तीन महिन्यापूर्वी तूम्ही १,००० रुपये लावले असते तर आज त्याचे १७ हजार झाले असते… 

बाब्बो…!!!

काय खुळ्या बोड्याची गणित मांडाय लागलायसा. सुखासुखी धंदा चालूय बघवत नाय का. भावांनो हे मार्केट हाय मार्केट इथं कुणाच्या बापाला कळत नाय कशाचं काय चाल्लय. मार्केटच्या धंद्यात नवा प्रकार आहे तो कॉईनचा.

आत्ता कॉईन इनलिगल हाय, सगळी गंडणारायत अस म्हणणाऱ्यांनी सरळ सरळ कडकडनं सुटावं. श्री श्री हर्षद मेहता सांगूनच गेलेत रिस्क हैं तो इश्क हैं… 

तर विषय हाय क्रिप्टो करन्सीचा. सध्याच्या काळात बिटकॉईन आणि इथेरियमनं आभाळ मारलच आहे. यातच एक नवीन नावं आलय ते DOGECOIN. याचा उच्चार डॉगी कॉईन करुया. बर वाटतय म्हणायला. 

तर क्रिप्टो करन्सीच्या बाजारात सगळ्यात जास्त रिटर्न्स देणारा कॉईन म्हणून डॉगीकाईनचा उल्लेख व्हायला लागलाय. याच्या जबराट मागणीमुळे ४ मे ला अमेरिकेचा रॉबिनहुड आणि भारताततला वजीरएक्स क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म क्रॅश झाले होते. 

काय आहे अशी जादू…? 

बिटकाईन, इथेरियम सारखाचा हा डॉगीकाईन. म्हणजे व्हॅर्च्युअल कॉईन. याची सुरवात २०१३ साली IBM कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी केली होती. 

गंम्मत अशी की हा कॉईन इतर कॉईनची चेष्टा करायला मज्जेसाठी काढण्यात आलेला होता. त्यामुळेच याच नाव आणि लोगो मीम शीबा इनु पासून घेण्यात आलं होतं. बिटकाईन आणि डॉगीकाईनमध्ये फरक एवढाच की डॉगीकाईमनमध्ये अप्पर लिमीट नाही.

म्हणजे बिटकॉईन २१ मिलीयन पेक्षा जास्त असू शकत नाहीत पण डॉगीकाईन कितीही होवू शकतात. सध्याच्या बाजारात १०० बिलीयन पेक्षा जास्त डॉगीकाईन मार्केटमध्ये आहेत. सध्याच्या घडीला बिटकॉईन, इथेरियम आणि बाईनेंस कॉईन नंतर डॉगीकॉईन सर्वाधिक गतीने वाढणारा चौथा कॉईन झालेला आहे.  

जागतिक किर्तीचे इलॉन मस्क यांची साथ.. 

टेस्लाचे मालक व जगाचे आदर्श एलॉन मस्क यांनी देखील डॉगीकॉईनला समर्थन दिलेले आहे. त्याच्या ट्विटमुळेच डॉगीकॉईनचे मुल्य वाढण्यास सुरवात येत गेली किंवा अधिक वेगाने ही किंमत वाढली जावू लागली. इतक्यावर हे भाऊ थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या ट्विटरच्या बायोत माजी फॉर्मर CEO ऑफ डॉगीकाईन पण लिहून टाकलं.

मागच्या वेळी टेस्लाने बिटकाईनमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याची बातमी आली होती त्यानंतर बिटकॉईन ढगाच्या पार पुढं गेला. तसचं डॉगीकॉईनचं होत आहे.  मस्क सोबतच डल्लास मेवरिक्स चा मालक मार्क क्युबन, रॅपर स्नूप डॉग आणि रॉक म्युझिशियन जीन सिम्मोन्स यांनी देखील डॉगी कॉईनला पाठींबा दिला. मग भाऊ हवेत जाणारच होते. 

किती वर गेलाय आणि का ? 

१ फेब्रुवारीला डॉगीकॉईनची किंमत ३.८ सेंट होती ती ५ मे ला ६६ सेंट झाली. फेब्रुवारीच्या सुरवातीला ज्यांनी डॉगी कॉईनमध्ये १००० हजार डॉलर टाकले होते त्यांचे आज १७ हजार डॉलर झाले. मार्केट कॅपचं सांगायचं झालं तर ८५ अब्ज डॉलर झालय. यामागचं कारण एलॉन मस्कचा पाठींबा हेच सांगितल जातय. दूसरं कारण म्हणजे तेजीत किंमती वाढायला लागल्यामुळे फियर ऑफ मिसींग आऊट म्हणजे नफा न झाल्याची भिती मार्केटमध्ये पसरते. आपण लावायला पाहीजे होते ही भिती अजून गुंतवणूक करायला लावते. या भितीतून कॉईनची किंमत वाढत गेली. 

पण पण पण….

सॅडर्डे नाईट लाईव्ह सारख्यांनी हा भाव गडगडू शकतो अस सांगितलं आहे. असही सांगण्यात येतय की गेम स्टोप सारखा रेडीट वरचा डॉगीकॉईनचा ग्रुप ही किंमत वाढवत राहिला आहे. त्यामुळे हा भाव कधीही कोसळू शकतो. कुठेतरी मनु मुंन्द्रा बसलेला असू शकतो. बाकी आपण शहाणे आहातच… 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.