श्रीमंत राजा सोन्याने मढवलेल्या कार आणि विमानातून फिरतो, तेरा लाखाची कटिंग करतो…

तसं बघितलं तर श्रीमंती मोजण्याचा काही मापदंड नसतो पण सामान्य लोकांसाठी त्याच्यापेक्षा जास्त संपन्न असलेली व्यक्ती ही श्रीमंत असते. पण खरं तर श्रीमंती म्हणजे काय याचा अर्थ आजच्या जगात पैसा. इतका पैसा दोन्ही हातांनी खर्च केला तरीही कमी पडेल असे फार कमी लोक असतात वारेमाप पैसा उधळतात अशा लोकांमध्ये एक नाव येतं ते म्हणजे हसनल बोलकीयाचं. काही दिवसांपूर्वी आशिया खंडातील एक छोटासा देश असलेल्या ब्रूनेई मध्ये एक लग्न सोहळा राजेशाही थाटात संपन्न झाला. या लग्नाच आयोजन तब्बल सात दिवस होतं आणि एकदम भव्य दिव्य कार्यक्रम. हे लग्न जगातल्या सगळ्यात जास्त चर्चिला गेलेल्या लग्नापैकी, शाही लग्नाला पैकी एक मानलं गेलं हे लग्न होतं हसनल बोलकियाची मुलगी राजकुमारी फादजीला लुबाबुल बोलकिया हीचं.

आता तुम्ही म्हणाल हा हसनल बोलकिया कोण आहे ?

हसनल बोलकीय बोर्निया द्वीपावर असलेल्या ब्रूनेई या प्रांताचा शासक आहे. त्याची श्रीमंती एक माईलस्टोन ठरलेली आहे. त्याच्याकडे असलेला सोन्याचा महाल, सोन्याची कार आणि सोन्याच विमान सुद्धा आहे. गाड्यांच्या कलेक्शन ची गोष्ट केली तर त्याच्याकडे 7000 आलिशान कार गाड्या आहेत. हे तर काहीच नाही सुलतान ज्या महालात राहतो त्या महालाला जवळपास 1788 रुम्स आहेत. एकूणच रिपोर्टच्या अनुसार सुलतान हसनल बोलकीया आज घडीला 20 अरब डॉलर यापेक्षाही जास्त संपत्तीचा मालक आहे.
75 वर्षीय हस्नल बोलकिया ब्रूनेईचा आज घडीचा शासक असून तो इथला पंतप्रधान सुद्धा आहे. असं म्हटलं जातं की सुलतानला सोन्या प्रति एक आगळी वेगळी ओढ आहे. त्याचमुळे त्याचे सिंहासन, कार, महाल इतर सगळं सोन्याने झाकलेल आहे.

ब्रूनेईच्या सिंहासनावर 50 वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य करणारे बोलकीया जगातले दुसरे सगळ्यात जास्त श्रीमंत सम्राट आहेत. 1980 पर्यंत हस्नल बोलकीया जगातले सगळ्यात जास्त श्रीमंत शासक होते. ब्रुनेईच्या राजगादीवर तब्बल सहाशे वर्षांपेक्षा जास्त काळ बोलकिया परिवार विराजमान आहे. त्यामुळे सध्याच्या काळातील शासक बोलकी या यांनी 21 वर्ष वय असताना 1967 साली ब्रुनेईचा राज्यकारभार हातात घेतला.

राजाच्या कटिंगचा खर्च 13 लाख रुपये आहे..

आता एवढी श्रीमंती असल्यावर राहणार रॉयल कारभार असल्यासारख आलच. आता श्रीमंतीचे जलवे पाहायला गेलं तर राजाच्या कटिंग चा खर्च हा जवळपास 13 लाख रुपये येतो. ( आपल्या इथं तरी अजून शंभर रुपये आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. पन्नास रुपयात दाढी आणि ऐंशी-शंभर रुपयात कटिंग सोप्प गणितय…) म्हणजे बघा जगात काही लोक श्रीमंत आहे पण या माणसाचा थाट जरा वेगळा आहे. आता हा राजा जितका श्रीमंती साठी ओळखला जातो तितकाच तो पैसा खर्च करण्यासाठी सुद्धा ओळखला जातो. हा भिडू जगापासून आपली संपत्ती लपवणे ऐवजी दोन्ही हातांनी खर्च करण्यासाठी ओळखला जातो. सगळा रॉयल कारभारवाला झोन आहे.

7000 कार आणि सोन्याने मढवलेलं विमान…

हस्नल बोलकिया आपल्या श्रीमंती मुळे कायम चर्चेत असतात. असं सांगितलं जातं की सुलतान जवळ जवळपास सात हजार कार आहेत या सगळ्याच गाड्या महागडे असून त्यातल्या काही कार या सोन्याचा वर्ख असलेल्या आहेत. श्रीमंतीचा अजून एक कळस म्हणजे असं म्हटलं जातं की कार सोडून प्रायव्हेट विमानाचा शौक असलेले हस्नल बोलकिया यांनी सोन्याने मढवलेलं विमान बाळगलेलं आहे. 14 हजार 700 करोड रुपयाच्या संपत्तीचा हा शासक मालक आहे.

इतका पैसा असण्याचा स्त्रोत म्हणजे त्यांच्याकडे तेलाच्या खाणी आणि प्राकृतिक गॅसचे स्त्रोत असल्याचं सांगितल जातं.
इथ आपले गोव्याला जायचे प्लॅन कॅन्सल होतात त्यात एवढे पैसे पाहूनच डोक्याला मुंग्या यायचे लक्षण आहेत.

हे ही वाच भिडू:

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.