तुम्हाला जर रात्री झोपेत वाईट स्वप्न पडत असतील, तर होऊ शकतो हा भयानक आजार.

खूप वेळेस रात्री झोपेत असताना एखाद वाईट स्वप्न पडते आणि आपली झोपमोड होते. तसेच काही लोकांना झोपेत बडबडायची सवय असते. झोपेशी संबंधित या समस्यांमुळे किंवा सवयीनमुळे पोस्ट ट्रामेटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) नावाचा भयानक आजार होऊ शकतो.

मनो-विश्लेषकच्या मते ज्या व्यक्तीला हा आजार झाला आहे ती व्यक्ती चिडचिडी आणि लहान लहान गोष्टींमुळे खूप संतापते. राग राग करायला लागते. या आजारामुळे भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींची प्रतिक्रिया ती व्यक्ती वर्तमानात करते. 

पीटीएसडी आजाराची लक्षणे.

  • झोपेत असताना सारखी जाग येणे.
  • वाईट स्वप्न बघणे.
  • सारखे एकाच घटनेशी संबंधित स्वप्न पडणे.
  • काहीतरी आठवणे आणि नंतर ते विसरणे.
  • स्मरण आणि विस्मरणावर परिणाम.
  • कोणत्याही कामात लक्षकेंद्रित न होणे.
  • काही कारण नसताना बॉडी पेन होणे.
  • सारखी चिंता वाटत राहते.
  • घटनांशी संबंधित असणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते.

ज्यांना हा आजार झालेला असतो ते रुग्ण प्रत्येक गोष्टीची अति सावधानता बाळगतात, कारण नसताना अचानक खूप चिडतात आणि खूप वेळेस हिंसक हि होतात. या आजारामुळे पीडित असणाऱ्या रुग्णांना अचानक खूप भीती वाटायला लागते. सार्वजनिक ठिकाणी फिरायचे टाळले जाते. कोणाशी बोलायचं म्हटल्यानंतर खूप लाज आणि शरम वाटत असते. अशी रुग्ण काही गोष्टींना घेऊन खूप भावुक होतात.

काय उपचार आहेत या आजारावर? 

माणूस आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सगळ्यांशी शेर करतोच असे नाही. खूप साऱ्या गोष्टी तो आपल्या सुप्त मनात ठेवतो.

पीटीएसडी हा मानवी मनाशी आणि विचारांशी संबंधित आजार आहे ?

आपण काय विचार करतो, कोणत्या गोष्टीना महत्व देतो. त्याच गोष्टी आपण झोपल्यानंतर आपल्या स्वप्नात येतात. आणि त्याच्यावर उपचार म्हणून मनोविश्लेषक सल्ला देऊन हा आजार कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टी करायला देऊन त्यांच्या विचारात सुधारणा आणला जातो.

रुग्णाची मनोवस्था लवकर चांगली करण्यासाठी ‘मूड एलिवेटर’ थेरपी वापरली जाते. या थेरपी मध्ये रुग्णाला हिप्नोटाईस करून त्याला होत असलेल्या समस्या जाणून घेतल्या जातात. आणि त्याच्यावर उपचार केला जातो. मनोविश्लेषकांच्या मते रुग्णांना त्यांच्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी हि थेरपी खूप गुणकारी ठरते.

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.