कुलभूषण जाधवांसाठी धावून जाणारे हरिष साळवे याकुब मेमनच्या बाजूने देखील लढले होते. 

कुलभूषण जाधव यांना सोडवण्यासाठी आतंराष्ट्रीय न्यायालयात हरिष साळवे यांनी भारताची बाजू मांडली. विशेष म्हणजे फक्त एक रुपया घेवून त्यांनी हि बाजू मांडली. भारत सरकारने देखील अॅटोर्नी जनरल मुकूल रोहतगी यांच्याहून अधिक विश्वास हरिष साळवे यांच्यावर टाकला.

हरिष साळवेंनी खरच या केससाठी एक रुपया घेतला का? 

तर, हो ! 

हरिष साळवेंनी फी म्हणून फक्त एक रुपया घेतल्याचं खुद्द माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज्य यांनी ट्विट करुन सांगितलं होतं. नक्कीच हि गोष्ट कौतुकास पात्र आहे. कारण हरिष साळवे हे भारतातील सर्वात महाग वकिलांपैकी एक म्हणून ओळखले जातात.

हरिष साळवे यांच्या फी चा आकडा सांगायचा झाला तर तो दिवसाला ३० ते ६० लाख असा आहे. अंबानी भावांमधला वाद, टाटा-सायरस मिस्त्री, नीरा राडिया टेप-टाटा,डायची विरुद्ध रॅनबॅक्सी कंपनी, प्रशांत भूषण विरुद्ध जिओ अशा महत्वाच्या केस त्यांनी यशस्वीपणे हाताळल्या आहेत. त्यावरून त्यांच महत्व लक्षात येईल. 

पहिला मुद्दा हरिष साळवे कोण आहेत ? 

हरिष साळवे मुंबईचे. हरिष साळवे यांचे वडिल नरेंद्र साळवे हे त्यांचे वडिल. क्रिकेटच्या जाणकारांना त्यांच नाव चांगलच माहिती असेल. नरेंद्र साळवे हे क्रिकेटमध्ये अॅडमिस्टेटरच्या रोल मध्ये होते. त्यांना NKP नावाने ओळखलं जातं. १९७८ ते २००२ या दरम्यान ते चार वेळा राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्या प्रयत्नामुळेच भारतीय द्विपकल्पात पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं होतं. हरिष साळवे हे NKP यांचे चिरंजीव. त्यांनी कॉमर्स आणि लॉ अशा दोन्ही विषयातून पदवीच शिक्षण घेतलं. हरिष साळवे पहिल्यांदा CA झाले व त्यानंतर ते वकिलीच्या क्षेत्रात आले. 

हरिष साळवे हे ९९ ते २००२ च्या काळात भारताचे सॉलिसिटर जनरल होते. अॅटोर्नी जनरल नंतर हे दूसऱ्या क्रमांकाचे पद असते. थोडक्यात भारताची बाजू न्यायालयात मांडणारे वकिल म्हणून या पदाची जबाबदारी असते. हरिष साळवे संविधानिक बाजू, टॅक्स सिस्टीम, कमर्शियल केसेस या मधले तज्ञ म्हणून ओळखले जातात. 

नाना पालखीवाला हे भारतातल्या सर्वात मोठ्या नावाजलेल्या वकिलांपैकी एक. आपल्या वकिलीच करियर त्यांनी दादाचंदानी एन्ड कंपनीत इंन्टर्न म्हणून सुरू केलं होतं. त्यावेळी नाना पालखीवाल यांना ते अस्टिट करत होते.

याच दरम्यान कायद्यामध्ये, भारताच्या राजकारणात महत्वाची ठरलेली मिर्नवा मिल्स विरुद्ध भारत सरकार अशी केस चालू होती. या केसमध्ये नाना पालखीवाला यांना हरिष साळवे यांनी असिस्ट केलं होतं. याच केसमध्ये संविधानाची मुलभूत चौकट सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली होती. या केसमध्ये संसदेहून संविधान सर्वश्रेष्ठ असल्याचा निकाल देण्यात आला होता. 

या केसनंतर हरिष साळवे दिल्ली हायकोर्टमध्ये सिनियर काऊंसल झाले. माजी अॅटोर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबत देखील त्यांनी काम केलं. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून ते ९९ ते २००२ च्या दरम्यान काम पाहू लागले. 

दरम्यान हरिष साळवे इतके महाग वकिल कसे झाले याचा किस्सा सांगितला जातो तो अनिल अंबानी विरुद्ध मुकेश अंबानी केसमध्ये.

या केसमध्ये ते अनिल अंबानी यांच्या बाजूने केस लढवत होते. अनिल अंबानींची बाजू ते कोर्टात सक्षमपणे मांडू शकले होते. त्यामुळे केसचा निकाल त्यांच्या बाजूने लागला. त्यानंतर मात्र त्यांची फि मोठ्या प्रमाणात वाढली. अस सांगितल जातं की, तामिळनाडू सरकार विरुद्घ केंद्र शासन या केसमध्ये त्यांनी ६० कोटी रुपये फि घेतली होती.  या नंतरच सालवेंच वजन वाढत गेलं. २०१७ च्या फोर्ब्स च्या जगातील ५० प्रभावशाली व्यक्तिंमध्ये त्यांचा समावेश झाला. 

टाटा आणि अंबानी या भारतातील मात्तबर उद्योगपतींनी त्यांनाच केसेस दिल्या.

निरा राडिया टेप प्रकरणात रतन टाटांनी कोर्टात बाजू मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती तर अनिल अंबानी यांनी मुकेश अंबानी यांच्यासोबतचा वाद कोर्टात पोहचल्यानंतर अनिल साळवे यांच्याकडे जबाबदारी दिली होती. मायावतींपासून ते मुलायमसिंह यादव, पंजाबचे बादल घराणे, ललित मोदी यांच्या बाजूने कोर्टात तेच उभा राहिले होते. 

पण या सर्व केससोबत त्यांना ओळखल जातं ते याकुब मेमन यांची फासी रद्द करण्यासाठी मेमनच्या बाजूने सुप्रिम कोर्टात बाजू मांडल्याबद्दल.

टाडा न्यायालयाने याकुब मेमन ला फासीची शिक्षा दिली होती. तेव्हा २००७ साली पहिल्यांदा ते सुप्रीम कोर्टात याकुब मेमनच्या फाशीच्या शिक्षेविरोधात कोर्टात बाजू मांडण्यासाठी उभा राहिले होते. त्यांच्या मते तेव्हा ते स्क्रिझोफेनियाने त्रस्त होते. या आजारात माणसाला भूतकाळाबद्दल काहीच आठवत नाही. त्यामुळे फासी रद्द केली जावू शकत होती. एक जेन्यूअन केस म्हणून मी त्यांच्या सोबत उभा राहिलो होतो. ते म्हणतात,

‘The Supreme Court is final not because it is right, but it is right because it is final.’

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.