खलीच्याही आधी wwe मध्ये गामा सिंगने भले भले पहिलवान रिंगमध्ये उचलून आपटले होते….

अक्षय कुमारचा खिलाडी सिरीजमधल्या एका सिनेमात अंडरटेकर बरोबर एक फाईट सीन होता बघा आणि विशेष म्हणजे अक्षय कुमार त्या अंडरटेकरला हरवतो असा तो सीन होता, डोळ्यावर विश्वास बसत नाही पण होता भिडू असा सीन बॉलिवुड म्हणल्यावर सगळं शक्य असतंय. ती बहुतेक wwe ची भारतातली पहिली एन्ट्री असावी असं वाटत असेल तर थांबा पब्लिक कारण आपल्याकडं सुद्धा बरेच रांगडे रेसलर होऊन गेले ज्यांनी wwe चं मैदान गाजवलं तर होतंच शिवाय परदेशात जाऊन आपल्या भारतभूमीचा झेंडा उंचावला होता. Wwe मध्ये बोटावर मोजण्याइतके जरी आपले खेळाडू असले तरी त्या बोटांवर मोजण्याइतक्या खेळाडूंपैकी सगळ्यात आधी wwe च्या रिंगमध्ये कुठला भारतीय गेला असेल ?

आपल्या माहिती असलेले wwe मधले खेळाडू म्हणजे कोण तर द ग्रेट खली ( दलिप सिंग राणा ) आणि त्यानंतर जिंदर महाल जो सध्या फुल्ल फॉर्ममध्ये आहे आणि तो वर्ल्ड चॅम्पियनसुद्धा झालेला आहे. या दोन खेळाडूंनंतर जास्त कोणी आपल्याला माहिती नाही. जो जिंदर महाल आहे ना त्याच्या नातलग आजोबांनी भारताला पहिल्यांदा wwe चं दार दाखवलं. या रिंगमध्ये भल्या भल्या पहिलवान लोकांना जिंदर महालच्या आजोबांनी आपटलेलं होतं. तर जाणून घेऊया भारताच्या पहिल्या wwe रेसलरबद्दल.

8 डिसेंबर 1954 रोजी पंजाबमध्ये जन्म झाला गदोवार सिंग सहोटा यांचा. पंजाबात शिक्षण वैगरे पूर्ण झालं पण पंजाबी लोकांच्या रिच्युअल्स प्रमाणे गदोवार सिंग हे काय पंजाबमध्ये थांबले नाहीत. मिनी पंजाब असलेल्या कॅनडा मध्ये जाऊन ते स्थायिक झाले. इंडियन कॅनेडियन सेमी रेसलर अशी गदोवार सिंग यांची ओळख होती. Wwe मध्ये गेल्यावर गामा सिंग आणि ग्रेट गामा अशा दोन नावांनी ते प्रसिद्ध झाले. Wwe च्या रिंगमध्ये गामा सिंग यांनी नव्या प्रकारे आणि देशी पद्धतीचे डाव टाकून इतर रेसलर लोकांना जेरीस आणलेलं होतं.

गदोवार सिंग सहोटा हे wwe रिंगमध्ये देशी तडका लावायचे आणि विरोधी खेळाडूंची पळता भुई थोडी व्हायची. कारण त्यांचे पहिलवानी डाव लवकर कोणाला कळून यायचे नाही. रिंगमध्ये येताना एकदम खलनायक सारखी टॉपची त्यांची एन्ट्री असायची. 1970-80 च्या दशकात स्टू हार्टस स्टॅम्पएड रेसलींग स्पर्धेत इतकी भयानक दहशत गामा सिंग यांनी निर्माण केली होती की एकही रेसलर त्यांच्या विरुद्ध फाईट करण्याकरिता रेसीलिंग मध्ये उतरला नव्हता.

सहोटा यांनी केवळ wwe चं नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जपान, कुवेत, साऊथ आफ्रिका, जर्मनी, दुबई, ओमान, ऑस्ट्रेलिया, द युनायटेड स्टेट्स आणि कॅरेबियन अशा अनेक देशांमध्ये स्पर्धा गाजवल्या होत्या. 1980-1986 या काळात विन्स मॅकमोहन आणि वर्ल्ड रेसलर फेडरेशन बरोबर दीर्घकाळ काम केलं.

Wwe मध्ये हवा करणारा गामा सिंग हा भारतातला पहिला वहिला रेसलर होता. त्यानंतर तिथे खली गेला आणि आता गामा सिंगचाच नातलग जिंदर महाल wwe मध्ये राज्य करतोय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.