भांग चढते का..? चढली तर काय करायचं..?

पण कसय भांग पिल्यावर काय होतं? भांग चढते का? ती कितपत चढते? चढल्यानंतर काय धोका असतो का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा हा लेख आहे. तुम्ही भांग पित नसला/ पिणार नसला तरी इतर लोकांना सांगा आणि शहाणे करा.

आज धुळवड. उभा महाराष्ट्र आज मटण खातो आणि हिंदीभाषिक लोकं आज होळी खेळतात. खरी मज्जा तर रंगपंचमीलाच असते. पण आत्ता सगलं कस क्रॉस झालय.

पुण्या मुंबईत आजच होळी खेळतात. या होळीची खास गोष्ट असते ती म्हणजे भांग. भांग पिल्याशिवाय होळी पुर्ण होत नाही अस हिंदी भाषिक मित्र सांगतात आणि आपण भांग पितो. मग किस्से रंगतात. आरे मी तेव्हा भांग पिली आणि दोन दिवसांनी उठलो ही सामान्य गोष्ट.

खरं खोटं माहिती नाही पण दोन दिवसांनी उठणाऱ्या माणसांची उदाहरणं लाखभर असली तरी या गोष्टी सहसा घडत नाहीत. 

पण कसय भांग पिल्यावर काय होतं? भांग चढते का? ती कितपत चढते? चढल्यानंतर काय धोका असतो का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा हा लेख आहे. तुम्ही भांग पित नसला/ पिणार नसला तरी इतर लोकांना सांगा आणि शहाणे करा.

कारण विषय महत्वाचाय 

तर मित्रांनो भांग चढते. गांजा चढतो तशीच भांग चढते. त्यामुळे झोप लागते किंवा माणूस एकच गोष्ट वारंवार करत राहतो. दारू पिल्यानंतर ज्या पद्धतीने चढते त्याहून अधिक भांग चढते. दारूच्या नशेत आणि भांगच्या नशेत फरक असा आहे की, दारू पिल्यानंतर तुम्ही काय करताय त्यावर किमान कंट्रोल राहू शकतो. पण भांग पिल्यानंतर असा कंट्रोल रहात नाही. दूसऱ्या दिवशी तुम्ही काय करत होता हे देखील लक्षात रहात नाही.

आत्ता काही महाभाग सांगू शकतात की, मी भांग पिलेली काहीही होत नाही. काहीही झालं नाही. तर असे महाभाग कंटिन्यू गांजा पिणाऱ्या गॅंगमधले असतील. त्यामुळे त्यांना तुलनेत नशा कमी होत असेल. किंवा भांगच प्रमाण अत्यंत कमी असल्याने ते अशा गोष्टी पसरवत असतील. 

एक गोष्ट खात्रीशीर लक्षात घ्या भांग चढते. ती पण लय.

भांग पिल्यानंतर काय काय होवू शकत? 

  • भांग पिल्यानंतर एकतर तुमचा कंट्रोल जावू शकतो. तुम्ही एखादी गोष्ट वारंवार करु शकता. म्हणजे हसताय तर हसत राहू शकता. रडताय तर रडू शकता. आमच्या गावात काही मुलं सिमेंटच्या पाईमध्ये बसून भांग पित होते. पाईप डोक्याला थटत असल्याने ते कंबरेतून वाकून भांग पित होते. त्यानंतर ते पाईमधून बाहेर आले आणि गावभर कंबरेतून वाकूनच चालू लागले.
  • थोडक्यात शरिरावरचा कंट्रोल सुटण्याची लक्षणे भांगेमध्ये असतात. यालाच शास्त्रीय भाषेत क्लॉस्ट्रॉफोबिक अटॅक म्हणतात.

तरिही भांग प्यायचीच असेल तर काय करायला पाहीजे. 

  • दारूचे पेग कसे हळुहळु मारून अंदाज घेता, त्याचप्रमाणे भांग प्यावी. लस्सी सारखी टॉप टू बॉटम मारण्याचे लाड करु नयेत. भांग ठंडाई, मिल्क शेक यांच्यासोबत घेतली तर कमी नशा होते.
  • भांग पिल्यानंतर कोणत्याही स्वरुपात गाडी चालवू नका. वारं लागेल तस भिनायला सुरवात होते. त्यात ड्रिन्क ॲण्ड ड्राईव्हचाच हा प्रकार झाला. त्यामुळे गाडी चालवू नका.
  • तुम्हाला श्वसनाचा आजार असेल, दमा असेल, अटॅक येवून गेला असेल, डोक्याने जड असाल तर भांग तुमच्यासाठी नाही. भांगच काय तर कोणतीच नशा तुमच्यासाठी योग्य नाही.
  • भांग पिल्यानंतर कोणत्याही गोळ्या खावू नका. डोकं दुखणं, चक्कर येणं अशा गोष्टी घडू शकतात पण त्यासाठी कोणतही मेडिसिन घेणं चांगल ठरणार नाही. अतिच प्रोब्लेम वाटू लागला तर थेट चांगल्या हॉस्पीटलला जा. पण गोळ्या घेवू नका.
  • भांग पिल्यानंतर डिहायड्रेशन होतं. वारंवार तहान लागते. अशा वेळी पाणी प्या. काहीही होणार नाही.

आणि सर्वात महत्वाची गोष्ट भांग पिताना आपल्यासोबत चांगल्या मित्राला घ्या. जो तुमची काळजी घेईल. खासकरून या नशेत तुमच्यासोबत काय घडतय ते कळत नाही. अनोळखी ठिकाणी, अनोळखी लोकांसोबत भांग पिण्याची गमजा करू नका. 

बाकी लोकांची खरी काळजी तर आम्हालाच आहे. हॅप्पी होली.

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.