मरण जेव्हा डोळ्यासमोर आलं तेव्हा गुरदास मानने आपल्या संगीताने भारत हादरवून टाकला….

पंजाबी गाणी हा हळूहळू भारतीय लोकांच्या मूलभूत गरजांचा एक भाग बनत चाललेला आहे. फुल्ल एकदम नाचो सॉंग आणि मागे पंजाबी ढोलचा रिदम की माणूस लगेच नाचायला लागतो. दलेर मेहंदी, मिका भाऊ, यो यो हनी सिंग ही सगळी गँग पंजाबी संगीत बॉलिवुडमध्ये रुजवण्यात महत्वाची मानली जातात. पण याहून डेंजर एक गायक आहे आणि पंजाबी गाण्यांचा बादशहा म्हणून त्या गायकाला ओळखलं जातं त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया.

गुरदास मान या प्रसिद्ध गायकाचा जन्म 4 जानेवारी 1957 रोजी पंजाबमधील गिद्दरबाहा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव बीबी तेज कौर आणि वडिलांचे नाव सरदार गुरुदेव सिंग मान होते. त्यांच्या पत्नीचे नाव मनजीत कौर आणि मुलगा गुरिक आहे. मलोत येथे शिक्षण सुरू झाले आणि नंतर ते पटियाला येथे आले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, पटियाला येथून पदवी प्राप्त केली. अनेक ऍथलेटिक स्पर्धांमध्ये आणि राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्तरापर्यंत पदके जिंकली.

गुरदास मान 1980 मध्ये त्यांच्या ‘दिल दा मामला है’ या गाण्याने जगभरात प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ही अशी घटना घडली की ज्याने पंजाबी संगीतात मोठी क्रांती घडवून आणली.

9 जानेवारी 2001 रोजी रोपरजवळ झालेल्या भीषण अपघातात मान थोडक्यात बचावले, परंतु त्यांचा चालक तेजपाल या अपघातात मरण पावला. गुरदास मान यांचा तो फक्त ड्रायव्हर नव्हता तर तो ओरीजनल मित्र म्हणून ओळखला जायचा. तेजपाल या अपघातात गेला याचा गुरदास मान याना मोठा धक्का बसला, त्यांनी त्याला समर्पित गाणे देखील लिहिले आणि गायले. हे गाणे होते

‘बैठी साडे नाल सवारी उतर गई…’.

गुरदास मान हे मार्शल आर्ट्सचेदेखील तज्ञ आहेत. त्यांनी ज्युडोमध्येही ब्लॅक बेल्ट जिंकला आहे. गुरदास मान यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. गुरदास मान हे पहिले कलाकार होते ज्यांनी 1980 आणि 1990 च्या दशकात त्यांच्या गाण्यांद्वारे आणि नंतर त्यांच्या चित्रपटांद्वारे पंजाबमधील पोलिस अत्याचारांवर प्रकाश टाकला. आपल्या महाविद्यालयीन जीवनात, मान यांनी विविध विद्यापीठांनी आयोजित केलेल्या युवा मेळ्यांमध्ये भाग घेतला आणि अनेक पुरस्कार जिंकले.

कॉलेजच्या दिवसांमध्ये मान यांनी पंजाब इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या एका कार्यक्रमात सजना वे सजना या गाण्यावर सादरीकरण केले. त्यामुळे बोर्डाचे अधिकारी इतके खूश झाले की, मान यांना त्याचवेळी विभागात नोकरीही देण्यात आली. गुरदास मान यांनी आतापर्यंत सुमारे 35 अल्बम रिलीज केले आहेत आणि 300 हून अधिक गाणी लिहिली आहेत. मानच्या अपना पंजाब या गाण्याला 1998 मध्ये बमरीघिममध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कारही मिळाला होता.

‘देस होया परदेस’ (2004) या चित्रपटासाठी गुरदास मान यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. लोक गुरदास मान यांच्यावर इतके प्रेम करतात की एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर हजाराच्या नोटा उडवण्यात आल्या होत्या. परफॉर्मन्स संपल्यानंतर, मान यांनी सर्व पैसे जमा केले आणि ते एका वेगळ्या दिव्यांग जोडप्याला देण्याची घोषणा केली. त्यांचा हा कलाकारी आणि सामाजिक भान जपणारा जिवंतपणा पाहून सर्वांनी त्यांचे खूप कौतुक केले होते.

2011 मध्ये चंदीगडमध्ये गुरदास मान यांची पत्रकार परिषद झाली होती. ते बाहेर आले असता त्यांना घाणेरडे कपडे घातलेला एक तरुण दिसला. तो तरुण गुरदास मान यांना भेटायला आला होता आणि सगळ्यांची ओळख करून देण्याची विनंती करत होता. हा प्रकार कळताच त्यांनी मुलाला बोलावून घेतले. त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून लिफ्ट मागून पायीच त्याला भेटायला गेले. हे ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि त्याने त्या तरुणाला मिठी मारली आणि त्याच्या पायालाही स्पर्श केला.

सप्टेंबर 2010 मध्ये ब्रिटनच्या वोल्व्हरहॅम्टन विद्यापीठाने गुरुदास मान यांना जागतिक संगीतात डॉक्टरेट देऊन सन्मानित केले. त्यांच्यासोबत सर पॉल, मॅककार्टनी, बिल कॉस्बी आणि बॉब डिलन यांनाही या सन्मानाने गौरविण्यात आले. 14 डिसेंबर 2012 रोजी, राज्यपालांनी त्यांना पंजाबी विद्यापीठ, पटियालाच्या 36 व्या दीक्षांत समारंभात डॉक्टर ऑफ लिटरेचरची मानद पदवी देऊन सन्मानित केले होते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.