पुणे हीपहॉप म्हणजे दुसरं कॉम्प्टन, हितं प्रत्येक चौकात तुला रॅपर भेटन…

पीसीएमसी म्हणजे दुसरं कॉम्प्टन, हितं प्रत्येक चौकात तुला रॅपर, गँगस्टर भेटन…

भाऊला पुण्यातून मधून मानपान…..

पी टाऊनची रॅप शीट म्हणजे गंभीर विषय….

पिंपरी चिंचवड आणि पुणे हुडय आपला

भारतातलं रॅप झोन असलेलं कॉम्प्टन म्हणजे पी टाऊन अर्थात पिंपरी चिंचवड/पुणे. 

आता भिडू रॅपचा जमाना आहे आणि गल्ली गल्लीत तुम्हाला रॅपर सापडतील फक्त थोडा शोध घेण्याची गरज आहे. मंगळवार पेठेतला संबाटा, एमसी डिडो, रॉकसन, एमसी गावठी, क्रॅकहेड, एमसी स्टॅन, एमसी टीएचसी या लोकांमुळं पुणे जगातल्या रॅप कल्चरमध्ये हवा करत असतंय.

त्यातल्या त्यात अंडरग्राउंड म्हणल्यावर तर अजूनच वाढीव विषय.

रॅप करणं म्हणजे फक्त गांजा फुकुन, दारू पिऊन राडे करणं, डीस करणं, भिंतीवर ग्राफिटी बनवणं नाही, तर त्या आर्ट फॉर्मला त्या झोनचा न्याय देणं. मुंबई आणि पुण्यात रॅप कल्चर झपाट्यानं वाढतंय आणि भविष्यात ते अजूनच बळकट होईल यात शंका नाही.

तर विषय आहे कॉम्प्टनचा. पुण्याला भारताचं कॉम्प्टन म्हणतात, पण का? रियल कॉम्प्टन काय होतं? वेस्ट साईड, ऑपोझिट साईड हा काय विषय आहे? हे सगळं आपण डिटेलमध्ये बघुया.

कारण ब्लड गँग, क्रिप गँग, पोलिसांचा सीन, ब्लड वॉक, रियल हीपहॉप हे सगळं डेंजर आहे पण इंटरेस्टिंगही.

म्हणजे इतर राज्यांमध्ये रॅप चालतो, तिथं कौतुक केलं जातं… कारण तिथं रॅप हे फक्त रॅप म्हणून वागवले जातात. पण पुण्यामध्ये रॅप हे अक्षरशः जगले जातात. त्यामुळे येणाऱ्या काळात पुणे हे हिप हॉप सिटी म्हणून ओळखलं जाईल.

जसं मुंबईला सिनेमे आणि बॉलिवूडसाठी ओळखलं जातं, तसं पुण्याला हिप हॉप सेंटर म्हणून ओळखलं जातं. गँगस्टर रॅपपासून ते मंबल रॅपपर्यंत सगळं इथं पुण्यात ऐकायला मिळतं. पण या रॅपर लोकांचे आपापसात असणारे बिफ वॉर आणि डिस शिट हे मात्र डेंजर प्रकरण आहे.

खरं कॉम्प्टन काय होतं?

न्यूयॉर्कमधून रॅप पसरायला सुरवात झाली पण त्याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला तो म्हणजे कॉम्प्टन शहरावर. आधीच कॉम्प्टनमध्ये गुन्हेगारी तेजीत होती आणि यूएसएमधली क्राईम सिटी म्हणून कॉम्प्टन ओळखलं जायचं. याच कॉम्प्टन मध्ये ब्लॅक पँथर चळवळीचा मोठा क्राऊड होता आणि इथंच क्रांतीची धुगधुगी होती.

कॉम्प्टन मध्ये बरेच हुड (जिथवर दहशत पसरू शकते) बनले आणि तिथंच आपापसातील वादांमुळे ब्लड गँग आणि क्रीप गँग तयार झाल्या.

१९६० ते १९७० या काळात जेव्हा कृष्णवर्णीय लोकं अमेरिकेत संघर्ष करत होते तेव्हाच ब्लॅक पँथर पार्टी धार धरू लागली होती आणि यातूनच हे रॅप कल्चर उदयाला आलं. हुडमध्ये गँग तयार झाल्या त्या म्हणजे ब्लड गँग आणि क्रिप गँग.

आता कोणता रॅपर कोणत्या गँगचा आहे? हे कसं ओळखायचं तर त्यांच्याकडे असलेल्या रुमालावरून, म्हणजे लाल रुमाल असेल तर ब्लड गँग आणि निळा रुमाल असेल तर क्रीप गँग.

१९८० मध्ये अमेरिकेत ड्रग माफिया उगवले आणि त्याचा परिणाम कॉम्प्टनमध्ये झाला. ब्लॅक कम्युनिटीवाल्या लोकांनी या धंद्यात उडी घेतली. अजूनही असं म्हटलं जातं, की ड्रग्सची सगळ्यात मोठी उलाढाल कुठे होत असेल तर ती कॉम्प्टनमध्ये. यात जर पोलिसांच्या तावडीत सापडले, तर मोठी शिक्षा व्हायची. मग यावर उपाय म्हणून तेव्हाच्या तरुण पिढीनं रॅप अल्बम काढून ते विकण्याचा सपाटा लावला.

कॉम्प्टन रॅपमध्ये मोठ झालं ते N.W.A. या गँगमुळे. रॅपर ‘इजी ई’नं रॅप कल्चर सुरू केल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर आला टूपाक शाकुर.

N.W.A. नं वाढीव रॅप बाजारात आणले आणि ते भरपूर लोकप्रिय झाले. पण म्हणतात ना सुख जास्त झालं की ते टोचू लागतं, तसंच काहीसं या गँग सोबत झालं आणि ही गँग फुटली.

याच गँग मधले जिवाभावाचे होमीजनंतर एकमेकांचे दुश्मन होऊन बसले आणि ज्यानं त्यानं आपापल्या गँग बनवायला सुरवात केली. सेम हाच सीन भारताचं कॉम्प्टन म्हणजे पुण्यात पाहायला मिळतो त्यात रॅप करणारे धोका देऊन गेलेल्या होमीजला जिवानिशी मारायच्या धमक्या देतात, त्यांना चिडवणारे डिस ट्रॅक काढतात.

पुन्हा कॉम्प्टनकडे येऊ

आईस क्यूब हा N.W.A. चा भिडू होता पण टीम फुटल्यावर त्यांनी एकमेकांविरुद्ध डिस ट्रॅक बनवायला सुरुवात केली आणि ही दुष्मनी बरीच दूरवर चालली. ईजी ई, डॉ, आईस क्यूब हे आपापसात भांडू लागले. पण अचानक ईजी ईचं निधन झालं आणि ही ‘डिस शीट’ हादरली. ज्याच्यामुळं कॉम्प्टन ओळखलं जायचं, ज्यानं रॅप कल्चर आणलं तोच गेल्यानं हिप हॉप कल्चरवर मोठं संकट कोसळलं सोबतच शोककळा पसरली.

आता भारताचा विषय काढू

जेव्हा रॅप भारतात आलं तेव्हा हनी सिंग, बादशहा, रफ्तार ही मंडळी मजबुत रॅप बनवून मजबुत पैसा छापत होती. पण अंडरग्राउंड सीन सगळा वेगळा होता. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर तेव्हा प्रदीप काशेकर आणि एमिवे बंटाय ही गँग मेन स्ट्रिम स्टेजवर रॅप गाजवत होती. डिव्हाईन आणि नेझीनं या कल्चरला अजून हाइप दिली.

पण पुण्यात अंडर ग्राउंड सीनमध्ये एक हिरा असा होता ज्याने जागतिक पातळीवर पुण्यातलं रॅप गाजवलं आणि तो होता एमसी स्टॅन.

(स्टॅनवर स्पेशल लिहिता येईल त्यामुळं इथ शॉर्ट कट हाणतो)

‘समझ मेरी बात’ मधून एमिवे आणि डिव्हाईनला डिस करून स्टॅननं राडा केला. तो आज एक इंटरनॅशनल सेलिब्रिटी आहे आणि पीटाऊनमधला महत्वाचा रॅपर म्हणून ओळखला जातो. पण त्यानं रॅपमधून डिस केल्यानं वातावरण पेटलं होतं.

आता जसा कॉम्प्टन मध्ये इश्यू झाला होता सेम तसाच इश्यू पुण्यात रॅप कल्चर मध्ये झाला…

तो म्हणजे होमीज लोकाचे आपापसात असणारे वाद. पुण्यात तसं पाहायला गेलं तर गँगस्टर भरपूर आहेत, पण रॅप कल्चरमध्ये ही गँग तुफान आहे आणि बरेच जण हे ब्लड गँगवरून प्रेरित आहेत. सोशल मीडियावर पुण्याचा रॅप डिस विषय टाकला, तर तुम्हाला एकंदरीत सीन कळेल.

भारताच्या या कॉम्प्टनमधे रॅपर आहेत, मारामाऱ्या आहेत, राडे आहेत, लफडे आहेत, पोलीस सीन आहे म्हणून इतर राज्यातील रॅपर लोकांचं म्हणणं आहे की,

हिप हॉप सिटी म्हणून पुणे बेस्ट आहे, कारण इथ हिप हॉप जगला जातो.

भारताच्या या कॉम्प्टनमधले तुमचे आवडते रॅपर आणि त्यांची तुम्हाला आवडणारीट लाईन कोणती ते कमेंटमध्ये सांगा…

तोवर जय हिप हॉप….!

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.