जेएनयूमधील दहशतवादविरोधी अभ्यासक्रम नव्या वादाला तोंड फोडणार?

दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयुमध्ये एक नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आलाय. मात्र सध्या या अभ्यासक्रमावरून वादंग निर्माण होण्याच्या शक्यता आहे. १७ ऑगस्टला विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत,

‘काउंटर टेररीझम, एसिमेट्रिक कॉन्फ्लिक्ट्स अँड स्ट्रॅटेजीज फॉर कोऑपरेशन अमंग मेजर पॉवर्स’ हा पर्यायी अभ्यासक्रम मंजूर करण्यात आला.

काउंसिल हि शैक्षणिक कार्यक्रमांसाठी विद्यापीठाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. विद्यापीठामध्ये ड्युएल डिग्री प्रोग्रॅमच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हा दहशतवाद विरोधी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केल्यानंतर परराष्ट्र संबंधात एमएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २० सप्टेंबरपासून मॉन्सून सेमिस्टरसाठी ऑनलाईन वर्ग सुरु होणार आहेत.

या अभ्यासक्रमामध्ये जिहादी हिंसेलाच कट्टरपंथी धार्मिक आतंकवादाचं एक रूप असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोबतच तेव्हाचा सोव्हिएत संघ आणि चीनमधील कम्युनिस्ट राजवट राज्यपुरस्कृत दहशतवादासाठी कारणीभूत आहेत. त्यांनी कट्टरपंथी मुस्लिम राज्यांना प्रभावित केलं. 

याबरोबरच ‘कट्टरपंथी-धार्मिक दहशतवाद आणि त्याचा प्रभाव’ या शीर्षकाखालील नव्या अभ्यासक्रमातील मॉड्युलमध्ये सांगण्यात आलं आहे कि, कट्टरपंथी धार्मिक प्रेरित दहशतवादाने २१ व्या शतकाच्या सुरुवातीला दहशतवादी हिंसेला जन्म देण्यात एक महत्वाची भूमिका बजावली आहे. कुराणच्या चुकीच्या व्याख्येच्या परिणामांमुळे जिहादी पंथाच्या हिंसेचा प्रसार आणि प्रचार गतीने झाला.

असं देखील सांगण्यात आलं आहे कि कट्टरपंथी इस्लामिक धार्मिक मौलवींनी सायबर स्पेसचे शोषण केल्याने जगभरात जिहादी दहशतवादाचा इलेक्ट्रॉनिक प्रसार झाला. त्यामुळे गैर मुस्लिम समाजांमध्ये गतीने हिंसेची वाढ झाली, जे धर्मनिरपेक्ष आहेत आणि आता हिंसेच्या परिघात येत आहेत. वाढत आहेत. 

यात जेएनयू शिक्षक संघाने असा आरोप केला आहे कि,

ज्या बैठकीत हा अभ्यासक्रम पार पडला त्या याबैठकीत कोणत्याही चर्चेला परवानगी नव्हती.

यातलं दुसरं मोड्यूल ज्याचं टायटल आहे,

‘राज्य पुरस्कृत दहशतवाद’ यात फक्त सोव्हिएत युनियन आणि चीनचा संदर्भ दिला आहे. दहशतवादाला नेहमीच भौगोलिक आधार असतो आणि तेच त्याच्या कारवायांना आधार देतं. राज्य पुरस्कृत दहशतवाद मुख्यत्वे सोव्हिएत युनियन आणि चीन यांच्यातील वैचारिक युद्धादरम्यान होता. सोव्हिएत युनियन आणि चीन हे प्रमुख राज्य पुरस्कर्ते दहशतवाद आहेत आणि ते त्यांच्या गुप्तचर संस्थांचे प्रशिक्षण, कम्युनिस्ट अतिरेक्यांना आणि दहशतवाद्यांना रसद आणि मदत पुरवण्याच्या कामात गुंतलेले आहेत.

शीतयुद्धानंतरच्या काळात अनेक कट्टरपंथी इस्लामी राज्यांनी हा प्रकार चांगल्या प्रकारे अवलंबला आणि निरनिराळ्या दहशतवादी गटांना मदत केली. जेएनयूच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या डीन अश्विनी महापात्रा यांनी सांगितले आहे कि, त्या अभ्यासक्रम बनवण्यात सहभागी नव्हत्या.

तर स्कूल ऑफ इंजिनियरिंगच्या डीन रुचिर गुप्ता यांनी सांगितले आहे की, सेंटर फॉर कॅनेडियन, यूएस आणि लॅटिन अमेरिकन स्टडिजचे अध्यक्ष अरविंद कुमार हे हा अभ्यासक्रम आणू इच्छित होते. अरविंद कुमार यावर म्हणतात कि,

इस्लामी दहशतवाद हि जगणे स्वीकारलेली गोष्ट आहे. तालिबाननंतर आता याला गती मिळाली आहे. माझ्या माहितीनुसार दहशतवादाच्या पद्धतींचा अवलंब करणाऱ्या इतर कोणत्याही धर्माचे उदाहरण मला अजूनतरी सापडलेले नाही.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.