभरातील 30-40 टक्के डॉक्टर असे आहेत ज्यांना नक्कीच कधीकधी या हिंसाचाराचा सामना केला आहे. हा ट्रेंड केवळ जगभरात नसून  भारतात आहे आणि तेही वाढत च आहे.

तसं तर डॉ. लेले डॉक्टरांशी संबंधित बातम्यांविषयी अनेकदा चर्चेत असतात. पण लाईव्ह डिबेट मध्ये त्यांना इतक्या रागाने बोलताना पहिल्यांदाच पाहिल्यानंतर ते सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत. बरीच लोकं त्यांचं कौतुकही करत आहेत तर काही त्यांना राग नियंत्रणात ठेवून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची सल्लेही देत आहेत.

इतक्या सगळ्या घडामोडीनन्तर आज इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे डॉ.लेलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पतंजलीचे मालक रामदेव यांच्या लसीकरणावर चुकीची माहिती देण्यावर बंदी घातली पाहिजे हि मागणी केली. त्यांनी केलेल्या २५ प्रश्नांना उत्तर देताना डॉ.लेलेंनी यापूर्वी देखील बाबा रामदेव अवैध औषधांची विक्री व्हावी यासाठी अ‍ॅलोपॅथीबद्दल सतत भ्रम पसरवत आहेत याचा उल्लेख पत्रामध्ये केला आहे.

इतकेच नाही तर आज सकाळीच इंडियन मेडिकल असोशिएशनच्या उत्तराखंड विभागाने रामदेव बाबांवर १००० कोटींचा मानहानीचा दावा देखील ठोकला आहे. एकूणच डॉ.लेलेंनी बाबा रामदेव यांचं प्रकरण सिरीयस घेतले आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.