दाऊद आणि राजनला उडवण्याचा प्लॅन एजाज लकडावालाने आखला होता….

मुंबई अंडरवर्ल्ड म्हणजे कोण कोणाचं जवळचं नसतं. जवळचे सुद्धा तुमच्या बत्त्या लावून गायब होतात आणि ऐरनि अशी असते की ज्यांना मोठं केलं तेच असा काही गुलीगत धोका देतात की इतिहासात त्याची नोंद केली जाते. तर किस्सा असा होता की एकेकाळी दाऊद आणि नंतरच्या काळात छोटा राजनच्या टोळीत राहणाऱ्या एजाज लकडावालाने आपल्या दोन्ही बॉसला अंडरवर्ल्ड मधून कायमचं गायब करण्याचा धाडसी प्लॅन आखला होता.

गेल्या वर्षी ९ जानेवारीला पाटणा येथून गँगस्टर एजाज लकडावाला पकडला गेला होता. दरभंगाला जात असताना मुंबई पोलिसांनी पाटणा पोलिसांच्या मदतीने त्याला पकडले. पकडल्यापासून एजाज मुंबई पोलिसांच्या ताब्यात असला तरी तो कायम नवनवीन ज्या कोणालाच माहिती नाही असे खुलासे करायचा.

आता हा एजाज लकडावाला कोण होता तर एजाजने चौकशीदरम्यान सांगितले की, 1998 मध्ये तो छोटा राजनचा उजवा हात विक्की मल्होत्राच्या 10 जणांच्या टीमचा भाग होता. या टीममध्ये फरीद तनाशा, बाळू डोकरे, विनोद मतकर, संजय घाटे आणि बाबा रेड्डी यांचा समावेश होता. याच एजाजने मोठा प्लॅन आखला होता. दाऊदला मारण्यासाठी ही टीम कराचीतील एका दर्ग्याच्या बाहेर अनेक दिवस थांबली होती.

दाऊदची मुलगी मारिया हिच्या मृत्यूनंतर छोटा राजनने दाऊदला कायमचं संपवण्याची योजना तयार केली. यासाठी विकी मल्होत्राच्या नेतृत्वाखाली नेमबाजांची टीम कराचीतील त्या दर्ग्याबाहेर दाऊदची वाट पाहत होती. येथे दाऊद आपल्या मुलीच्या कबरीला भेट देणार होता.

लकडावाला याच्या म्हणण्यानुसार, मिर्झा दिलशाद बेगने शेवटच्या क्षणी ही माहिती दाऊदला दिली आणि ही योजना फसली. मिर्झा हा नेपाळचा संसद सदस्य आणि दाऊदचा जवळचा सहकारी होता. यामुळे छोटा राजन इतका चिडला की त्याच वर्षी मिर्झा मारला गेला.

एकेकाळी दाऊदच्या टोळीचा सदस्य असलेला एजाज नंतर छोटा राजनच्या टोळीत सामील झाला. नंतर पैसे वाटपावरून छोटा राजनशी मतभेद झाल्यानंतर त्याने स्वत:ची टोळी तयार केली आणि तो नेदरलँडमध्ये राहून अंमली पदार्थांच्या तस्करीचा व्यवसाय चालवत होता. राजनला सुद्धा उडवण्याचा त्याचा प्लॅन होता. दाऊदची थायलंड आणि बांगलादेशमध्येही चांगली पकड असल्याचे लकडावाला यानी मुंबई पोलिसांना सांगितले होते. या दोन देशांतून तो भारत, युरोप आणि इतर देशांमध्ये ड्रग्ज पाठवायचा.

एजाजने मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानातील कराची येथील दोन घरांचा पत्ताही दिला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, दाऊदच्या एका घराचा पत्ता 6A, खयाबान तंजीम फेज-5, डिफेन्स हाऊसिंग एरिया, कराची आणि दुसऱ्या घराचा पत्ता डी-13, ब्लॉक-4, क्लिफ्टन, कराची असा आहे.  दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम आणि त्याचा खास छोटा शकील हे देखील डिफेन्स हाऊसिंग परिसरात राहतात.

2002 मध्ये बँकॉकच्या व्यस्त बाजारपेठेत लकडावाला यांच्यावर हल्ला झाला होता. त्याने दावा केला की एका ताबीजने त्याला मरण्यापासून वाचवले होते. छोटा शकीलच्या शूटरने त्याच्या छातीवर सहा गोळ्या झाडल्या. गोळ्या त्याच्या अंगाजवळून गेल्या होत्या. एक ताबीजात गुंतली होती.

पण या एजाज लकडावालाचा खेळ संपलेला आहे आणि त्याला मुंबई पोलिसांनी पकडलेलं आहे. पण हा लकडावाला इतका धाडसी होता की राजन आणि दाऊदला संपवण्याचा त्याचा विचार होता.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.