लहान मुलांच मार्केट इतकं मोठ्ठ आहे की “First Cry” ही कंपनी ७ हजार कोटींची झालेय..

घरात बाळ येणार म्हटल्यावर कुटुंबातील सर्व सदस्य तयारीला लागलेला असतात. बाळासाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी कपडे, इतर वस्तूंसाठी लगबग सुरु असते. मात्र, या वस्तू एकत्र कुठेही मिळत मिळत नाहीत.  कपड्यांसाठी वेगळे दुकान, औषधांसाठी वेगळे दुकान असं सगळं फिरावं लागत. 

पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीने मात्र लहान बाळ, मुलांना आणि त्यांच्या आईना लागणाऱ्या सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत.

तिचे नाव फर्स्ट क्राय आहे. 

लहान बाळांसाठीच वस्तू विकणारी आशिया खंडातील सर्वात मोठी कंपनी म्हणून फर्स्ट क्राय ओळखली जाते.  

फर्स्ट क्राय एक ऑनलाईन-ऑफलाईन ब्रँड आहे जे लहान बाळ, मुले आणि आईसाठीचे प्रोडक्ट विकते. हा स्टार्टअप लाखो पालकांना त्यांच्या बाळासाठी चांगल्या क्वालिटीचे बेबी केअर प्रोडक्ट मिळवून देण्यासाठी सुरु करण्यात आला आहे. 

जवळपास १ हजार २०० आंतरराष्ट्रीय आणि भारतीय ब्रॅण्डच्या ९० हजार पेक्षा जास्त वस्तू फर्स्ट क्रायच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोर मध्ये मिळतात. या सगळ्या वस्तू लहान बाळ, मुलं आणि त्यांच्या आईशी निगडित आहेत.यात डायपर, नर्सिंग, स्किन, हेल्थ केअर, कपडे, खेळणी, फुटवेअर सारखे प्रोडक्ट उपलब्ध करून देतात.   

लहान बाळांसाठी चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट उपलब्ध करून देणारा एकही प्लँटफॉर्म  भारतात नव्हता .    

सूपम माहेश्वरी यांचे शिक्षण आयआयएम अहमदाबाद आणि दिल्ली येथील कॉलेजे मधून इंजिनीरिंग झाले आहे. सूपम हे त्यांच्या घरातली पहिले उद्योजक आहेत. तर शहा यांचे यांचे आयआयएम लखनऊ येथून पोस्ट ग्रॅज्युयेशन झाले आहे

फर्स्ट क्राय सुरु करण्यापूर्वी सूपम आणि अमिताव यांनी भारतातील सगळ्यात मोठ्या लॉजिस्टिक कंपन्यांपैकी एक असणारी एक्सप्रेसबीस या कंपनीची स्थापना केली आहे. या दोन्ही कंपन्या स्थापन होण्यापूर्वी सूपम हे ब्रेनव्हिसा टेक्नॉलॉजी या कंपनीचे सीइओ आणि सह संस्थापक होते.  

बिझनेस मिटिंग साठी सूपम माहेश्वरी नेहमी परदेशात जात. येतांना ते आपल्या बाळांसाठी एकाच दुकानातून वेगेवेगळ्या वस्तू खरेदी करत. त्यावेळी भारतात लहान बाळांसाठी चांगल्या ब्रँडेड वस्तू ऑनलाईन मिळत नव्हत्या. त्यामुळे लहान बाळ, मुलांच्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळू शकतील असं काही सुरु करता येईल का असा विचार त्यांच्या डोक्यात आला. 

भारतीय पालकांना आपल्या मुलांसाठी जगभरातील सर्वोत्तम बेबी केअर ब्रँड उपलब्ध होतील यासाठी फर्स्ट क्रायची स्थापना २०१० मध्ये करण्यात आली.   

सुवातील फर्स्ट क्राय कंपनीने प्रयोगिक तत्वावर पुणे, दिल्ली, बंगलोर आणि कोलकत्ता येथील वेअर हाऊस मधून प्रोडक्टस देशभरात पाठवत होते. काही वर्षांनंतर त्यांनी किरकोळ विक्रेत्यांना आपल्या प्लॅटफॉर्मशी जोडून घेतले. फर्स्ट क्रायच्या वेबसाईटच्या मदतीने हे किरकोळ विक्रेते आपल्या वस्तू देशभर विकू शकत होत्या

कंपनीचे बेबीह्ग नावाने लहान मुलाचे ड्रेस आणि फुटवेअर बनविते. 

लहान मुलांची देखभाल आणि त्यांच्याशी निगडित असणाऱ्या वस्तू ऑनलाईन खरेदीचा ऑप्शन दिला. फर्स्ट क्राय आशियाचा सगळ्यात मोठा ऑनलाईन बेबी अँड किड्स स्टोर ब्रँड बनली आहे. अमिताभ बच्चन फर्स्ट क्रायचे ब्रँड अँबेसिटर आहेत.  देशभरातील १२५ शहर मध्ये ३५० फ्रँचायजी आउटलेट आहेत.

फर्स्ट क्राय गिफ्ट बॉक्स

शिशु पासून ते ९ वर्षानंतर मुलं हे फर्स्ट क्रायचे टार्गेट आहे. देशातील ८ हजार पेक्षा जास्त हॉस्पिटल सोबत फर्स्ट क्रायने करार केला आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्यांच्या आईसाठी फर्स्ट क्राय गिफ्ट बॉक्स पाठविण्यात येतो. त्यात डायपर,साबण, लोशन, ऑइल हे असतं. पुढचे १५ ते २० दिवस त्या बाळाला पुरेल एवढं त्यात असतं. वर्षाला ७० हजार पालकांपर्यत गिफ्ट बॉक्सच्या माध्यमातून फर्स्ट क्राय पोहचत असते.

पहिल्यांदा ही ईकॉमर्स कंपनी म्हणून उभी राहिली. त्यानंतर ऑफलाईन मार्केट मध्ये उतरले. 

फर्स्ट क्राय कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे. तसेच ही कंपनी २०२० मध्ये युनिकॉर्न स्टार्टअप मध्ये सामील झाली होती. कंपनीत आता पर्यंत ५८२ मिलियनची गुंतवणूक करण्यात आली आहे. कंपनीची व्हॅल्यूवेशन १.२ बिलियन डॉलर  झाली आहे.  

२०१६ मध्ये फर्स्ट क्राय ने महिंद्रा ग्रुपच्या मालकीची बेबी ओय ही कंपनी ३६२ कोटी रुपयांना विकत घेतली.  फर्स्ट क्राय महिंद्रा व्हेंचर या नावाने व्यवसाय करते. कंपनीने ओय प्लेस्कुल ही कंपनी ताब्यात घेतली.

कंपनीचा दावा आहे की, 

फर्स्ट क्राय कंपनी आपल्या ग्राहकांना कमी किंमतीत चांगल्या ब्रँडच्या वस्तू उपलब्ध करून देते.  

हे ही वाच भिडू     

Leave A Reply

Your email address will not be published.